आपले स्वामी बोलतात.. “ अरे !! तुला या पूर्वी जाण्याची आज्ञा दिली असती ना तर…!! गाय चिखलात रुतली असती !! ”

Dec 4, 2019

स्वामी लीला
स्वामी भक्त हो !! रावसाहेब ढवळे (रावजी भिकाजी ढवळे ) हे स्वामींचे अनन्य भक्त होते.. त्यांचे घराणे आध्यात्मिक होते.. त्यांच्या मातोश्रींचे वय झाले होते.. काशी क्षेत्रांत मृत्यू आल्यास स्वर्गलोकात स्थान भेटते.. मोक्ष भेटतो अशी त्यांची श्रद्धा होती.. आणि म्हणूनच त्या काशी क्षेत्री जावून राहिल्या.. इकडे श्री रावसाहेब हे अक्कलकोट मध्ये स्वामींच्या चरणी अनन्य स्वामी भक्तीत दंग होते.. स्वामी लीलांचा आस्वाद घेत होते.. आणि स्वामींच्या आध्यात्मिक शाळेत प्रशिक्षण घेत आध्यत्मिक पायरी चढत विकास करत होते.. स्वामी भक्त हो !! स्वामींकडे असंख्य भक्त येत.. त्यात काही भक्तांची पात्रता कमालीची होती.. स्वामी त्यांना नेहमी बोलत कि “ मी तुला माझ्या सारखे बनवेन !! ” म्हणजेच स्वामींच्या निर्गुण निराकार अंतिम सत्य स्वरूपाचे दर्शन करवून देईन.. कदाचित रावसाहेब सुद्धा हे त्याच पात्रतेचे असावेत.. कसे हे पुढील लीलेतून समजूनच येईल.. असो. एकदा काशीहून त्यांच्या मातोश्रींची तार आली कि त्यांची तब्येत खूप खराब आहे.. भेटण्यास यावे.. !! हि तार वाचताच रावसाहेब स्वामींकडे आज्ञा घेण्यासाठी आले.. तेव्हा स्वामीं बोलले कि “बैठ किदर जाता है !!”. स्वामी भक्त हो !! रावसाहेब स्वामींचे अनन्य भक्त होते.. स्वामींवर त्यांचा पूर्ण विश्वास होता.. हा स्वामी हुकुम येताच त्यांनी काशीमध्ये जाण्याचा बेत रद्द केला.. आणि अक्कलकोट मध्ये स्वामींच्या शाळेत आध्यात्माचे पुढील पाठ शिकत राहिले.. आणि बघा ना पुन्हा काही दिवसांनी काशीहून पत्र आले कि मातोश्रींची तब्येत सुधारली आहे.. ह्या प्रमाणे एक वर्षानंतर पुन्हा रावसाहेबांस मातोश्रींची तब्येत बिघडण्याची तार आली.. आणि पुन्हा स्वामींनी त्यास जाण्याची आज्ञा दिली नाही.. आणि स्वामींच्या आज्ञेतच माझे कल्याण आहे हि समज .. हा अतूट विश्वास मनात ठेवून रावसाहेबांनी स्वामी आज्ञेचे पालन केले.. ते काशीक्षेत्री गेले नाही.. स्वामी भक्त हो !! रावसाहेबांच्या अतूट श्रद्धे प्रमाणे त्यांस अनुभव आला आणि पुन्हा तार आली कि मातोश्रींची तब्येत सुधारली आहे.. त्या पूर्वी प्रमाणे हिंडत फिरत आहेत.. !!
