आपले स्वामी बोलतात.. “ काय रे !! तुम्हाला खजिना मोजता तरी येतो का..? विनाकारण एखाद्या अनाथाला का त्रास देता..? सावधान…!!! जर असेच वागत राहिलात तर तुम्हाला खूप दु:ख भोगावे लागेल..!!”

Dec 18, 2019

स्वामी लीला

स्वामी भक्त हो !! आजची स्वामी वाणी !! अक्कलकोट मध्ये नथोबा नावाचा एक अनन्य स्वामी भक्त रहात होता.. तो अक्कलकोट संस्थानात खजिनदार म्हणून काम करत होता.. नथोबाची स्वामींच्या चरणावर अनन्य भक्ती होती.. तो सदैव स्वामी स्मरणात रहात असे.. स्वामींचे नित्य दर्शन घेतल्या शिवाय त्याच्या दिवसाची सुरुवात होत नसे.. नथोबा कमालीचा सात्विक गृहस्थ होता.. नथोबाची कामातील प्रामाणिकता.. एकनिष्ठता हि काही दुर्जन लोकांना खुपत असे.. ते त्याचा मनोमन तिरस्कार करत असे.. त्यास सतत त्रास देत.. त्यांस कट करस्थान करवून सतत अडकवण्याचा प्रयत्न करत असे.. स्वामी भक्त हो !! आणि एके दिवशी त्या दुर्जनांनी संधी साधली.. त्यांनी नथोबाच्या खजिन्यातून दोन हजार रुपये गहाळ केले.. आणि राजाकडे तक्रार केली कि खजिन्यात दोन हजार रुपये हिशोबात कमी येत आहेत.. आणि ते दोन हजार रुपये नथोबाने चोरले आहे.. स्वामी भक्त हो !! राजेसाहेबांकडे तक्रार आल्या नंतर राजेसाहेब आणि दादोबा भोसले ह्यांनी खजाना तपासाला तर त्यात खरोखर दोन हजार रुपयांची लुट दिसली.. आणि त्यांनी नथोबाला आरोपी घोषित केले आणि त्यांस तात्काळ कैद केले… स्वामी भक्त हो !! प्रामाणिक व्यक्तीचा दागिना हा त्याचा प्रामाणीकपणाच असतो.. त्यावर कोणी बोट ठेवले तर त्याला मरणप्राय दु:ख होते.. आणि तसेच झाले.. नथोबाला खूप दुख झाले.. अहो !! त्याचे डोळे रडून रडून सुजले होते… तो हात जोडून सर्वांना सांगत होता कि मी गुन्हेगार नाही.. मी पैसे चोरले नाही.. परंतु त्याचे कोणीच ऐकले नाही.. स्वामी भक्त हो !! आता मात्र नथोबाने स्वामी रायाचा धावा सुरु केला.. तो बोलला.. “ हे स्वामी राया तू तर सर्वज्ञ आहेस.. तुला माहित आहे कि मी शुद्ध आहे.. स्वामी आई आता तूच न्याय निवाडा कर !!” स्वामी भक्त हो !! अहो.. भक्ताचा अभिमान हा स्वामी रायाचा अभिमान आहे.. त्याच्या भक्ताच्या सत्वाचे रक्षण तो करणारच.. अशा भक्त वत्सल भक्ताभिमानी स्वामी रायाला दया आली आणि त्यांनी लीला केली.. ती अशी कि.. दुसरे दिवशी गुरुवार होता.. राजेसाहेब आणि दादोबा हे स्वामींच्या दर्शना साठी आले.. स्वामींचे दर्शन घेत असतांना स्वामींनी अतिशय क्रोधाने त्यांच्याकडे बघितले आणि बोलले “काय रे !! तुम्हाला खजिना मोजता तरी येतो का..? विनाकारण एखाद्या अनाथाला का त्रास देता..? सावधान…!!! जर असेच वागत राहिलात तर तुम्हाला खूप दु:ख भोगावे लागेल..!!”
स्वामी भक्त हो !! हि स्वामी वाणी होती.. राजेसाहेब आणि दादोबा आता खूपच घाबरले.. इतके घाबरले कि त्यांच्या शरीराला घामच फुटला.. आणि गयावया करत स्वामींची माफी मागितली.. स्वामी भक्त हो !! राजेसाहेब आणि दादोबा आता राजवाडयात आले.. आणि त्यांनी पुन्हा खजिना मोजला.. त्यांनी खजिना मोजताच स्वामीभक्त हो !! चमत्कार झाला.. त्या खजिन्या मध्ये एक रुपयाची सुद्धा लुट नव्हती.. सर्व हिशोब बरोबर आलेला होता.. आता त्यांस पश्चाताप झाला.. त्यांनी नथोबाची माफी मागितली आणि त्यास सोडून दिले.. आणि इतकेच नाही तर त्यांनी पुन्हा त्यास कामावर येण्याची विनंती सुद्धा केली.. स्वामी भक्त हो !! नथोबास मनोमन समजून आले कि हि सर्व स्वामी रायाची लीला आहे.. स्वामींनीच हा चमत्कार केला.. आता मात्र त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.. स्वामी राया तू भक्त वत्सल आहेस.. भक्ताभिमानी आहेस.. तूच माझे रक्षण केलेस.. तुला कोटी कोटी धन्यवाद.. ते अशी स्तुती करू लागले.. आणि राजेसाहेबांच्या पदरी नोकरी करण्या पेक्षा परब्रम्हाची केलेली चाकरी कधीही श्रेष्ठच असा विचार मनात धरून त्यांनी राजेसाहेबांची नोकरी सोडली आणि स्वामींच्या दरबारात जावून अनन्य सेवा सुरु केली…
धन्य आहात स्वामी .. धन्य तुमचा भक्त नथोबा !! धन्य तुमचा भक्त नथोबा !! बोला..!! अनंत कोटी ब्रम्हांड नायक.. अक्कलकोट निवासी.. राजाधिराज.. योगीराज.. भक्त वत्सल.. भक्ताभिमानी.. सच्चिदानंद.. परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

