22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

Jan 19, 2024

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ या दिव्य कहाणीने प्रेक्षकांच्या मनाच्या तारा छेडल्या आहेत. आत्तापर्यंत या मालिकेत प्रेक्षकांनी श्रीराम जन्म, गुरुकुलातून परत आल्यानंतर आपला पिता राजा दशरथाशी झालेली त्याची भेट, त्राटिका राक्षसीशी त्याने केलेले युद्ध पाहिले आहे. आणि आता प्रेक्षक सीता-स्वयंवराचा सुंदर आणि महत्त्वाचा प्रसंग पडद्यावर अनुभवत आहेत.

एका शापामुळे शिळा होऊन पडलेल्या अहिल्येचा उद्धार केल्यानंतर भगवान श्रीराम विश्वामित्र ऋषींसोबत मिथीला नगरीत येऊन पोहोचतात. येथे जनक राजाने आपल्या महालात योजलेल्या सीता स्वयंवरात श्रीराम सहभागी होतात. जनक राजा पण जाहीर करतो की, जो कुणी शिव धनुष्य उचलू शकेल, त्याला त्याची कन्या सीता वरमाला घालेल. श्रीराम केवळ ते धनुष्य उचलत नाहीत तर त्याला प्रत्यंचा लावून ते वाकवतात सुद्धा आणि ते धनुष्य मोडून पडते! अशाप्रकारे, सीता श्रीरामाशी विवाहबद्ध होते आणि सीता स्वयंवराचे समापन होते.

मालिकेत सध्या सुरू असलेला उत्कंठावर्धक आणि रोमांचक प्रसंगाविषयी आणि प्राची बन्सल या आपल्या सहकलाकारासोबत काम करण्याच्या आपल्या अनुभवाविषयी बोलताना अभिनेता सुजय रेऊ म्हणतो, “हा संपूर्ण कथाभाग म्हणजे एक अद्भुत अनुभव होता. आम्ही हे दृश्य खूप भव्य स्वरूपात साकारले आहे. वेगवेगळ्या भावना यावेळी प्रदर्शित झाल्या. लोकांमधील हर्षोल्लास, रामाने शिवधनुष्य भंग केल्यावर सीतेला झालेला आनंद आणि या उन्मादक वतावरणातही श्रीरामाचे गांभीर्य आणि आपल्याला प्रिय अशी अर्धांगिनी लाभल्याचा आनंद. माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता. प्राची फार समजूतदार सह-कलाकार आहे. राम आणि सीता यांच्यातील प्रेमाचा परिचय देणारा एकमेकांबद्दल आदर, विश्वास आणि एकमेकांविषयीचा समजूतदारपणा साकारण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे.”

‘श्रीमद् रामायण’ चे आत्तापर्यंत झालेले सर्व एपिसोड बघा 22 जानेवारी रोजी सकाळी 9.00 ते रात्री 7.30 पर्यंत फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर:

https://www.instagram.com/reel/C2PUTuGLs84/?igsh=bHNnOGFhZnBmb214

अजून बातम्या वाचा..

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

नाशिक : यंदाच्या गणेश महोत्सवा निमित्त धर्मपाल सत्यपाल ग्रुप (डीएस ग्रुप) या आघाडीच्या एफएमसीजी...

read more
धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
Breaking News