Nashik : येत्या नोव्हेंबर महिन्यात विहंगम योग संस्थान आपला १०२ वा वार्षिकोत्सव वाराणसी येथील स्वर्वेद महामंदिर धामच्या परिसरात साजरा करणार आहे ; ज्याला समर्पण दीप अध्यात्म महोत्सव असे संबोधण्यात आलेले आहे. याच कार्यक्रमात २५० एकर इतक्या विस्तृत जागेत २५ हजार कुंडीय-स्वर्वेद ज्ञान महायज्ञही संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी एक भव्य अशी राष्ट्रव्यापी आध्यात्मिक स्वर्वेद सन्देश यात्रा सुरू झालेली आहे. विहंगम योगाचा संपूर्ण सिध्दान्त असलेल्या स्वर्वेद महाग्रंथाचा प्रकाशात आत्मजागरण आणि आत्मजागरणाद्वारे राष्ट्रजागरण करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे ; जिचे संचालन व मार्गदर्शन स्वतः परमपूज्य संतप्रवर श्री. विज्ञानदेवजी महाराज करीत आहेत.
२९ जूनला काश्मीरच्या श्रीनगर येथील ऐतिहासिक लाल चौकात आपला राष्ट्रध्वज फडकवून सुरू झालेली ही यात्रा देशातील सर्व राज्यांच्या मुख्य शहरांतून , ग्रामीण भागांतून मार्गक्रमण करीत जवळपास ४० हजार किलोमीटर रस्त्यावरून प्रवास करून शेवटी कन्याकुमारीपर्यंत जाऊन तिची सांगता होईल. देशाच्या सैनिकांचा सन्मान , गोशाळांचा विस्तार आणि गुरूकुल शिक्षणाचा विस्तार यांचा संकल्प दृढ करणे हाही या यात्रेचा उद्देश आहे.
देशासाठी वीरगती पत्करलेल्या जवानांच्या स्मरणार्थ आणि सैनिकांच्या सन्मानार्थ दीपोत्सवाचा भव्य कार्यक्रमही आयोजित केलेला आहे. मानवाच्या जीवनाचे संविधान ज्यात निहित आहे अशा ब्रह्मविद्या विहंगम योगाचे संपूर्ण तत्वज्ञान ज्यात अंतर्भूत केलेले आहे, अशा स्वर्वेद महाग्रंथास समर्पित असलेल्या स्वर्वेद महामंदिरात भारताच्या संविधान दिनी म्हणजे २६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी हजारो दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
विविध राज्यांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून ही आध्यात्मिक यात्रा आपल्या नाशिक शहरात २९ सप्टेंबरला पोहोचणार आहे. या निमित्ताने परम आराध्य सुपूज्य संतप्रवरजींच्या पावन उपस्थितीत एक आध्यात्मिक कार्यक्रम २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ११.३० ते २ या वेळेत धनदाई लाॅन्स , हनुमान वाडी , पंचवटी येथे होणार आहे. कार्यक्रमात भोजन -महाप्रसादाचीही व्यवस्था केलेली आहे.
कार्यक्रम निःशुल्क आणि सर्वांसाठी खुला आहे. तरी आपण सहकुटुंब , इष्टमित्रांसह उपस्थित राहून या आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विहंगम योग नाशिक शाखेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती श्री. योगेश पाटील ( गडाख) यांनी केले आहे.
संपर्क सुत्र – 9422754200 , 9422945727 , 7620874738.