स्वामी बोध

स्वामी भक्त हो !! आजचा स्वामी बोध !! स्वामी भक्त हो !! स्वामी भक्ताभिमानी आहेत.. म्हणजेच स्वामींना त्यांच्या भक्तांचा अभिमान आहे.. भक्ताची प्रतिष्ठा.. भक्ताची कीर्ती हीच स्वामींसाठी त्यांची कीर्ती आहे.. आणि त्या कीर्तीचे रक्षण करण्यासाठी स्वामींची काहीही करण्याची तयारी असते..!! कारण तो भक्त म्हणजे लाखो पिढ्यांसाठी असलेला एक आदर्श असतो..!! त्याचे चरित्र म्हणजे लाखो पिढ्यांसाठी एक प्रेरणा असते..!! म्हणून स्वामींना त्याचे रक्षण करावेच लागते..!! स्वामी भक्त हो !! आज पर्यंत हि असंख्य आदर्श आपल्या समोर आहेत.. मीरा.. तुकोबा.. एकनाथ.. अशी असंख्य नावे आहेत..!! स्वामी भक्त हो !! ह्या सर्व भक्तांनी स्वामींना अनन्य समर्पण केलेले होते…!! त्यांनी त्यांचे प्रत्येक कर्म स्वामींना समर्पित केले..!! तेव्हा त्यातील अहंकार विलीन झाला…!! आणि त्यात फक्त शुद्ध स्वामी तत्व शिल्लक राहिले.. स्वामी भक्त हो !! त्यानंतर स्वतः स्वामीनीच त्या शरीरातून कार्य केले.. स्वामी भक्त हो !! तुम्ही म्हणाल कि स्वामीनी स्वतः कार्य केले म्हणजे काय ..? स्वामी भक्त हो !! स्वामीनी स्वतः कार्य केले म्हणजे त्यात स्वामींचे दिव्य गुण विकसित झाले.. जसे प्रेम.. विश्वास.. करुणा.. आनंद.. शांती.. प्रामाणीकपणा.. एकनिष्ठता.. साहस.. उत्साह.. कृतज्ञता.. नम्रता.. चिकाटी… रचनात्मकता.. आदी. आणि ह्या गुणांच्या सहाय्याने अनेक लीला केल्या.. चमत्कार केले..!! स्वामी भक्त हो !! आपण स्वामींच्या सेवेत आहोत..!! आपल्यात सुद्धा स्वामी हे गुण विकसित करत आहेत..!! जीवनात असंख्य प्रसंग येतात तेव्हा आपल्याला सत्याची साथ सोडायची नाही..!! लक्षात ठेवा कि नथोबाच्या लीलेतून आपणास स्वामी हेच आश्वासन देत आहेत कि आपले कोणतेही नुकसान होणार नाही..!! स्वामी आपले सत्व राखणार..!! स्वामी आपले रक्षण करणार..!! हा अतूट विश्वास ठेवायचा आहे..!! आणि स्वामींना स्वामींचे काम करण्यात मदत करायची आहे..!! बोला अनंत कोटी ब्रम्हांड नायक.. अक्कलकोट निवासी.. राजाधिराज.. योगीराज.. भक्त वत्सल.. भक्ताभिमानी.. सच्चिदानंद.. परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News