आपले स्वामी बोलतात.. “ माते जा….. !! तुझी इच्छा पूर्ण होईल..!!”

Nov 23, 2019

स्वामी लीला ||

स्वामी महाराज म्हणजे कृपेचा सागर आहे.. अक्कलकोट मध्ये सगुण रुपात लीला करत असतांना.. जो कोणी स्वामींकडे येई तो कधी रिकामा हाती परत गेला असेल असे आजपर्यंत वाचनात आलेले नाही.. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पात्रतेनुसार स्वामींनी भरपूर दिले.. अहो !! पात्रता नसेल तर त्याची पात्रता वाढवून स्वामींनी त्यास भरपूर दिले.. असो. असेच एकदा एक ब्राम्हण जोडपं स्वामींची ख्याती ऐकून मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून अक्कलकोट नगरीत येतात.. त्यास मुलबाळ नव्हते.. स्वामींचा कृपा आशीर्वाद भेटताच आपली इच्छा नक्की पूर्ण होईल हि आशा त्यांना होती.. आणि ह्या आशेने ते एक दिवस स्वामींना आपल्या मनातील इच्छा सांगतात..कि “ स्वामी राया आम्हास मुलबाळ व्हावे असा आशीर्वाद द्या !! ” परंतु स्वामी त्यास काहीच उत्तर देत नाही..!! स्वामी काहीच बोलले नाही.. हे बघून ते थोडे खिन्न होतात.. परंतु स्वामी आपल्याला योग्य वेळी नक्कीच आशीर्वाद देतील ह्या भोळ्या आशेने ते स्वत:ची समजूत काढतात आणि सेवा सुरु करतात.. स्वामी भक्त हो !! जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा हे ब्राम्हण जोडपं स्वामींना समस्या सांगत.. परंतु स्वामी त्यास काहीच उत्तर देत नसे.. !! आता मात्र त्या त्यांनी दृढ संकल्प केला.. कि आज स्वामींना काहीही करून विचारायचेच आणि स्वामींचा आशीर्वाद घेवूनच जायचे.. आणि योग्य वेळ बघून त्या ब्राम्हण स्त्री ने स्वामींना विनंती केली कि “स्वामी राया.. मला मुलबाळ होईल कि नाही.. कृपया आपण आशीर्वाद द्यावा हि विनंती..” तेव्हा मात्र स्वामी स्पष्टच बोलले कि “ अगं !! माते तुझ्या प्रारब्धी हा योग नाही ये गं !! ” स्वामी भक्त हो !! स्वामींचे हे उत्तर ऐकताच ब्राम्हण स्त्री स्वामींना धीट स्वरात बोलली “ हे स्वामी राया !! आमच्या प्रारब्धी नाही असे तुम्ही म्हणतात.. मग आम्ही तुमची पूजा अर्चा का करावी ? आम्ही तर प्रारब्ध बदललण्या साठी आपल्या दर्शनासाठी आलेलो आहे !! ” स्वामी भक्त हो !! तिचे हे वाक्य ऐकताच स्वामी बराच वेळ स्तब्ध राहिले आणि त्या ब्राम्हण स्त्रीच्या हातात दोन खारका देत बोलले कि “ हे घे दोन मुले !! ” स्वामी भक्त हो !! स्वामींनी दोन खारका दिल्या.. स्वामींचा आशीर्वाद भेटला.. स्वामीनी कृपा केली .. हा अत्यानंद त्या उभयतांस झाला.. आणि स्वामी चरणाचे दर्शन घेऊन ते घरी परत जाण्यास निघाली.. स्वामी भक्त हो !! स्वामींच्या लीला कशा अतर्क्य असतात.. ह्याची प्रचीती त्यास पुढे लागलीच आली.. ती अशी कि ते ब्राम्हण जोडपं