संपर्क
संचालक- श्री.सुरेश शिरसाठ सर
मुख्य कार्यालय :-
शिंदे वकील निवास, शिवाजी नगर रोड, पिंपळगांव बसवंत, नाशिक
विभागीय कार्यालय :-
1) चिंचखेड रोड, पिंपळगांव बसवंत,
वार- बुधवार व मंगळवार (संध्याकाळी)
2) एच.ए.एल ओझर
वार – सोमवार, गुरुवार (संध्याकाळी)
3) शिवाजीनगर, पिंपळगांव बसवंत
वार- शुक्रवार व शनिवार संध्याकाळी तसेच रविवार संपुर्ण दिवसभर
मोबाईल नं :- 9881018946
अधिक माहितीसाठी संस्थेची वेबसाईट आवश्यक भेट दया
http://www.NaadBrahmaMusicAcademy.com
नादब्रम्ह संगीत अकॅडमीचे संचालक श्री सुरेश शिरसाठ यांचे संगीत क्षेत्रातील असलेले अनुभव जाणून घेऊ.
1) गुरुजी आपला अल्प परिचय सांगा ?
माझे नाव सुरेश क्रष्णा शिरसाठ आहे.शैक्षणिक बाबतीचे सांगायचे राहिले तर मी एम.ए (बी.एड) म्युझिक विशारद पदवी घेतलेली आहे. संगीताचे ज्ञान मिळविण्यासाठी 2010 पासून नागपुर, मुंबई, अहमदाबाद, नाशिक आदी शहरांमधून ज्ञान संपादन केले.
2) संगीताची आवड कोणत्या वर्षी निर्माण झाली होती जे-ने करुन भविष्यात याकडे यावसे वाटले ?
प्रत्येक व्यक्ती मध्ये आवड-निवड ही त्यांच्या लहानपणापासून ठरलेली असते.माझे सुध्दा असेच आहे. संगीताची ओढ मला लहानपणी प्राथमिक शिक्षण इयत्ता 4 थी मध्ये 1998 साली असतांनाच झाली.
3) संगीत शिक्षणांमध्ये एकूण किती प्रकार असतात ?
संगीत शिक्षण वादयांच्या आधारे निवडले जाते. जसे तबला, हार्मोनियम, गिटार, पियानो, ड्रमसेट आदी परंतु विदयार्थी घडवितांना आपल्या या शास्त्रातील संपुर्ण विदया अथवा ज्ञार्नाजन आवश्यक आहे. या क्षेत्रात मी शास्त्रीय, उपशास्त्रीय, तसेच पाश्चात्य संगीताचे ज्ञान मिळविले आहे. या सर्वांचा फायदा आमच्या विदयार्थींना निश्चित माझ्याकडून कळत-नकळत मिळतोतच.
4) संगीत क्षेत्रात पदापर्ण केल्यापासून आपल्या कोणकोणते पुरस्कार अथवा बक्षिसे मिळाले ?
संगीत क्षेत्र हे आवडीवर जातकाच्या जन्मजात देवाच्या देणगीवर अवलंबून असते. विदयार्थी आपले कलागुण जाणून याकडे आकर्षित होणे आवश्यक असते. या सर्वांचा विचार करुनच मी संगीत प्रशिक्षण केंद्र सुरु केले. पुरस्कारांचे सांगायचे झाले तर मला कर्मवीर काकासाहेब वाघ, तुळजाभवानी पतसंस्था,जिल्हास्तरीय जैन सांस्क्रतिक फाऊंडेशन आदी संस्थानी सम्मानित केले आहे.
5) आता पर्यंत आपल्या संगीत प्रशिक्षण केंद्रात किती विदयार्थीनी प्रशिक्षण घेतले?
मी जेव्हा पासून प्रशिक्षण केंद्र सुरु केले आतापावतो 800 विदयार्थींना संगीताचे प्रशिक्षण दिले आहे.
6) समाज प्रबोधनासाठी संगीताचा काही फायदा झाला आहे का ?
हो, नक्की आमच्या संगीत प्रशिक्षणाद्वारे आम्ही सलाम इंडिया, मातपित्रभ्यो नम:, उत्सवरंग आदी सारखे सामाजिक उपक्रम राबविले आहे.
7) आपल्या संगीत ज्ञानाचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत व्हावा यासाठी कोणते उपक्रम राबवितात ?
आमच प्रशिक्षण केंद्राद्वारे अनेक सांस्क्रतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.वार्षिक स्नेहसम्मेलन, सप्तरंग,सप्तसूर आदि कार्यक्रम घेतले जातात. संधी मिळाली तर कलाप्रदर्शनार्थ लग्नसमारंभ, वाढदिवस,भजनसंध्या आदि ठिकाणी सुध्दा सांस्क्रतिक कार्यक्रमांचे प्रदर्शन केले जाते.




