आपले स्वामी बोलतात.. “ अरे बाळा…. हे चंदनाचे खोड उगाळून अंगास लाव…. ज्या दिवशी हे संपेल…. त्या दिवशी तुझे संपूर्ण कृष्ठ जाईल…. तू पूर्णपणे बरा होशील !! ”

Nov 27, 2019

स्वामी लीला
एक गृहस्थ कृष्ठ रोगाने पिडलेला होता.. त्याच्या संपूर्ण शरीराला कृष्ठ रोगाची लागण झालेली होती.. त्याने भरपूर वैद्यांना दाखविले.. भरपूर उपचार केले.. परंतु काही फरक पडत नव्हता.. शेवटी हे आपल्या कुठल्यातरी पाप कर्माचे फळ असे मोनमन मानून तो तीर्थ यात्रेला निघाला.. ज्या ज्या तीर्थस्थानी जात त्या त्या ठिकाणी तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असत.. तो नाशिक मध्ये भरपूर दिवस राहिला… त्र्यंबकेश्वर.. रामकुंड आदी पवित्र ठिकाणी त्याने साधना केली.. येथून तो पंढरपुरास आला.. येथेही तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होता.. पांडुरंगाची सेवा करत असतांना आपला रोग बरा व्हावा म्हणून तो पांडुरंगाला हृदयापासून आळवत होता.. स्वामी भक्त हो !! आपण जी सेवा करतो.. जी प्रार्थना करतो.. तिचे उत्तर नक्कीच भेटते.. ती कधीच निष्फळ ठरत नाही.. स्वामी भक्त हो !! पांडुरंगाने त्या गृहस्थाचे गाऱ्हाणे ऐकले.. आणि त्यास स्वप्नात दृष्टांत देवून सांगितले कि “ अरे बाळा.. अक्कलकोट मध्ये जा.. तेथे तुला आरोग्य लाभेल..!! ” स्वामी भक्त हो !! हा दृष्टांत त्यांस अनेक वेळा झाला.. सतत होणार दृष्टांत बघून ह्या गृहस्थांच्या मनात एक प्रकारचा सकारात्मक विश्वास जागृत झाला.. आणि ते मजल दर मजल करत तातडीने अक्कलकोट पुण्य भूमीत आले.. अक्कलकोट मधील परब्रम्हाच्या वास्तव्याने पवित्र झालेले वातावरण बघून त्यास स्वामी दर्शनाची ओढ लागली.. त्या दिवशी स्वामी खासबागेत होते.. खासबागेत स्वामींचे दर्शन घेतल्या नंतर त्या गृहस्थाचे हृद्य भक्तीच्या भावनेने उचंबळून आले..!! आता येथून जायचे नाही.. येथेच स्वामींची सेवा करायची.. आणि स्वामी सेवा करत करत इथेच मुक्त होऊन जायचे… हा दृढ संकल्प त्यांनी मनाशी केला.. आणि स्वामींची सेवा सुरु केली.. स्वामी भक्त हो !! त्यांचे शरीरास आजार होता.. म्हणून त्रिकाळ स्वामींचे दर्शन.. मुखात अखंड श्री स्वामी समर्थ नाम स्मरण… आणि हृदयात अनन्य स्वामी भक्तीचा भाव असे त्यांच्या सेवेचे स्वरूप होते..
… आता त्या गृहस्थाची सेवा सुरु झाली.. 6 महिने झाले.. वर्ष झाले.. तरीही काहीच गुण येत नव्हता.. परंतु स्वामींवर त्याचा अनन्य भाव वाढत होता.. तेथे घडणाऱ्या स्वामी लीला बघून त्याचा विश्वास अधिकाधिक दृढ होत होता.. त्याची भक्ती दिवसेंदिवस वाढत होती.. स्वामी भक्त हो !! त्यास सेवा सुरु करून २ वर्ष पूर्ण झाली.. तिसरे वर्ष सुरु झाले होते.. आता त्याच्यातील स्वामी भक्तीच्या भावनेने सर्वोच्च पातळी गाठली होती.. स्वामी कृपा कधी होणार हा ध्यास त्या गृह्स्थाला लागला होता.. मुखात अखंड श्री स्वामी समर्थ नाम सुरु होते.. आणि कृपेचा दिवस उजाडला… त्या दिवशी नेहमी प्रमाणे तो गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आला.. आणि अतिशय अनन्य भावनेने स्वामींच्या समोर व्याकुळतेने हात जोडून उभा राहिला.. त्याच्या चेहऱ्यावरील व्याकुळतेचा भाव स्वामींना स्पष्टच दिसत होता.. स्वामी भक्त हो !! स्वामी आई आहे.. स्वामींचे हृद्य करुणेने भरून आले.. आणि स्वामींनी त्यास कडे अतिशय करुणेने बघितले.. आणि बोलले “ अहो भटजी बुवा .. तुमच्या घराच्या अंगणात एक जुने चंदनाचे झाड आहे.. त्याचे खोड आम्हांस आणून द्या !! ” स्वामी भक्त हो !! स्वामींनी असे का सांगितले हे त्याला उमजले नाही.. पण पण पण