अतिशय सोवळ पाळणारे होते.. दिवस भरात अनेकांचे स्पर्श झाले म्हणून जवळच असलेल्या तळ्यात त्यांनी स्नान करण्याचे ठरविले.. स्वामींनी दिलेल्या खारका हातात होत्या.. त्यांनी त्या खारका तळ्याच्या काठी असलेल्या मातीत पुरून ठेवल्या.. आणि स्नान करण्यास गेले.. स्वामी भक्त हो !! स्नान झाल्या नंतर त्यांनी त्या खारका मातीत पुरून ठेवल्या आहे हे विसरूनच गेले.. आणि तसेच ते घरी परतले.. स्वामी भक्त हो !! अहो दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक त्यास त्या खारकांची आठवण झाली आणि घाई घाई ने ते तळ्याच्या काठी आले.. आणि ज्या ठिकाणी खारका पुरून ठेवल्या होत्या तर त्या ठिकाणी माती उकरताच स्वामी भक्त हो !! आश्चर्य घडले.. तेथे त्यांना दोन पक्षांची अंडी दिसली.. आणि हि अंडी कोणाची हे बघण्यासाठी गेले असता त्यातून पक्षाची दोन पिल्ले बाहेर आली..!! स्वामी भक्त हो !! हा विचित्र प्रकार बघताच त्या उभयतांस “तुझ्या प्रारब्धी मुलबाळ नाही ” हे स्वामीचे शब्द आठवले.. स्वामी भक्त हो !! आता मात्र दोघेही खूप दुखी झाले.. आणि अक्कलकोट मध्ये येवून स्वामींच्या चरणावर डोके टेकवून ढसा ढसा रडू लागले.. !! तेव्हा स्वामी पुन्हा बोलले “ तुझ्या नशिबी बाळ नाही.. पक्षी उडून गेले.. आता मी काय करू ?? ” आता मात्र दोघांचा संयम सुटला आणि खूप जोराने ढसा ढसा रडू लागले.. बाळासाठी त्यांचा जीव व्याकुळ झाला होता.. आणि स्वामीकडे हट्टच धरला..!! स्वामी भक्त हो !! स्वामी आई आहे.. तिला आपल्या बाळाच्या डोळ्यात अश्रू आलेले कसे पाहावणार.. स्वामी भक्त हो !! स्वामींचे हृद्य पाझरले.. स्वामींना दया आली.. आणि त्यास एक श्रीफळ दिले आणि बोलले “ माते हे घे श्रीफळ… जा तुझी इच्छा पूर्ण होईल ..!! ” स्वामी भक्त हो !! स्वामीनी त्यास श्रीफळ देताच त्यास पुन्हा अत्यानंद झाला.. आणि आनंदाने ते घरी आले.. स्वामी भक्त हो !! घरी आल्या नंतर स्वामीनी दिलेल्या प्रसादाचा त्या मातेने करंज्या बनविल्या.. त्या करंज्याचा नैवेद्य स्वामींना दाखविला.. स्वामीनी सुद्धा आनंदाने ग्रहण केला.. स्वामी हे ब्रम्हांडाचे चालक मालक पालक आहेत.. तुमची इच्छा पूर्ण होणार हि स्वामी वाणी होती.. ते सत्यच असणार आणि त्या प्रमाणे ब्राम्हण जोडप्यास प्रचीती आली.. आणि पुढे वर्षभरात त्यास एक तेजस्वी मुलगा झाला.. स्वामीनी त्यांचे प्रारब्ध बदलले.. स्वामींनी त्यांचे प्रारब्ध बदलले.. स्वामी वाणी सत्य झाली .. स्वामी वाणी सत्य झाली… ह्या आश्चर्याच्या भावानेने दोघेही भारावून गेले.. आणि स्वामींचे अनन्य भक्त बनले.. स्वामींचे अनन्य भक्त बनले.. बोला अनंत कोटी ब्रम्हांड नायक परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

