एक दशकाहून अधिक काळ, प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठीचित्रपट वाहिनी, अर्थातच आपले सगळ्यांचे लाडके ‘झी टॉकीज’ हेदर्जेदार मराठी चित्रपटांचा खजिना नेहमीच प्रेक्षकांसाठी घेऊन येतअसते. जुन्या व नव्या चित्रपटांचा सुंदर खजिना, विविध नाटकं, विनोदीकार्यक्रम अशी छान मेजवानी या वाहिनीवर रोज अनुभवायला मिळते.आठवड्यातील सुट्टीच्या दिवशु, म्हणजेच रविवारी, झी टॉकीजआपल्यासाठी घेऊन येतं, धमाकेदार ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’! येत्यारविवारी, म्हणजेच १८ ऑगस्टला, ‘रंपाट’ हा असाच एक ‘सुपरफास्ट’चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘रंपाट’ हा चित्रपट म्हणजे, अभिनय क्षेत्रात आपली छाप पाडूइच्छिणाऱ्या दोन तरुणांची कथा आहे. कोल्हापूर शहरातील मल्लअसलेली मुन्नी आणि फिल्मी आईचा फिल्मी मुलगा मिथुन, ही यासिनेमातील मुख्य पात्रं आहेत. लहानपणापासून दोघांचीहीअभिनयातील सुपरस्टार होण्याची मनिषा आहे. आपलं हे स्वप्न पूर्णकरण्यासाठी दोघेही मायानगरी मुंबईत येतात आणि चित्रपटालासुरुवात होते. अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना तोंड देत ते आपली वाटचालसुरू ठेवतात. त्यांच्या या संघर्षाच्या कहाणीतून, आजच्या तरुणांनाअनेक गोष्टी शिकायला मिळतील. छोट्यामोठ्या यशाने हुरळून नजाता, पुढचा विचार करून, आपल्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करतराहण्याची शिकवण या सिनेमातून तरुणांना मिळेल. यशाचा मार्ग हाकधीच सोपा असत नाही. यश मिळवणे हे सहजसाध्य काम मुळीचनाही. या मुन्नी आणि मिथुन यांनी आपली योग्य वाट शोधली आहे का?त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यात ते यशस्वी होतील का?
हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका, एक ‘रंपाट’ वर्ल्डटेलिव्हिजन प्रीमियर; रविवार १८ ऑगस्ट रोजी, दुपारी १२ वसंध्याकाळी ६ वाजता, फक्त आपल्या लाडक्या झी टॉकीजवर!!!





