स्वामी लीला
स्वामींच्या लीलांची ख्याती दूर दूर पसरत होती.. स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत होती.. स्वामी महाराजांच्या लीला ह्या अतर्क्य होत्या.. अचंबित करणाऱ्या होत्या.. जो जो स्वामींच्या दर्शनाला येत तो कधीही रिकाम्या हाती गेला नाही.. अहो जे लोक स्वामींची परीक्षा बघण्यासाठी येत.. स्वामींच्या लीला बघून त्यांच्या शंका दूर होत आणि जातांना अनन्य भक्तीचा ठेवा सोबत घेवून जात.. असो. असेच एके दिवशी स्वामी महाराजांची स्वारी अक्कलकोट मधील देशमुखांच्या वाडयात बसलेली होती.. वामन बुवांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता.. सभोवताली सर्व भक्त मंडळी त्यांचे त्यांचे काम करत होती.. वामनबुवा वीणा हातात घेवून कीर्तनाची तयारी करत होते.. त्याच वेळी सैय्यद नावाचे एक मुसलमान गृहस्थ त्या ठिकाणी येतात.. दरवाजात बसलेल्या मंडळीना विचारतात “ क्यों जी…!! अक्कलकोटके स्वामी कहा है !! ” सैय्यद हे शरीराने उंच धिप्पाड होते.. त्यांच्या नजरेत एक प्रकारचा आवेश होता.. आवाजात एक प्रकारचा कणखरपणा होता.. सैय्यद ह्यांचे हे बोलणे ऐकून त्यांस मात्र कोणी काहीच उत्तर दिले नाही.. तेथील मंडळींचा अबोला बघून सैय्यद अधिक आवेशाने आता मध्ये गेले आणि पुन्हा बोलले कि “ अक्कलकोटके स्वामी कहा है !! ” स्वामी भक्त हो !! सैय्यद असे बोलताच स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले.. “ अरे.. सैय्यद !! इधर उधर मत देख..!! स्वामी तो अक्कलकोट मै है !! ” स्वामी भक्त हो !! हि स्वामी वाणी होती.. स्वामींच्या ह्या वाणीत इतकी शक्ती होती कि चमत्कार झाला.. सैय्यद ह्यांस लगेचच समाधी लागली.. सैय्यद हे एकाच जागेवर स्थिर झाले.. एक तास झाला .. दोन तास झाले.. सैय्यद मात्र एकाच जागेवर.. सभोवताली असलेली सर्व मंडळी अचंबित झाली.. काय सुरु आहे हे मात्र कोणालाच समजत नव्हते.. स्वामी भक्त हो !! स्वामी आई आहे.. शेवटी स्वामींना करुणा आली.. आणि स्वामींनी त्यांच्या कडे करुणेच्या नजरेने बघितले आणि तेव्हा सैय्यद भानावर आले.. त्यांच्या शरीराची हालचाल सुरु झाली.. डोळे उघडले गेले.. डोळ्यात अखंड अश्रूधारा सुरु झाल्या.. अक्कलकोट स्वामी कोण आहे..!! जणू ह्याचे उत्तर त्यास भेटल्याचा परमशांती भाव त्यांच्या मुखावर स्पष्ट दिसत होता..! ते धावत गेले आणि स्वामींचे चरण घट्ट पकडले..! आणि साश्रू नयनांनी स्वामींची स्तुती सुरु केली..! स्वामी भक्त हो !! आता सैय्यद ह्यांच्या मुखातून वाक्य बाहेर पडू लागली.. ते बोलतात.. “ मी कुराण जाणतो.. हकीकत.. तरीकत.. शर्यत आणि मार्फत हेही जाणतो..!! मलकुद.. लाहूद.. नासूद आणि जमसुद हे चारही मंजलयोग अभ्यासले..!! जडीबुट्टी.. जंगल हेही सारे अवगत आहेत..!! परंतु परमात्माचे दर्शन नाही झाले.. स्वामीराया आपल्या स्वरूपात त्याला मी हृदयात पाहिला.. बेशक स्वामी आप अक्कलकोट मै हो !! बेशक स्वामी आप अक्कलकोट मै हो !! बेशक स्वामी आप अक्कलकोट मै हो !! ” स्वामी भक्त हो !! सैय्यद ह्यांच्या मुखातून निघालेली वाक्य हि पुस्तकी वाक्य नव्हती… हि स्वानुभवातून.. हृदयातून आलेली वाक्य होती.. हि उत्स्फूर्त पणे आलेली वाक्य होती.. हा त्यांस झालेला स्वामी बोध होता !! स्वामी भक्त हो !! सैय्यद ह्यास पूर्णत्वाचा बोध झाल्या नंतर ते स्वामींचे अनन्य भक्त बनले.. काही दिवस अक्कलकोट मध्ये स्वामींची सेवा केल्या नंतर ते हैद्राबाद येथे निघून गेले.. स्वामींच्या भक्तीचा त्यांची प्रचार प्रसार केला.. धन्य आहात स्वामी !! धन्य तुमचे अनन्य भक्त सैय्यद !! बोला अनंत कोटी.. ब्रम्हांडनायक परब्रम्ह सच्चिदानंद भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! सर्व प्रथम आजच्या लीलेतून हेच सांगावेसे वाटते कि स्वामीनी स्पष्ट पणे हेच सांगितले कि “ मी कोणा एका धर्माचे दैवत नाही.. मी सर्व धर्मियांचा आहे.. मी तर अखिल सृष्टीचे दैवत आहे.. मी गुरुतत्व आहे..”