स्वामींनी आपल्याला कृपेचे संकेत दिले आहे… ह्यावर त्याचा दृढ विश्वास बसला आणि हा विश्वास उरी बाळगून तो गृहस्थ घरी गेला.. स्वामी आज्ञे प्रमाणे चंदनाचे खोड घेवून तो पुन्हा अक्कलकोट येथे परत आला.. आणि ते चंदनाचे खोड स्वामी चरणावर अर्पण केले.. स्वामीनी चंदनाचे खोड त्याच्या हातात देत बोलले कि “ अरे बाळा.. हे चंदनाचे खोड उगाळून अंगास लाव.. ज्या दिवशी हे संपेल.. त्या दिवशी तुझे संपूर्ण कृष्ठ जाईल.. तू पूर्णपणे बरा होशील !! ” स्वामी भक्त हो !! स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून ह्या गृहस्थाने अतिशय अनन्य भावनेने.. दृढ विश्वासाने.. स्वामी आज्ञेचे पालन केले.. दररोज ते चंद उगाळून शरीराला लावत होता.. हळू हळु चंदन संपत होते.. तसे तसे त्या गृहस्थाचे शरीर दिव्य होत होते.. आणि स्वामी भक्त हो !! आश्चर्य असे झाले.. कि स्वामी वाणी प्रमाणे ज्या दिवशी चंदन संपूर्ण संपले… त्या दिवशी त्या गृहस्थाच्या शरीरावरील कृष्ठरोग पूर्ण पणे बरा झाला.. त्याचे शरीर ओजस्वी तेजस्वी झाले.. स्वामी वाणी हि सत्यच असते ह्याची त्याला प्रचीती आली आणि तो आनंदाने नाचू लागला.. आनंदाने नाचू लागला.. स्वामी रायाचे गुण सर्वांना सांगू लागला… बोला अनंत कोटी ब्रम्हांड नायक परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! आजच्या स्वामी वाणी तून स्वामी आपणास कृपेची आठवण करून देत आहेत..
स्वामी भक्त हो !! वरील स्वामी लीले मध्ये स्वामींनी त्या गृहस्था कडून सेवा करवून घेतली.. पांडुरंगाच्या रुपात दृष्टांत देवून अक्कलकोट मध्ये स्वतः कडे बोलावून घेतले.. स्वतः सोबत ठेवले.. त्याच्या कडून सेवा करवून घेतली.. त्यास विविध लीला दाखवून त्याची भक्ती वाढवली.. आणि स्वामींनी त्यावर कृपा करून त्यास रोग मुक्त केले..
स्वामी भक्त हो !! स्वामींच्या लीला किती अगाध आहेत.. आजही आपणास मार्गदर्शक आहेत.. बघा ना.. अगदी तंतोतंत असेच आपल्या जीवनात घडते आहे.. आपल्या जीवनात संकट आले.. दु:ख आले.. आपण स्वामींना प्रार्थना केली.. तेव्हा स्वामीनी आपणास मठात.. मंदिरात वा केंद्रात बोलावून घेतले… आपल्या कडून अनन्य भक्तीचे.. विश्वास रुपी चंदनाच्या झाडाचे बीज पेरून घेतले…. तेथे स्वामींनीच काही स्वामी भक्तांकडून त्यांच्या विविध लीलांचे श्रवण करवून घेतले…. हे भक्तीचे झाड.. विश्वासाचे झाड मोठे करत गेले.. आपल्यातील अनन्य भक्तीच्या भावनेची ऊंची वाढवत गेले.. स्वामी भक्त हो !! ह्या पेक्षा आपणास अजून काय पाहिजे आहे.. आपल्या जीवनात अनन्य भक्तीचे झाड स्वामीनी कधीच मोठे केले आहे.. आता फक्त श्री स्वामी समर्थ नामाने हे भक्तीच्या चंदनाच्या झाडाचे खोड उगाळून त्याचा लेप आपल्या संकटे.. वा दु:खा वर लावायचे आहे.. आणि स्वामीरायाची अभिव्यक्ती करायची आहे… स्वामी भक्त हो !! चला तर मग आता.. एका स्वामींच्या योध्या- प्रमाणे कार्य करूया.. हा आत्मविश्वास उराशी बाळगूया कि “ आपले संकट वा दु:ख दूर होण्यासाठी आपल्यावर स्वामी कृपा कधीच झालेली आहे.. आपल्या जीवनात भक्ती रुपी चंदनाचा झाड मोठे झालेले आहे… त्याची अजून ऊंची वाढवूया… स्वामीन बद्दल ची तळमळ वाढवू या.. श्री स्वामी समर्थ नामा ने हे भक्तीचे.. श्रद्धेचे चंदन उगाळण्याचे काम सुरु ठेवू या..!! आणि हा सुवास संपूर्ण ब्रम्हांडात पसरवूया.. !! स्वामी भक्त हो !! ह्या सुवासानेच दुर्गंध रुपी संकट पळून जाण्याचे काम सुरु झाले आहे.. हि समज ठेवू या !! आणि आपले प्रामाणिक कर्म करू या !! ” बोला अनंत कोटी ब्रम्हांड नायक परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News