Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३, ऑगस्ट) रोजी हॉटेल साई गजानन सभागृह, अकोला रोड, श्री क्षेत्र शेगाव येथे राज्याध्यक्ष नितीन धामणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस राज्यसचिव हरिश्चंद्र काळे (अहिल्यानगर), राज्यकार्याध्यक्ष मधुकर मुंगल (नांदेड ) ,राज्य कोषाध्यक्ष महेंद्र निकम (छ. संभाजीनगर), राज्य उपाध्यक्ष नारायण पवार (सातारा), संजय बाविस्कर (नाशिक) स्नेहल नरळे पाटील (सातारा), आरती पाटील (नंदुरबार), ई, उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी, राज्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्हासचिव, पदाधिकारी सक्रिय सभासद बांधव चर्चेत सहभाग घेणार आहेत.
या बैठकीत ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाकरिता संघटनेमार्फत मंत्रालयीन स्तरावर केलेल्या कामकाजाची माहिती देणे, संघटनेच्या नावात बदल व घटनादुरुस्ती प्रस्तावावर चर्चा करून सभेची मान्यता घेणे , दिनांक २४ सप्टेंबर २०२४ व २ जून २०२५ च्या ग्रामविकास विभागाकडील निर्गमित शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे, संवर्गावरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करणे, संघटनेच्या राज्य, विभाग, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा घेणे, संघटनेच्या कामकाजाने प्रभावित होऊन इच्छुक असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांना संघटनेचे सभासदत्व बहाल करून संघटणेची व्याप्ती वाढविणे, संघटनेच्या सभासदांची नोंदणी फी व मासिक वर्गणी बाबत आढावा घेऊन पुढील ध्येय धोरण ठरविणे, हंगामी गठीत जिल्हा कार्यकारिणी यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन मान्यता देणे व नियमित करणे, सभासदांच्या अडीअडचणी बाबत चर्चा करणे, इत्यादी. अजेंड्यावरील विषयावर चर्चा होऊन ठराव पारित होणार आहेत. या बैठकीचे नियोजन वाशिम व अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी केले आहे सदर बैठकीस विदर्भातील सर्व जिल्ह्यासह उर्वरित महाराष्ट्रातील सक्रिय सभासद बांधवांनी व सर्व पदाधिकार्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माया उत्तम मोढे ग्रामपंचायत अधिकारी तांत्रिक संघटना नाशिक जिल्हा सचिव रविंद्र ठाकरे जिल्हा अध्यक्ष नाशिक सर्व जिल्हा व तालुका प्रतिनिधी यांनी केले आहे
एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्वी आयोजन
नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...





