पाचवे वेदाची निर्मिती थांबविण्यासाठी झाली कालभैरव महाराजांची उत्पत्ती ; उज्जैन नगरीचे आहे सेनापती

Nov 19, 2019

कालभैरवांच्या पुजनाने वाईट ग्रह शुभ फळ प्रदान करतात

आज कालभैरव जयंतीच्या निमित्ताने महाराजांच्या स्मृतीचा उजाळा म्हणून आजचा विशेष लेख भैरव महाराजांच्या भक्तांसाठी सादर करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. देवांचे देव महादेव सर्वांचे दु:ख दुर करणारे आहे. मग ते देव किंवा दानव असो. समुद्रमंथनाच्या वेळीस स्वत: विषाचे पान करुन देवतांना अमृतपान करुन दिले.महाकालची नगरी उज्जैन मधील महाकालभैरव मुळ मंदिर असून या ठिकाणी भैरव स्वत: भक्तांच्या हातून मंदिरापान करतात. अंदाजे सुमारे सहा हजार वर्ष जुने हया मंदिरात पुर्वी तांत्रिक कर्मकांड केले जात असे बोलले जाते . त्यामुळे त्वेळेस या मंदिरात तामसिक वस्तुचे मास, मदिराचा भोग दिला जात असे परंतु हळूहळू तांत्रिक कार्य कमी होत गेले परंतु आज ही बाबा सर्वसाधारण भक्तांच्या हातून मदिरा पान करत आहे.याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एका ब्रिटिश अधिकाऱ्यांने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या आसपास खोदखुदाई केली परंतु काहीही मिळाले नाही शेवटी दैवतावर विश्वास ठेवून तो अधिकारी कालभैरवांचा भक्त बनला. आज ही या ठिकाणी बाबा मदिरापान करुन भक्तांच्या वाईट गुणांचे व पापाचे सेवन करुन स्वत: वर घेतात.
भक्तांचे नवस पुर्ण करणारे म्हणून कालभैरवांची ख्याती आहे. मराठे साम्राज्याच्या वेळीस महादेवजी शिंदे यांनी देवाला नवस केला होता. पानिपत लढाई हारल्यानंतर स्वराज्य वाचविण्यासाठी त्यांनी आपली पगडी महाकालभैरवांच्या चरणी ठेवली होती. त्यानंतर महादेवजी शिंदे प्रत्येक लढाईत विजय प्राप्त करत गेले.नवसपुर्ती हेतू त्यांनी हया मंदिराचा जीर्णोध्दार केला. त्यावेळे पासून महाकालभैरवांना मराठे सरदारांची पगडी डोक्यांवर ठेवली जात आहे.

कालभैरव उत्पत्ती :- स्कंद पुराणातील वर्णानुसार ब्रम्ह देवांनी चार वेदांची रचना केल्यानंतर पाचवा वेद निार्मित करण्याचे ठरविले होते. पाचवे वेदाच्या निर्मिती मुळे संसारीक चक्रामध्ये बाधा निर्माण होणार म्हणून सर्व देवतांनी पाचवे वेदाची निर्मिती न व्हावी म्हणून महादेवाला साकडे घातले. महादेवांनी ब्रम्हदेवाला पाचवा वेद निर्मिती करण्यापासून थांबविले परंतु ब्रम्हदेवामध्ये वाढलेल्या अहंकारामुळे त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. महादेवांना या गोष्टीचा राग आला आणि त्यांच्या तिस-या नेत्रातून क्रोधआग्नि प्रज्वलित होऊन कालभैरव निर्माण झाले. महादेवाच्या कालभैरव रौद्ररुपाने ब्रहमदेवाचे पाचवे डोके धडापासून वेगळे केले.ब्रहमहत्याचे दोष कालभैरवांवर लागल्यामुळे ते ठिकठिकाणी पृथ्वीवर फिरु लागले परंतु त्यांना मुक्ति नाही मिळाली. मग त्यांनी पुन्हा शिवआराधना करुन शिप्रा नदीत आंघोळ करुन तपोसाधना केली.असे केल्याने कालभैरव दोष मुक्त झाले आणि कायमस्वरुपी उज्जैन नगरीत स्थापीत झाले.
जातकाच्या जन्मकुंडलीत वाईट ग्रहांमुळे जीवनात त्रास होत असेल तर नित्य दर रविवारी बाबांची श्रध्दापुर्वक भक्ती केली तर निश्चितीच सुटका होते.

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News