स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Jun 30, 2026

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणार आहे.. इयत्ता 6 वी ते 12 वी च्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 29जुन 2026 ते 31 आगस्ट 2026अशी असल्याची माहिती  स्वान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सचिव विकास टाकळीकर , कोषाध्यक्ष अक्षय खोब्रागडे, सहसचिव गौरव सोमवंशी,प्रसाद भोपळे, अमन पाचघरे आणि संकेत जैन आदी उपस्थित होते.

शशिकांत कांबळे म्हणाले , “स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच 2023 ला ट्रेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये इ. ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यासाठी परिक्षा घेण्यात आली त्या परीक्षे नंतर काही विध्यार्थीना आलाबमा सेंटर व सिंगापूर सायन्स सेंटर ला घेऊन. जाण्यात आले. यावर्षी 2 री नॉलेज नेक्स्ट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल. यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार असून, येणाऱ्या पिढीसाठी हे महत्वाचे आहे.”

विकास टाकळीकर म्हणाले , “ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांसह जिल्हा परिषद, महानगपालिका, नगरपालिका शाळांचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी 29 जून पासून नावनोंदणी करता येणार आहे. 30 आगस्ट 2026 पर्यंत नावनोंदणी सुरु राहील. या परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑटोम्बर सत्कार होणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामा आणि सिंगापूर सायन्स येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी नेण्यात येईल. अमेरिकेतील स्पेस कॅम्प, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऑरलॅन्डो या ठिकाणीही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येणार आहे. .”

आज संपूर्ण जग विकासाच्या वाटेवर आहे. माणूस पृथ्वीपुरताच मर्यादित न राहता अवकाशातही प्रवास करू लागला आहे. चंद्र, मंगळ हे ग्रह तर मानवाच्या अगदी ओळखीचे झाले आहेत. अंतराळासंबंधित प्रयोग, अभ्यास आणि संशोधन हे प्रत्येक देश स्वतःच्या पद्धतीने करत असतो. संबंधित संशोधनासाठी अनेक देशांनी स्वतःची अंतराळ संस्था (Space Agency) तयार केली आहे. जगातील १९५ देशांपैकी फक्त ७२ देशांकडे स्पेस एजन्सी आहेत. ‘नासा’ ही त्यापैकी सर्वांत सुप्रसिद्ध एजन्सी आहे. तीस वर्षांपूर्वी डॉ. वॉन ब्राऊन यांनी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच खगोलशास्त्रात रुची निर्माण व्हावी आणि या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवता यावीत, यासाठी यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर सुरु केले.”

अजून बातम्या वाचा..

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

नाशिक : विविध धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये...

read more
Breaking News