रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण

Jul 1, 2019

नाशिक :- नाशिक पश्चिम वनविभागातर्फे 33 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले येथे 25 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके आदींनी वृक्षारोपण केले.
नाशिक जिल्हयासाठी 1 कोटी 92 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी सामाजिक वनीकरण, कृषी विभाग यासोबत शासनाच्या सर्व विभागांचा देखिल वृक्षलागवडीत समावेश आहे. आजपासून सुरु झालेले वृक्षलागवड अभियान 30 सप्टेंबर 2019 पर्यंत सुरु राहणार आहे. या अंतर्गत वृक्षलागवडी सोबतच वृक्षसंवर्धनाचे काम देखिल करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक जिल्हयात साधारण 2 कोटी 28 लाख विविध जातीचे रोपे उपलब्ध आहेत.
यावेळी विभागीय वन अधिकारी राजन गायकवाड, उपवनसरंक्षक शिवाजी फुले, त्र्यंबकचे प्रभारी तहसिलदार एस.एम.निरगुडे, रोहिले आश्रमशाळेचे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, ग्रामस्थ, व पोलीस अकाडमीचे प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News