 

स्वामी  बोध ||

स्वामी भक्त हो !! आजची स्वामी वाणी म्हणजे स्वामींनी आपणास स्वामींचा योद्धा बनण्याची दिलेली प्रेरणाच आहे.. हो!! स्वामींचा योद्धा !! स्वामी भक्त हो !! स्वामींचा योद्धा म्हणजे असा अनन्य भक्त कि ज्यात संपूर्ण समर्पण आहे.. अतूट श्रद्धा आहे.. आणि ज्यात स्वामींच्या साठी काहीही करण्याची तयारी आहे.. साहस आहे..!! आणि ह्या गुणांच्या जोरावर स्वामी त्याचे प्रारब्ध बदलणार आहे.. आणि त्याला हवे तसे जीवन तो अभिव्यक्त करू शकणार आहे.. जसे वरील लीलेत ब्राम्हण जोडप्याने अनन्य भक्तीच्या सहाय्याने त्यांचे प्रारब्ध बदलले.. !! स्वामी भक्त हो !! आपण जेव्हा आध्यात्मात येतो.. तेव्हा आपण संचित.. प्रारब्ध .. वगैरे शब्द ऐकतो.. आणि जेव्हा आपणास अपयश येते वा संकट येते तेव्हा आपण ते पूर्व प्रारब्धावर थोपवतो आणि स्वतःलाच दोष देत बसतो.. आणि खचून जातो.. परंतु स्वामी भक्त हो !! आपल्याला खचायचे नाही.. वरील लीलेतून स्वामींनी आपणास अनन्य भक्तीच्या शक्तीचे महत्व सांगितले आहे.. त्या भक्तीच्या शक्तीने.. जेव्हा आपण व्याकुळ तेणे स्वामींना आळवतो तेव्हा आपण शुद्ध होतो.. म्हणजे आपले पूर्व कर्माचा प्रभाव कमी होतो..किंबहुना शून्य होतो.. आणि आपण नवीन जीवन निर्माण करतो.. आनंदी जीवन आकर्षित करतो.. असे जीवन कि ज्यात सर्व काही भरपूर आहे..!! स्वामी भक्त हो !! प्रारब्धच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत.. परंतु आपल्याला त्या खोलात नाही जायचे… आपण अतिशय सोप्या शब्दात समजून घेऊ कि.. प्रारब्ध म्हणजे असे पूर्वी केलेले कर्म.. कि त्याचे आज आपण फळ भोगतो आहे… मग ते फळ संकटाच्या रुपात असेल वा दु:खाच्या रुपात असेल..वा आनंदाच्या रुपात असेल..!! स्वामी भक्त हो !! परंतु अनन्य भक्ती हे असे कर्म आहे.. ज्याचे फळ इतके मोठे आहे कि ज्या मुळे प्रारब्ध कर्मांच्या फळाचा परिणाम शून्य होतो… अनन्य भक्तीच्या भावनेत खूप शक्ती आहे.. त्या जोरावर काहीही निर्माण केले जावू शकते.. स्वामी भक्त हो !! वरील स्वामी लीलेत जेव्हा स्वामी त्या मातेला सांगतात.. कि तुझ्या प्रारब्धात मुलबाळ होण्याचा योग नाही.. म्हणजेच स्वामी अप्रत्यक्ष पणे तीची अनन्य भक्ती वाढवण्याची प्रेरणा देत होते.. आणि बघा ना !! स्वतः स्वामीनीच ते घडवून आणले.. तिला सुरुवातीला मुद्दाम प्रतिसाद नाही दिला.. आणि दिला तर त्या खारकांचे पक्षी बनले.. ह्यातून स्वामीनी काय साध्य केले तर स्वामींनी तिच्यातील अनन्य भाव जागृत केला.. स्वामींनी तिच्याकडून व्याकुळतेने प्रार्थना करवून घेतली..!! स्वामी भक्त हो !! अगदी तसेच आपल्या जीवनात होत आहे.. जर संकट असेल वा दु:ख असेल.. ह्याना निमित्त करून आपणास अनन्य भक्ती ची भावना जागृत करायची आहे..!! स्वामी भक्त हो !! श्री रामाच्या अनन्य भक्तीने लाखो लोकांचा खून करणारा वाल्याचा.. वाल्मिक ऋषी होतो.. मग तुमचा आमचा उद्धार का होणार नाही !! चला तर स्वामी भक्त हो !! हृदयात स्वामींच्या अनन्य भक्तीची भावना धारण करू या !! आणि स्वामींचा योद्धा बनू या !! स्वामींवर अतूट श्रद्धा ठेवून.. हृदयातील स्वामींच्या आज्ञेचे पालन करून … आपल्याला आलेल्या संकटाचा सामना करू या.. त्याचा पराभव करू या !! आणि ह्या विश्वाला स्वामी भक्तीचे वेड लावु या..!! ह्या विश्वात सोप्या सुटसुटीत आणि आनंदी.. सुखी समृद्ध जीवनाची अभिव्यक्ती करूया.. स्वामींची सृष्टी सुंदर करू या !! आपले हे शरीर ह्या साठी निमित्त करू या !! जिथे स्वामी चरण.. तिथे न्यून काय !! स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय !! बोला अनंत कोटी ब्रम्हांड नायक परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

 

संदर्भ:- www.SwamiVaani.com

 

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News