नाशिक :- पंचवटीतील अमृतधाम परीसरातील विडी कामगार नगर मधील १०वी शालांत परीक्षेत ६०%च्या पुढे गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यात कु. स्नेहल शांताराम मुर्तडक ९४%, कु. कांचन संजय लहामगे ९०%, कु. मनिषा रतनलाल मेघवाल८०%, कु. वृषाली सुनिल शेळके ७८%, कु. रिया दिपक पाटील ७७%, अंकुश शशीकांत केंग ७२%, कु.गीता काकासाहेब काळे ६५% यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमृतधाम परीसर ज्येष्ठ नागरीक संघाचे शिवाजीराव वंजारी होते तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट संपर्क प्रमुख दत्तु बोडके,जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, उप जिल्हा प्रमुख अमजद पठान, सरचिटणिस श्याम गोसावी, सुभाष जगताप, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश केकाणे ,गवळी आप्पा,यश कॅम्प्युटरच्या संचालीका ज्योत्स्ना सांगळे, चित्रपट निर्माते सुनिल सुर्यवंशी, मनपा शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच शाळेतील विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती दिघोळे व कल्पेश कुटे यांनी केले होते. केंद्र प्रमुख गायकवाडसर यांनी आभार मानले.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





