शैव व वैष्णव पंथ एकत्र येण्याचा दिवस म्हणून वैकुंठ चतुर्दशीकडे बघितले जाते.देश आपला जरी विविध जाती धर्मांचा असला तरी अनेक धर्मातील पंथाकडून एकच शिकवण भेटती, ती म्हणजे आपण सर्व एकच ईश्वराची लेकरे आहोत. जसे सर्व नदयांचे पाण्याचा प्रवाह जरी वेगवेगळा असला तरी शेवटी त्याचे विलीनीकरण समुद्रात होते . हयाच तत्वाला अनुसरुन आज हरीहर भेट सविस्तर वर्णन आपण करणार आहोत.
प्राचीन कथेनुसार भगवान विष्णु महादेवाची पूजा करण्यासाठी तिर्थ क्षेत्र काशी नगरीत आले होते. तेथे त्यांनी मणिकर्णिकेत आंघोळ केल्यानंतर एक हजार स्वर्ण कमलांनी बाबा विश्वनाथांचे पूजा करण्याचा संकल्प केला. पूजा करता असतांना महादेवांनी भगवान विष्णूची परिक्षा घेण्याचे ठरविले आणि एक हजार स्वर्ण पुष्पांमधील एक कमळ कमी केला. जेव्हा भगवान विष्णू पूजा करत असतांना त्यांना दिसले की यातील एक स्वर्ण कमळ कमी आहे, तेव्हा त्याची पुर्तता करण्यासाठी त्यांना आठविले की आपले डोळे सुध्दा कमळासारखे म्हणजे कमल नयन आहे हे विचार मनात येतात त्यांनी आपला एक डोळा महादेवांवर अपुर्ण करुन संकल्पित पूजा संपुर्ण केली.
भगवान विष्णुची भक्ति बघून महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले ” हे पिंताबर तुझ्या भक्तिेने मी प्रसन्न झालो आहे, हया जगात तुझ्या इतका कोणीही माझा मोठा भक्ति होणार नाही, आजचा हा दिवस वैकुंठ चतुर्दशी नावाने म्हटली जाईल. हया दिवस जो कोणी प्रथम तुझे पूजन करेल त्याला वैकुंठ धाम प्राप्त होईल. हयाच दिवशी महादेवांनी भगवान विष्णुना सुदर्शन चक्र प्रदान केले आहे.
का केली जाते हरिहर भेट ?
देवशयनी एकादशीपासून ते देवउठनी (प्रबोधिनी) एकादशी हया चार्तुमासात भगवान विष्णू राजा बळीचे पाताळ लोकांत विश्रांतीसाठी जातात त्यामुळे याकाळात कोणतेही मांगलिक शुभ कार्य केले जात नाही. त्यानंतर जगाचा सर्व पालनपोषणांचा कार्यभार चार महिने संभाळण्याचे काम महादेवांकडे देतात. देवउठनी(प्रबोधिनी) एकादशीला विष्णू निद्रेतून जागृत होऊन वैकुंठ चतुर्दशीला महादेव जगाचा सर्व भार पुन्हा भगान विष्णुकडे देऊन हिमालयाकडे तपोध्यानासाठी रवाना होतात. हया दोंघाच्या होणा-या भेटीला हरीहर भेट म्हणून बघितले जाते. केवळ हयाच दिवशी महादेवाला तुळशीचे पाने व विष्णूला बेलाची पाने चढविले जातात. मान्यता अनुसार रात्री मध्य: वेळेला विष्णू आणि महादेवांची भेट होत असते. हया दिवशी संध्याकाळी नर्मदेश्वर शिवलिंगावर तुळशीचे पाने चढवावी तर भगवान विष्णुवर बेलाचे पाने चढविल्यास वर्षाभरातील येणा-या सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते.






