#Janta Ki Kavita: जागतिक कविता दिनी पीयूष मिश्रा यांनी Koo App वर सुरू केले खास अभियान

Mar 22, 2022

भारतीय सोशल मीडिया मंचाने प्रख्यात बॉलीवुड सेलेब्स आणि काव्यप्रेमींना केले आकर्षित

नाशिक : जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून सोमवारी प्रख्यात अभिनेता आणि कवी पीयूष मिश्राने देशातला पहिला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Koo App वर #JantaKiKavita (जनता की कविता) नावाचे एक अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत पीयूष मिश्राने दोन ओळींसह एका कवितेची सुरवात केली आणि युजर्ससोबत Koo वर असलेल्या कवींना यात आणखी ओळी जोडत एक सुरेख कविता बनवण्याचे आवाहन केले आहे. 19 मार्चला “#JantaKiKavita” हॅशटॅगसह लॉन्च केलेल्या या अभियानाचा उद्देश आहे अधिकाधिक युजर्सशी जोडून घेत विचारांचा एक छान धागा विणणे.

एक लेखक, कवी, गीतकार, गायक आणि संगीतकाराच्या रूपात ओळखले जाणारे पीयूष मिश्रा यांनी आपल्या आधिकृत हॅंडलवरून एक ‘कू’ पोस्ट करत अभियान सुरू केले. ही पोस्ट होती,

“बिना शक्कर की थी चाय मेरी, तुमने मुस्कुरा भर दिया, तो मीठी हो गई इस कविता को आगे बढ़ाने के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा @shambhushikhar @anamikaamber और कू पर जुड़े सभी कवि और कवयित्रियों को। कल विश्व कविता दिवस पर Koo ने की है सबसे बड़ी कविता लिखने की पहल। इस कविता में अपनी पंक्तियां जोड़िए और आगे लोगों को टैग करते जाइए #JantaKiKavita के साथ।”

खरेतर, कू अॅपवर ‘कविता’ सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या कम्यूनिटीजपैकी आहे. कवींचा एक मोठा गट असा आहे, जो हिंदी भाषेत लिहीतो आणि कू करतो. या अभियानाचा उद्देश प्रतिभावंत लोक आणि तरुण कवींना दर्जेदार कवितांसह समोर येण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. या अभियानांतर्गत आधीच विशेषकरून प्रादेशिक कवींमध्ये एक उत्साह पहायला मिळाला, विविध विषयांवर आपल्या मूळ भाषेत स्वत:ला व्यक्त करत राहतात.

पृथ्वी यांची कविता पहा खालील लिंक वर

प्रांजल चौहाण यांची कविता पहा खालील लिंक वर

 

‘कू’च्या या पुढाकारात प्रवीण डबास, रागिनी खन्ना आणि सौंदर्या शर्मासारखे बॉलीवुडचे इतरही सेलेब्ज सहभागी झाले. या सगळ्यांनी अतिशय उत्साहात भाग घेत आपापल्या कविता चाहत्यांसमोर ठेवल्या.

रागिनी खन्नाण

 

सौंदर्या शर्मा

‘कू’ भारताचा एकमेव बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे, जो यूजर्सना त्यांच्या आवडीच्या भाषेत आपले विचार व्यक्त करण्यासाठी सक्षम बनवतो. हा मंच प्रादेशिक कलाकार, कवी, राजकीय नेते आणि लेखकांना प्रोत्साहन देण्यास सतत तत्पर असतो. हे विशेषत: असे कलाकार असतात, ज्यांना इतर सोशल मंचांवर त्यांचा अवकाश मिळत नाही.
“कू’ त्या लोकांना एक मंच देत भारताचे व्यापक लोकजीवन आणि भाषिक विविधतेचे एक उदाहरणही देतो. भारतात असे लोक बहुसंख्य आहेत जे आपल्या मातृभाषेत विचार व्यक्त करणे व बोलणे पसंत करतात.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News