डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

Sep 15, 2026

नाशिक : यंदाच्या गणेश महोत्सवा निमित्त धर्मपाल सत्यपाल ग्रुप (डीएस ग्रुप) या आघाडीच्या एफएमसीजी समूह आणि बहुव्यवसायिक कंपनीच्या लोकप्रिय ब्रँडपैकी एक असलेल्या पल्स कँडी कडून
महाराष्ट्रात सलग पाचव्या वर्षी गणेश महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ या व्यापक ब्रँड संकल्पनेला पुढे नेत हा उत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्र भरगणपती उत्सवाला लाभलेली सामूहिक भावना, परंपरा आणि भक्ती यांना केंद्रस्थानी ठेवत पल्स कँडीने गेल्या काही वर्षांत आपल्या गणेशोत्सवाच्या संकल्पनेत सातत्याने नवनवीन उपक्रमांची भर घातली आहे. ग्राहकांचा सहभाग अधिक वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण अनुभव निर्माण करण्याबरोबरच उत्सवाच्या मूळ भावनेशीही ब्रँडने सातत्याने नाते कायम ठेवले आहे. ही मोहीम १४ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि जळगाव या प्रमुख बाजारपेठांमध्ये राबविण्यात येणार आहे.

या व्यापक संकल्पने अंतर्गत ग्राहकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ पल्स से अर्पण, बप्पा को समर्पण’ या मोहिमेद्वारे नाविन्यपूर्ण अनुभवाची ही परंपरा पुढे नेण्यात येत आहे. या उपक्रमात भक्तांना परस्परसंवादी आणि मूषकावर आधारित अनुभवाच्या माध्यमातून बाप्पाला वैयक्तिक स्वरूपात डिजिटल अर्पण करण्याची संधी मिळणार आहे.भक्तीची शाश्वत भावना, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांचासहभाग यांचा संगम साधत हा उपक्रम पारंपरिक भक्तीला आधुनिक स्वरूप देतो. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असल्याने प्रत्येक भक्ताला स्वतःच्या इच्छेनुसार बाप्पाला अर्पण करता येणे अनेकदाशक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन ‘ पल्स से अर्पण, बप्पा को समर्पण’ ’ या उपक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना बाप्पाला वैयक्तिक डिजिटल अर्पण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भक्ताने आपले अर्पण तयार केल्यानंतर घंटानाद होतो आणि भगवान गणेशांचे दिव्य दूत असलेला मूषक विविध आकर्षक दृश्यरूपांमध्ये प्रकट होऊन भक्ताने निवडलेले अर्पण बाप्पा पर्यंत पोहोचवतो. या
संपूर्ण प्रवासाच्या शेवटी पडद्यावर अर्पण पूर्ण झाल्याची पुष्टी केली जाते. त्यामुळे भक्तांसाठी हा एक संस्मरणीय आणि वैयक्तिक अनुभव ठरत असल्‍याचे डीएस ग्रुपच्या कन्फेक्शनरी विभागातील मार्केटिंगचे
वरिष्ठ महाव्यवस्थापक आशिष भार्गव यांनी सांगितले

अजून बातम्या वाचा..

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News