स्वामी भक्त हो !! चला.. आता स्वामींनी सैय्यद ह्यांना जो उपदेश दिला कि “स्वामी तर अक्कलकोट मध्ये आहे ” म्हणजे काय ? ह्याचे मनन चिंतन करू… स्वामी भक्त हो !! खरतर स्वामी चराचरात आहेत.. जसा पाण्यात मासा आहे तसे हे सारे अनंत कोटी ब्रम्हांड स्वामींच्या मध्ये आहे.. हे पशु.. पक्षी.. झाडे.. सजीव.. निर्जीव.. ग्रह.. तारे.. हि सर्व स्वामींची निर्मिती आहे.. स्वामी भक्त हो !! ह्या मध्ये मानवाचे शरीर हि एकमेव अशी दिव्यरचना आहे कि ज्यात स्वामींनी बुद्धी दिली आहे.. मन दिले आहे.. मनन-चिंतन करण्याची शक्ती दिली आहे.. स्वामी भक्त हो !! फक्त मानवाच्याच शरीरा द्वारे स्वामी अनुभव.. अनुभवू शकतो !! किवां अजून सोप्या शब्दात सांगायचे तर हा संसार निर्माण होण्यापूर्वीची जी स्वामींची पूर्व अवस्था होती त्या अनुभवाचा दिव्यबोध..!! दिव्यसमज !! Ultimate understanding!! फक्त ह्याच शरीरात होऊ शकते..!! स्वामी भक्त हो !! सैय्यद ह्यांच्या बाबतीत काय घडले.. ते स्वामी अनुभवावर गेले होते.. दिव्य समाधीवर गेले होते.. त्या दिव्य शांतीच्या अनुभवावर गेले.. त्यात ते शरीरा.. मन.. बुद्धीच्या पलीकडे.. अनंताच्या.. असीमतेच्या अनुभवावर गेले होते.. खरे तर स्वामी भक्त हो !! ह्या अवस्थेचे वर्णन शब्दात कसे सांगू.. अहो… मला सांगा चष्मा कसे डोळ्याचे वर्णन करणार.. स्वामी भक्त हो !! हि परमानंदाची दिव्य अवस्था आहे.. त्या परमानंदाचा स्वादच घ्यावा लागतो.. स्वामी भक्त हो !! जेव्हा हा स्वाद भेटतो तेव्हा मनात वा बुद्धीत असलेल्या सर्व जुन्या धारणा गळून पडतात.. खरा मी कोण आहे ह्याचे दर्शन होते.. आणि बुद्धीचे रूपांतरण विवेकात होते.. मनाचे रूपांतरण अनन्य भक्तात होते.. हृदयात फक्त स्वामी भक्तीचेच भाव निर्माण होतात.. हृदयात आनंदाचे भाव निर्माण होतात.. हृद्य करुणेने भरून जाते.. स्वामी भक्त हो !! त्यावेळेला मुखात फक्त एकच वाक्य येते धन्यवाद स्वामी..!! धन्यवाद स्वामी..!! धन्यवाद स्वामी..!! स्वामी भक्त हो !! माझ्या ह्या शरीराची पात्रता नाही हे सर्व सांगण्याची.. ह्या साठी स्वामींनी असंख्य पुण्यजीव पृथ्वीवर पाठवलेले आहेत.. ते सर्व मार्गदर्शन करतच आहेत.. परंतु स्वामी भक्त हो !! आपणास जे सांगितले जाते ते कोणत्याही पुस्तकातील नाही.. हे स्वानुभवाचे बोध आहेत.. म्हणून इतक्या विश्वासाने सांगितले जाते आहे.. असो. स्वामी भक्त हो !! वरील बोध झाल्या नंतर देह बुद्धी नष्ट होते.. आणि दिव्य विवेक जागृत होतो.. आणि म्हणून स्वामींनी सांगितले कि मी अक्कलकोट(अकलेच्या कोटात) मध्ये आहे… ह्या विवेकाच्या नजरेने सत्य आणि असत्या तील फरक दिसतो.. आपले आचरण बदलते.. आपले प्रतिसाद बदलतात.. मनाला स्वामी भक्तीची सर्वोच्च अवस्था प्राप्त होते.. असो.
स्वामी भक्त हो !! आता आपण बोलाल कि मी संसारी आहे.. मला हे शक्य आहे का.. माझ्या इतक्या समस्या आहेत.. वगैरे वगैरे. पण स्वामी भक्त हो !! आपणास स्वामींनी ह्या साठी अनन्य भक्तीचा ठेवा दिलेला आहे.. स्वामी नामाचा ठेवा दिला आहे.. ह्याचा उपयोग करूया.. अखंड स्वामी नाम घेत.. जीवनातील प्रत्येक दु:खाला स्वामी पर्यंत जाण्याची शिडी समजूया.. आणि आपल्या भक्तीत वाढ करू या !! स्वामींवर अतूट श्रद्धा ठेवू या आणि अक्कलकोट मधील स्वामींना जाणू या !! आणि मानवी जीवनाचे अंतिम धेय्य गाठून साऱ्या विश्वाला हा स्वामी भक्तीचा प्रसाद वाटू या !! स्वामी भक्त हो !! हाच मोक्ष.. हेच निर्वाण.. हीच कैवल्य अवस्था.. हेच जन्नत.. हाच स्वर्ग !! खूप काही सांगावेसे वाटते आहे.. परंतु वेळेचे भान ठेवता येथेच थांबतो .. बोला अनंत कोटी.. ब्रम्हांडनायक परब्रम्ह सच्चिदानंद भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com