आता मात्र रावसाहेबांस स्वामींच्या सर्व साक्षित्वाची प्रचीती येवू लागली होती.. त्यांची श्रद्धेला खूप बळ मिळाले होते.. स्वामी गुरु त्यांस विविध प्रचीती देवून.. अनुभव देवून त्यांची आध्यात्मिक प्रगती करत होते.. स्वामी भक्त हो !! आता तिसऱ्या वेळेला मातोश्रींच्या तब्येतीबाबत तार आली… आणि ह्या वेळेला मात्र स्वामींनी त्यांस जाण्याची आज्ञा दिली.. पूर्वीचे अनुभव बघता.. स्वामींच्या आज्ञेचा संकेत रावसाहेबांच्या लक्षात आला.. आणि त्याच प्रमाणे घडले.. त्यांच्या मातोश्रींस काशीक्षेत्री देवाज्ञा झाली..!! त्यानंतर रावसाहेबांनी सर्व पिंडदान वगैरे कर्मकांड केले आणि ते अक्कलकोट मध्ये परत आलेत.. स्वामी भक्त हो !! अक्कलकोट मध्ये आल्या नंतर त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले.. तो स्वामींनी त्यांच्या कडे करुणेच्या नजरेने बघितले आणि बोलले.. कि “ अरे तुला या पूर्वी जाण्याची आज्ञा दिली असती ना…!! तर गाय चिखलात रुतली असती…!! ” स्वामी भक्त हो !! रावसाहेबांची आध्यात्मिक साधना उच्च अवस्थेवर गेलेली होती.. त्यांस स्वामी वचनाचा अर्थ समजला.. आणि त्यांच्या अनन्य भक्तीत अजून बळ आले.. स्वामी भक्त हो !! रावसाहेबांचा अधिकार खूप मोठा होता.. स्वामींचे त्यावर खूप प्रेम होते.. पुढे स्वामीच्या अंतिम सत्याचे ज्ञान झाल्यानंतर रावसाहेबांनी संन्यास घेतला.. आणि त्यांनी संपूर्ण जीवन स्वामींच्या भक्तीच्या प्रचार प्रसार करण्यासाठी अर्पित केले.. !! बोला अनंत कोटी ब्रम्हांड नायक परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! वरील लीला दिसतांना साधी वाटत असली परंतु त्यात खूप खूप खूप खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे.. चला तर मग बघू या..स्वामी आपणास काय सांगत आहेत.. ह्याचे मनन करू या !!
स्वामी भक्त हो !! जेव्हा आपण स्वामींना संपूर्ण समर्पित करतो.. तेव्हा स्वामी आपले जीवन कसे चालवत असता.. आपल्या आध्यात्मिक यात्रेचा प्रत्येक टप्पा कसे पार करत असता हे आजच्या स्वामी वाणीचे सार आहे.. अर्थात स्वामींच्या लीला ह्या युगानुयुगे मार्गदर्शक आहेत.. प्रत्येक युगा प्रमाणे त्यांतून हजारो बोध घेता येणार आहे.. पण आज आपल्यासाठी स्वामी जे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.. ते समजावून घेण्याचा प्रयत्न करू या !!
स्वामी भक्त हो !! “गाय चिखलात रुतली असती ” हे स्वामींच्या मुखातून निघालेले महावाक्य आहे.. ह्यातच सर्व आध्यात्माचे सार आहे.. गाय हे पुण्याईचे प्रतिक आहे.. गाय हे आध्यात्मिक प्रगतीचे प्रतिक आहे.. गाय हे शुद्ध भक्तीचे प्रतिक आहे.. स्वामी भक्त हो !! स्वामींनी सृष्टी निर्माण केली.. हा खेळ निर्माण केला.. आणि ह्या खेळात रस निर्माण व्हावा म्हणून हि माया निर्माण झाली.. माया म्हणजे भास.. स्वामी भक्त हो !! आपण सर्व स्वामींचे बाळ आहोत.. आपला खरा स्वभाव हा “श्री स्वामी समर्थ ” आहे.. आणि खंत हि आहे कि ह्या माये मुळे