‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’मध्ये मराठी मनोरंजन सृष्टीमधीलविनोदवीरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या पुरस्कार सोहळ्यातील आणखी एक महत्त्वाचा भाग असतो, तोम्हणजे’जीवनगौरव’ पुरस्कार! दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा पुरस्कारवितरित करण्यात आला. शुभा खोटे आणि विजू खोटे हे यंदाच्या यापुरस्काराचे मानकरी ठरले. यंदाचे जीवनगौरव पुरस्कारवितरणनेहमीपेक्षा निराळे आणि हटके होते.’बॉलीवूड स्टार’ धर्मेंद्रजीयांच्या हस्ते हे विशेष पारितोषिक देण्यात आले.
धर्मेंद्रजी यांची उपस्थिती या सोहळ्याला अगदी साजेशी अशी ठरली.खास वेळ काढून, लोणावळ्याहून मुंबईत येत त्यांनी या सोहळ्यासाठीहजेरी लावली. पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचेस्वागतकरण्यात आले. मुंबई शहराने आपल्यावर भरभरून प्रेम केल्याचे, यारंगमंचावर देखील आवर्जून सांगायला धर्मेंद्रजी विसरले नाहीत. ‘शोले’सिनेमात एकत्र काम केलेली ही जोडी, काहीकाळासाठी जुन्याआठवणीत रमली होती. या चित्रपटातील ‘मैंने आपका नमक खाया हैं’हा सुप्रसिद्ध संवाद, यानिमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऐकायलामिळाला. शुभा खोटे व विजू खोटे यांना’जीवनगौरव’ देऊन सन्मानितकरत असतांना धरमजींना सुद्धा अभिमान वाटला. धर्मेंद्रजींची यासोहळ्यातील उपस्थिती आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावना, हाप्रत्येकासाठी आपुलकीचा भाग होता. एकूणच छान जमून आलेला ‘झीटॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०१९’ हा सोहळा, प्रेक्षकांसाठी दुग्धशर्करायोग ठरेल. त्यामुळे पाहायला विसरू नका ‘झी टॉकीज कॉमेडीअवॉर्ड्स २०१९’ रविवार २८ जुलैसंध्याकाळी ६.३० वाजता फक्तआपल्या लाडक्या झी टॉकीजवर.






