मराठयांचे शौर्य गाथा सांगणारा ‘ फत्‍तेशिकस्त ‘ सिनेमा, भारतातील पहिले सर्जिकल स्ट्राईक ?

Oct 22, 2019

शाहिस्ताखानाच्या 1 लाख फौजेला भारी पडले केवळ 90 मराठे
आता थेट घुसायचं आणि गनिम तोडायचा..

नाशिक : ऐन दिवाळीच्या हंगामात प्रेक्षकांच्या भेटीला फत्‍तेशिकस्त सिनेमा येत आहे. चित्रपटाचे वैशिष्टये म्हणजे सिनेमाचे चित्रीकरण महाराजांच्या राजगड, पन्हाळा, अशा अनेक गड किल्लांवर झालेले आहे. फर्जंदच्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची यशस्वी वीरगाथेचे वर्णन फत्‍तेशिकस्त सिनेमात पहायला मिळणार आहे.सिनेमात अभिनेता चिन्मय मंडलेकर यांची महाराजांची प्रमुख भुमिका, अजय पुरकर यांची तानाजी मालुसरे, हरिश दुधाडे यांची बहिरजी नाईक व्यक्तिरेखा साकारत असून या चित्रपटात विशेष म्हणजे त्यांचे 9 बहुरुपांचे दर्शन पहायला मिळणार आहे.विक्रम गायकवाड यांनी चिमणाजी देशपांडे म्हणून व्यक्तिरेखा साकारली आहे.त्याचबरोबर चित्रपटात प्रसाद लिमये, अक्षय वाघमारे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, तृप्ती तोरडमल, रुची सावर्ण, नक्षत्रा मेढेकर अभिनय केले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणात स्थानिक गांवकरी बरोबर वरील कलाकलाकारांनी राजगडावरील संवर्धनाला हातभार म्हणून बांधकामांचे काम देखील केले. कलाकारांच्या या योगदानामुळे, नव्या पिढीला आदर्श देत किल्ले बांधणीची मोहिम हाती घेत जुन्या प्रथेला उजाळा दिला.
ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड़स क्रिएशन्स प्रस्तुत फत्तेशिकस्त येत्या 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून आपल्या जवळच्या सिनेमागृहात नक्की पहा!

सिनेमाचे कथानक
सन 1659… अफजलखानाचं पारिपत्य केल्यानंतर शिवरायांनी क्षणाचीही विश्रांती न घेता तळकोकण ताब्यात घेतले आणि ते त्यांच्या लाडक्या पन्हाळगडावर येउन विसावले. दुदैवाने आदिलशहाचा सरदार सिध्दी जौहर याच्या वेढयात राजे पन्हाळगडावर अडकले… ही बातमी मिळताच औरंगजेबाने राजांचा पुरता बिमोड करण्याच्या हेतूने आपला मामा सेनापती नवाब शाहिस्ताखान याला दख्खनच्या स्वारीवर पाठवले. स्वराज्य दोन्ही बाजूंनी कचाटयात सापडले. आपल्या चतुराईने आणि बाजीप्रभू देशपांडे व वीर बांदलांच्या बलिदानाने शिवराय पन्हाळगडावरुन निसटण्यात यशस्वी झाले. राजगडावर पोचल्यानंतर त्यांना लक्षात आले की जिजाउंच्या नेतृत्वाखाली शाहिस्ताखानच्या मोठया आक्रमणाला मराठी वीर आणि मराठी रयत शौर्याने तोंड देत आहेत. चाकणचा किल्ला जिंकायला शाहिस्ताखानाला तब्बल सहा महिने लागले.. केवळ 600 मावळयांनी त्याच्या 80 हजार फौजेला 6 महिने झुंजवले… हे लक्षात घेउन शिवरायांना पकडायचे असेल किंवा मारायचे असेल तर त्याच्या किल्ल्यावरती आक्रमण करण्यापेक्षा रयतेवर जुलूम केला तर हा रयतेवर प्रेम करणारा राजा नक्कीच आपल्याला शरण येईल, असा विचार शाहीस्ताखानाने केला आणि आपल्या सरदारांना पुणे परिसरातल्या मराठी जनेवर अत्याचार करण्याचा हुकूम दिला… शाहिस्ताखान स्वत: शिवरायांचा लालमहाल बळकावून तिथे राहू लागला. तब्बल 3 वर्षे त्याने पुण्यात तळ ठोकला. पुण्याची अवस्था कालिया नागाच्या विषाने जहरी बनलेल्या यमुनेच्या डोहाप्रमाणे झाली. स्वराज्यातल्या रयतेला मुघल्यांच्या जाचातून सोडवायचे असेल तर काहीतरी अकल्पित पराक्रम करणे गरजेचे आहे हे महाराजांच्या लक्षात आले आणि तयांनी बहिर्जींच्या मदतीने एक धाडसी मोहीम आखली. शाहिस्ताखानाच्या 1 लाख फौजेमध्ये केवळ 90 मराठयांनी घुसायचे आणि अफजलखानाप्रमाणे मुघल सैन्याचा प्रमुख सेनापती शाहिस्ताखानाला ठार करायचे. महाराजांची ही धाडसी मोहिम पूर्ण झाली ?स्वराज्याभोवती शाहिस्ताखानरुपी अजगराचा पडलेला विळखा उठवण्यास शिवराय आणि त्यांचे वीर यशस्वी झाले का? आणि स्वराज्यासाठी आखलेली ही भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक कशी पार पडली? याचा थरारक अनुभव देणारा चित्रपट फत्तेशिकस्त.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News