युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार : विद्याधर महाले

Sep 3, 2026

Nashik : मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव तथा युवकांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक आदरणीय श्री. विद्याधर महाले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गणराज्य फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद ग्राउंड, चिखली येथे प्रा. विठ्ठल कांगणे सर यांच्या ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला युवक, विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गणराज्य फाऊंडेशनच्या सदस्यांनी विद्याधर महाले साहेबांचे भव्य पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक व विद्यार्थीहिताच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.

‘गाव तेथे अभ्यासिका’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न, तसेच छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांतील नामांकित रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी गणराज्य फाऊंडेशनचे सदस्य सदैव उपलब्ध राहतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्याधर महाले साहेबांनी युवक व विद्यार्थ्यांना आश्वस्त करत, “तुम्हाला येणारी प्रत्येक अडचण सोडविण्यासाठी मी प्राधान्याने तत्पर असेन,” असे सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी “प्रामाणिकपणे प्रयत्न करा; तुमचे यश तुमच्यापासून कोणीही रोखू शकणार नाही,” असा आत्मविश्वास निर्माण करणारा संदेश दिला.

यानंतर प्रा. विठ्ठल कांगणे सर यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी वक्तृत्वातून उपस्थित युवकांना मंत्रमुग्ध केले. आपल्या मधुर वाणीने त्यांनी तरुणांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण केला. शिक्षण, करिअर, स्पर्धा परीक्षा, सामाजिक जाणीव तसेच जीवनातील संघर्ष अशा विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

युवा संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनीही आपल्या पावलोपावली येणाऱ्या विविध समस्या व अडचणी थेट विद्याधर महाले साहेबांसमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत महाले साहेबांनी त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गणराज्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. पूजा जाधव यांचे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे विनोद इंगळे, गोपाल राजपूत, विष्णू आव्हाळे, गणेश जाधव साहेब, गोपाल परिहार, गणेश इंगळे आणि उमेश परिहार साहेब,भारत जोगदंडे, सोमेश इंगळे, सचिन पवार ,नवलसिंग इंगळे तसेच सर्व टीमचे विद्याधर महाले साहेबांनी विशेष कौतुक केले.

युवकांच्या प्रश्नांना व्यासपीठ, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मार्गदर्शन आणि गरजूंसाठी मदतीचा हात या त्रिसूत्रीवर आधारित हा युवा संवाद कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more
Breaking News