नाशिक : आर्ट ऑफ लिव्हिंग, वैदिक धर्म संस्थान आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये १६, १७ व १८ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला पूज्य स्वामी वैशंपायनजी यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात हा सोहळा साजरा होणार आहे.

या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा, अध्यात्म आणि भक्तिभाव यांचा संगम अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30ला महागणपती, वास्तुशांती व नवग्रह होम साडेदहा वाजता एक हजार आठ भाविकांचे सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सायंकाळी सहा वाजेला श्री सुदर्शन होम सात वाजून 45 मिनिटांनी 1008 भाविकांचे सामूहिक श्री विष्णू सहस्त्रनाम पठण संकल्प दिनांक 17 ऑक्टोबर सकाळी आठ वाजता रूद्रपुजा व रूद्र होम साडेदहा वाजता एक हजार आठ कन्या पूजन त्यानिमित्ताने समाजा मध्ये कन्या पूजनाचा संदेश जाणार आहे सायंकाळी सहा वाजता कलश स्थापना व चंडीपाठ होणार आहे तसेच रात्री सात वाजता 1008 भाविकांचे सामूहिक श्रीसूक्तम् पठण होणार आहे व देवीची आराधना, आध्यात्मिक विचार आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता व चैतन्य निर्माण करण्याचा उद्देश आहे.दि 18/10/26 रोजी सकाळी सात ते 12.30 गो अश्व पूजन ,सु मंगलिका पूजन कन्या पूजन श्री चंडी होम पूर्णाहुती
या कार्यक्रमासाठी महापौर सौ. हिमगौरीताई आहेर-आडके, उपमहापौर श्री. विलास शिंदे आणि स्थायी समितीचे सभापती श्री. मच्छिंद्र सानप यांची उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या सहभागामुळे या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.
नाशिकमधील टक्कर डोम येथे हा उत्सव आयोजित करण्यात आला असून, भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने आर्ट ऑफ लिविंग महाराष्ट्र अपेक्स मेंबर डॉ उमेश मराठे व महाराष्ट्र टीचर कॉर्डिनेटर दीपक राव व VDS Coordinatior सतिश जंगले यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण : टक्कर डोम, नाशिक. संपर्क : ८३०८५७४८९९ / ९८२३०६७३४४






