‘ गर्ल्स ‘ चित्रपटाच्या ट्रेलरला लाखोंनी व्ह्यूज ! २९ नोव्हेंबर रोजी होणार सर्वत्र प्रदर्शित

Nov 13, 2019

मुंबई : विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘गर्ल्स’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाबद्दल सर्वांना उत्सुकता होती. ‘बॉईज’, ‘बॉईज २’ सारखे जबरदस्त चित्रपट दिल्यांनतर आता ‘गर्ल्स’मध्ये सुद्धा काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार, याची सर्वांनाच खात्री होती आणि मुळात ‘गर्ल्स’ या नावातच सर्व काही सामावले आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता होती. ‘गर्ल्स’ चित्रपटाच्या एक एक गोष्टी गुलदस्त्याबाहेर आल्यानंतर आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. पहिल्याच दिवशी या ट्रेलरला सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून युट्यूबवर हा ट्रेलर सध्या ट्रेंडिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रेक्षकांकडून या ट्रेलरला पसंतीची पोचपावती मिळत आहे.
‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’, ‘कायरा कुमार क्रिएशन्स’ प्रस्तुत आणि ‘अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन’च्या अंतर्गत ‘गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. तर चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे. हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News