आपण हे विसरून गेलो.. आपली शक्ती आपण विसरून गेलो आणि ह्या मायेला.. ह्या भासालाच सत्य मानून चालतो.. स्वामी भक्त हो !! आनंदाचा स्त्रोत हृदयात असतांना.. हा आनंद.. आपण पैसा.. प्रतिष्ठा इत्यादी इत्यादि मध्ये शोधू लागलो.. इतका इतका पैसा भेटला तर मी आनंदी होईल.. वा माझी हि इच्छा पूर्ण झाली तर मला समाधान लाभेल.. वगैरे वगैरे वगैरे. ह्या प्रार्थना बाह्य जगतात भुलून आपण करतो.. स्वामी भक्त हो !! आपणास ह्या प्रार्थनेचे उत्तर येते सुद्धा…आपली इच्छा पूर्ण पण होते.. आणि आपणास आनंद पण होतो.. पण तो फक्त तात्पुरता असतो.. कारण आपण आनंदाचा स्त्रोत त्या इच्छेला वा वस्तूला मानत असतो.. स्वामी भक्त हो !! ह्यालाच स्वामींनी आजच्या भाषेत “गाय चिखलात रुतली आहे ” असे संबोधले आहे.. म्हणजे सत्य सोडून असत्याला.. भासाला आनंदाचा स्त्रोत मानून बसलेलो आहे.. स्वामी भक्त हो !! स्वामी भक्त हो !! आपणास हे सांगितले जात नाही कि पैसा कमवू नका.. वा मौज मजा करू नका.. वा तुम्ही संसारिक प्रगती करू नका.. वा मोठी धेय्य ठरवू..नका !! स्वामी भक्त हो !! आपणास तर शुभ वार्ता सांगितली जाते आहे कि आपणा भरपूर पैसा कमवा.. वा तुमची सांसारिक प्रगती करा.. पण आनंदी राहून.. कारण तुमच्या हृदयात आनंदाचा स्त्रोत आहे.. तुमच्या हृदयात समृद्धीचा स्त्रोत आहे.. आपण त्या परम समृद्धीच्या स्त्रोताचे बाळ आहोत.. त्या परमानंदाचे बाळ आहोत.. हा विश्वास मनात ठेवा.. ह्या विश्वाचा चालक मालक पालक आपला गुरु आहे.. त्याचे मार्गदर्शन आपल्याला हृदयातून मिळते आहे.. त्याचा हुकूम आपल्या साठी महत्वाचा आहे.. आणि त्याच्या हुकुमा प्रमाणे आपल्याला ह्या शरीराकडून कर्म करवून घ्यायचे आहे.. स्वामी भक्त हो !! रावसाहेबास स्वामी अक्कलकोट मध्ये आध्यात्मिक प्रशिक्षण देत होते.. त्यास जर ह्या पूर्वीच पाठवले असते तर ते तिथेच फसले असते.. आणि “गाय चिखलात रुतली असती..” म्हणजेच त्यांच्या पुढील आध्यात्मिक शिक्षणात विलंब झाला असता.. स्वामी भक्त हो !! जाता जाता पुन्हा हेच सांगावेसे वाटते कि “ तुम्हाला कोणतीही समस्या असू देत त्या समस्येला आपण स्वामी भक्ती साठी निमित्त करू या.. शांती.. आनंद.. समृद्धी.. प्रेम ह्याचा दिव्य स्त्रोत आपल्याच हृदयात आहे.. हा विश्वास ठेवून त्यालाच प्रार्थना करू या.. आणि बोलूया कि हे आनंदा.. समृद्धीच्या स्त्रोता.. प्रेमाच्या स्रोता… तू प्रगट हो..!! ह्या शरीराकडून कर्म करवून घे..!! मला मार्गदर्शन कर.. आणि माझी समस्या विलीन कर.. ” स्वामी भक्त हो !! आपणास कोणतेही बाहेरून ज्ञान दिले जात नाही.. तर तुमच्या हृदयात ज्ञानाचा स्त्रोत आहे ह्याची फक्त आठवण करवून दिली जात आहे.. आणि ह्या साठी स्वामी गुरु समर्थ आहेत.. आपण त्यांचे बाळ आहोत.. त्यास आळवा.. इतकेच सांगतो.. कि तुमच्या अनन्य भावनेच्या आळवण्यात खूप मोठी शक्ती आहे.. बोला अनंत कोटी ब्रम्हांड नायक परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News