मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

Jul 2, 2019

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम

नाशिक – सामाजिक वनीकरण विभाग, नाशिक यांचेमार्फत 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत मुंगसरे ता.जि.नाशिक येथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावर्षी सामाजिक वनीकरण विभागामार्फत 28 लाख 23 हजार वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. नगरसेवक चंद्रकांत खाडे यांचे हस्ते वटवृक्षाची लागवड करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे माजी निवृत्त संचालक का.का.चव्हाण, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, वनसंरक्षक प्रकाश लोणकर, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, तुषार चव्हाण, वरिष्ठ सेवानिवृत्त वनाधिकारी, मुंगसरे ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना भोर, उपसरपंच राजाराम पडोळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी राजन गायकवाड, सहाय्यक वनसंरक्षक त्रिंबक बिन्नर, बी. व्हि.शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम, वनपाल दिपक राजभोज, वनरक्षक श्री.हिण्डे, सुनिता देशमुख यांनी केले. सदर रोपवन सांभाळण्याची व यशस्वी करण्याची जबाबदारी उपसरपंच राजाराम पडोळ यांनी घेतली असुन श्री.पडोळ यांनी मुंगसरे ग्रामपंचायतीमार्फत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News