मा. प्रधानमंत्री यांच्या महत्वाकांक्षी “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात “रायन इंटरनेशनल” शाळेच्या एकून १०८ विद्यार्थानी सहभाग नोंदवला तसेच क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्राच्या ९६ प्रशिक्षनार्थीनि देखिल आपला सहभाग नोंदवला, सर्वाना या निमित्ताने मा. प्रधानमंत्री यांच्या महत्वाकांक्षी “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या बाबत माहिती देण्यात आली तसेच वकृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा यांचे देखिल आयोजन करण्यात आले. दोन्ही स्पर्धेतील अनुक्रमे तिन विद्यार्थाना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन, प्रशिक्षण केंद्राचे सहा. निदेशक श्री.डी. बी. वसदानी यांनी गौरवित केले, पारितोषिक वितरण प्रसंगी, स्थानिक लोकप्रतिनिधि तसेच नाशिक महानगर पलिकेतिल जुने जानते नगरसेवक श्री. दिनकर आढाव हे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वित करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राचे सहा. प्रशिक्षक श्री. व्ही. टी. निकम, प्रशिक्षक श्री. मासूम पटेल, श्री. केतन शित्रे, श्री. किरण वर्पे, श्री. संदीप रेपे यांनी विशेष परिश्रम घेतले.
चित्रकला स्पर्त्धेतिल पारितोषिक प्राप्त विद्यार्थी…… प्रथम:- कु. तन्वी छाजेड, द्वितीय:- कु. विश्वा कांगने, तृतीय:- कु. अपर्णा कुर्र्हाड़े. वत्कृत्व स्पर्धा: प्रथम:- श्री. विजयकुमार राठोड, द्वितीय क्र. विनायक सांगळे, तृतीय क्र.:- श्री. महेश बेडेकर.कार्यक्रमासाठी स्थानिक नगरसेवक श्री. दिनकर आढाव हे प्रमुख उपस्थित होते.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





