नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ

Sep 12, 2026

देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे यशस्वी आयोजन

नाशिक: इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (वेस्ट झोन) च्या ४२ व्या परिषदेनिमित्त (ISNWZ 2026) शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी नाशिक येथील हॉटेल ट्रिट येथे ‘३६०° किडनी केअर’ या संकल्पनेवर आधारित तीन विशेष वैद्यकीय कार्यशाळांचे यशस्वी आयोजन पार पडले. हिंदुजा हॉस्पिटलचे प्रसिद्ध किडनी विकार तज्ञ डॉ. ॲलन अल्मेडा यांच्या हस्ते हे विशेष उद्घाटन पार पडले. नेफ्रो क्रिटिकल केअर कार्यशाळा आणि सायंटिफिक प्रोग्राम हे सत्र एकाच सभागृहात प्रथम व द्वितीय अशा दोन वेगवेगळ्या सत्रात पार पडले. तर रीनल पॅथॉलॉजी कार्यशाळा सफायर सभागृहात पार पडले. दोन्ही ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून कार्यशाळांचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचारांची माहिती देण्याच्या उद्देशाने आयोजित या दोन्ही सत्रांना देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा प्रतिसाद लाभला.

पहिले सत्र डॉ. हरगोविंद त्रिवेदी हॉल (सॅफायर) येथे ‘रीनल पॅथॉलॉजी कार्यशाळा’ म्हणून पार पडले. या कार्यशाळेचे संयोजन डॉ. नागेश अघोर, डॉ. कैलास शेवाळे आणि डॉ. प्रकाश उगले यांनी केले. यात एकूण पाच मॉड्यूल्सच्या माध्यमातून दहा व्याख्याने आणि चार केस चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सत्रात डॉ. सुनील देशपांडे, डॉ. रतीका अग्रवाल, डॉ. विशाखा टिकेकर, डॉ. अमेय रोजेकर, डॉ. स्वर्णलता, डॉ. अनिला कुरियन आणि डॉ. राधिका पाटील या तज्ज्ञांनी किडनी बायोप्सी हिस्टोपॅथॉलॉजी, ग्लोमेरुलर आजार, डिपॉझिशन आजार, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आणि रीनल ट्रान्सप्लांट पॅथॉलॉजी या महत्त्वपूर्ण विषयांवर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.

त्याच वेळी डॉ. विद्या आचार्य हॉल (क्रिस्टल बॉल रूम) येथे ‘नेफ्रो क्रिटिकल केअर कार्यशाळा’ पार पडली. डॉ. अभिजित मोरे आणि डॉ. प्रतीक शेटे यांनी या सत्राचे संयोजन केले. या कार्यशाळेत चार मॉड्यूल्स अंतर्गत दहा व्याख्याने, दोन केस सिम्युलेशन आणि एक प्रत्यक्ष हँड्स-ऑन प्रात्यक्षिक सत्र पार पडले. यात डॉ. पूजा बिनानी, डॉ. सुहास मोंढे, डॉ. संजय पांढरे, डॉ. पार्थ शाह, डॉ. प्रविण ताजणे, डॉ. वैभव केसकर, डॉ. दिव्या वाजपेयी, डॉ. निशांत देशपांडे, डॉ. यतींद्र दुबे, डॉ. विपुल चाकूरकर, डॉ. सचिन पाटील आणि डॉ. हेमल शाह यांनी सेप्टिक शॉक, AKI, RRT आणि ॲड्सॉर्प्शन थेरपी, व्हेंटिलेटरचे मूळ नियम तसेच विशेष परिस्थितीतील CRRT यासारख्या अतिदक्षता विभागातील महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.

याच सभागृहात (डॉ. विद्या आचार्य हॉल) दुपारी २:०० ते संध्याकाळी ७:४० दरम्यान विविध महत्त्वपूर्ण वैज्ञानिक सत्रांचेही आयोजन करण्यात आले होते. याची सुरुवात ‘CAPD सिम्पोजियम’ ने झाली, ज्यामध्ये डॉ. शीतल लेंगडे, डॉ. जॉर्जी अब्राहम, डॉ. अनिल गंजू आणि डॉ. विनंत भार्गव यांनी CAPD पेरिटोनाइटिस, दैनंदिन अडचणी, न्यूट्रिशनल समस्या व बायोकॉम्पॅटिबल फ्लुइड्स यावर मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. सुधीर जी. कुलकर्णी, डॉ. अभिजित कोन्नूर, डॉ. भूपेशकुमार कावरे, डॉ. एस. जे. आचार्य, डॉ. रोहित खंडेलवाल, डॉ. देविकुमार केळकर, डॉ. मौलिन शाह, डॉ. पद्मिनी सिरकनुंगो, डॉ. अनिरुद्ध ढोकरे, डॉ. शाम पगार, डॉ. अपूर्व पारिख आणि डॉ. संदीप देशमुख यांनी भुषवले. त्यानंतर ‘किडनी ट्रान्सप्लांटेशनमधील आधुनिक उपचार’ या सत्रात डॉ. मनिष माळी, डॉ. मनिष बलवाणी, डॉ. भरत शाह, डॉ. श्रुती तापियावाला आणि डॉ. धनंजय के. एल. यांनी इम्युनोसप्रेशन, इन्फेक्शन प्रतिबंध आणि झेनोट्रांसप्लांट यावर विचार मांडले; तर अध्यक्षस्थानी डॉ. नागेश अघोर, डॉ. दिव्येश विरोजा, डॉ. ओ. पी. राठी, डॉ. श्रीगणेश बरनेला, डॉ. प्रकाश उगले, डॉ. अभय सदरे, डॉ. अतुल सजगुरे, डॉ. कैलास शेवाळे, डॉ. प्रफुल गज्जर, डॉ. जयेश वाघुलदे, डॉ. दीपा उसुलमुर्ती, डॉ. सुहास बविकर, डॉ. वत्सा पटेल आणि डॉ. विजय घाटगे हे उपस्थित होते. पुढे ‘CKD मधील ॲनिमिया व्यवस्थापन (ESA थेरपी)’ सत्रात डॉ. श्रीनिवास अंबिके आणि डॉ. देवदत्त चाफेकर यांनी मार्गदर्शन केले, ज्याचे अध्यक्ष डॉ. देवदत्त चाफेकर, डॉ. मनिष डाभी, डॉ. श्रुती तापियावाला, डॉ. जोत्स्ना झोपे, डॉ. सोनुसिंग पाटील व डॉ. धनेश वैद्य होते. यानंतर ISN वेस्ट झोनच्या उत्कृष्ट ६ संशोधन प्रकाशनांचे सादरीकरण डॉ. मोहन राजापूरकर, डॉ. शरद शेठ आणि डॉ. अतुल मुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. दिवसाची सांगता डॉ. हेमंत मेहता व डॉ. विपुल गट्टाणी यांच्या ‘नेफ्रॉलॉजी क्विझ’ ने झाली, ज्याचे परीक्षण डॉ. एल. एच. सुरतकल व डॉ. एन. के. हसे यांनी केले, तर डॉ. उमेश खन्ना (पंच), डॉ. अभिजित मोरे (स्कोर कीपर) आणि डॉ. प्रतीक शेटे (टाइम कीपर) यांनी जबाबदारी सांभाळली.

दोन्ही सभागृहांमध्ये झालेल्या या सर्व सत्रांमध्ये उपस्थित डॉक्टरांनी विचारलेल्या शंकांचे तज्ज्ञांकडून निरसन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या सत्रांची सांगता आभार प्रदर्शनाने झाली

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more
Breaking News