‘आंगन – अपनों का’ : आपल्या वडिलांना प्राधान्य देण्याबाबत एका मुलीच्या अढळ निष्ठेची कहाणी ; पहा येत्या नोव्हेंबरमध्ये सोनी सबवर लवकरच !

Nov 13, 2023

एका स्त्रीची प्राथमिकता लग्नानंतर बदलायला हवी का या विषयाचा शोध घेणारी मालिका

नासिक :प्रभावी कथानके आणि काळाशी संबद्ध कंटेंट देण्याबद्दल ओळखली जाणारी सोनी सब वाहिनी ‘आंगन – अपनों का’ ही आपल्या परंपरेला साजेशी मालिका घेऊन येत आहे. एका मुलीला आपल्या वाडिलांबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यांच्याबद्दलची जबाबदारी या विषयाभोवती फिरणाऱ्या या मालिकेत मनातील भावनिक संघर्षाचा सामना करणाऱ्या आणि लग्नानंतर वडिलांना सोडून जाण्याच्या प्रथेला आव्हान देणाऱ्या मुलीची गोष्ट आहे. तिला वाटते की केवळ तिचे लग्न झाल्यामुळे तिच्या लेखी वडिलांना असलेली प्राथमिकता बदलण्याचे काहीच कारण नाही. लग्न करून नवीन घरी जातानाची उत्कंठा आणि आपल्या माता-पित्याबद्दलचे प्रेम आणि काळजी या संघर्षात अडकलेल्या स्त्रीची मानसिकता दाखवणारे हे चित्रण आहे. ही मालिका काही सामाजिक संकेतांविरुद्ध प्रश्न उपस्थित करते आणि हे सांगण्याचा प्रयत्न करते की विवाहाविषयी वेगळा दृष्टिकोन देखील असू शकतो.

‘आंगन – अपनों का’ मालिकेत एका पल्लवी नामक स्वावलंबी आणि खंबीर मुलीची गोष्ट आहे. ही भूमिका साकारत आहे आयुषी खुराना. आपल्या वाडिलांबद्दल तिला अपार प्रेम आहे. तिचे वडील ‘जयदेव’ साकारले आहेत महेश ठाकूर या अभिनेत्याने. या दोघांव्यतिरिक्त या मालिकेत नीता शेट्टी आणि अदिती राठोड यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. “लग्नानंतर स्त्रीची भूमिका कशी असायला हवी याविषयी एक वेगळा दृष्टिकोन देणारी मालिका ‘आंगन – अपनों का’ सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आजवर टेलिव्हिजनवर हा विषय हाताळण्यात आलेला नाही, त्यामुळे आमच्या प्रेक्षकांना तो नक्की भावेल. एक वाहिनी म्हणून रोचक, वैविध्यपूर्ण दृष्टिकोन देणाऱ्या, प्रेक्षकांच्या विचारांना चालना देणाऱ्या आणि त्याचबरोबर त्यांना भविष्याची आशा दाखवणाऱ्या मालिका देण्याचा आमचा प्रयत्न असतो. ‘आंगन – अपनों का’ म्हणजे त्याच दिशेने आम्ही उचललेले आणखी एक पाऊल आहे.”                                                        :- नीरज व्यास, बिझनेस हेड, सोनी सब

“लग्नानंतर स्त्रीने आपल्या आई-वडिलांचे घर सोडून सासरी जाण्याच्या प्रथेविषयी एक नवीन दृष्टिकोन सादर करणारी ही मालिका आहे. मी स्वतः पिता असल्यामुळे आपल्या मुलीबद्दल जयदेवचे प्रेम मी समजू शकतो. मला खात्री आहे की पिता आणि मुलीमधील हे जिव्हाळ्याचे नाते प्रेक्षकांच्या अंतःकरणाला स्पर्शून जाईल. आणि या कथानकामुळे कौटुंबिक नाती आणि महिलांची प्राथमिकता याबद्दल एका सार्थ चर्चेला चालना मिळेल.”
पल्लवी शर्माची भूमिका करणारी आयुषी खुरानाआंगनची पटकथा वाचल्या वाचल्या मला त्यातील आगळेवेगळेपण ध्यानात आले. टेलिव्हिजनवर या आधी हा विषय मी पाहिलेला नव्हता. पल्लवीच्या व्यक्तिरेखेशी मला साम्य वाटते, कारण अनेक महिला ज्या वैचारिक संघर्षाचा सामना करत असतात, त्याबद्दल तिचे मत खूप प्रामाणिक आहे. तिचे विचार सुस्पष्ट आहेत. कोणत्याही गोष्टीपेक्षा तिच्या लेखी तिचे वाडिलांवरील प्रेम आणि त्यांच्याबद्दलची तिची निष्ठा अधिक महत्त्वाची आहे. या गोष्टीचे मला कौतुक वाटते. मला वाटते की, प्रेक्षकांना तिचे विचार आणि तिचे वागणे पटेल, जसे ते मला पटले आहे.                                                                                                                          :- जयदेव शर्माची भूमिका करणारा महेश ठाकूर

 

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News