जय मल्हार फेम देवदत्त नागे पुन्हा छोट्या पडद्यावर !!

Dec 24, 2019

झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’  या  मालिकेतील खंडेराया या भूमिकेमुळे देवदत्त नागे हे नाव घराघरात पोहोचले. त्याच्या जय मल्हार या मालिकेने २०१७ साली ब्रेक घेतला. तरी आजही प्रेक्षकांच्या मनात ही मालिका आणि ती व्यक्तिरेखा ताजी आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रेमही दिले होते. खंडोबा या व्यक्तिरेखेला तर चाहत्यांचे आणि खंडोबाच्या भक्तांचे विशेष प्रेम लाभले होते. अतिशय पिळदार शरीरयष्टी असेलला देवदत्तने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. तान्हाजी मालसुरे यांच्या आयुष्यावर आधारित तान्हाजी या चित्रपटात  देवदत्त नागे सूर्याजी मालसुरे ही  एक महत्वाची भूमिका करत आहे. नुकत्याच तानाजी साठी दिलेल्या एk.       इंटरव्यू मध्ये त्याने तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत आहे असे सांगितले.’ मी जो कोणी आहे तो छोट्या पडद्यामुळे’ अशी प्रांजळ प्रतिक्रिया देत देवदत्तने छोटा पडदा हे माझं पाहिलं प्रेम आहे. चित्रपटानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर एक वेगळी भूमिका साकारणार असल्याचेही त्याने सांगितले. सध्या या नव्या प्रोजेक्टसाठी तो त्याचा एक वेगळा लुक बनवत आहे. त्यासाठी त्याने त्याच्या केसांची पोनी सुद्धा वाढवली आहे. अतिशय पिळदार शरीरयष्टी आणि केसांची पोनी वाढवलेला देवदत्त नागे जय मल्हार नंतर छोट्या पडद्यावर कोणत्या प्रकारची भूमिका करेल आणि मुख्य म्हणजे हे त्याचे सिक्रेट प्रोजेक्ट कधी छोट्या पडद्यावर येईल हे पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक विशेष मेजवानी असेल.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News