महापरीक्षा पोर्टलद्वारे जिल्ह्यात 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत सकाळी 10 ते 12 व दुपारी 2.30 ते 4.30 या दोन वेळेत तलाटी (गट-क) संवर्गाची पदभरतीची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी कळविले आहे.
या परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत होत आहे. उमेदवाराच्या पसंतीच्या जिल्ह्यात परिक्षा देण्यासाठी संगणक विषयक पायाभुत सोयी असणाऱ्या शाळा/ महाविद्यालयाची निवड महा-आयटीकडून करण्यात येणार आहे. राज्यभरात एकुण 122 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराने पॅनकार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँक पासबुक व आधारकार्ड या 6 पैकी एक मुळ फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
महापरीक्षा पोर्टलवरुन घेतल्या जाणाऱ्या परीक्षा चालु असतांना गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रावर निरीक्षक म्हणुन व महा-आयटीच्या मुंबई येथील कमांड रुममध्ये परिक्षा नियंत्रक म्हणुन प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे
महापरिक्षा पोर्टलवरील तसेच हॉल तिकीटावरील सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. ह्या संदर्भात अधिक माहिती/तक्रार नोंदविण्यासाठी महापरिक्षेचा टोल फ्री क्रमांक 1800 3000 7766 व enquiry@mahapariksah.gov.in ह्या मेलवर संपर्क साधण्याबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांनी केले आहे.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




