स्वामी लीला
अक्कलकोट संस्थानचे राजे श्रीमंत मालोजी राजे हे दत्त महाराजांचे भक्त होते.. ते दरवर्षी गुरुप्रतीपदेच्या उत्सवास गाणगापूर येथे जात.. तेथे तीन दिवस रहात.. आणि दानधर्म करून पुन्हा परत येत.. ह्या वर्षी अक्कलकोट नगरीत स्वामींचे नुकतेच आगमन झालेले होते.. कदाचित मालोजी राजेंना स्वामींच्या परब्रम्हत्वाची ओळख झालेली नसावी म्हणून ते दरवर्षी प्रमाणे गाणगापूर येथे गुरुप्रतीपदेच्या उत्सवास गेले.. तेथे ब्राम्हणास भोजन दिले.. आणि त्याच रात्री श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी त्यांस दृष्टांत दिला आणि बोलले कि “ अरे.. मी तुझ्या गावी आलेलो आहे.. तरीही तू इथे कशाला येतोस..!!” स्वामी भक्त हो !! असा दृष्टांत बघतास राजाला खात्री झाली कि स्वामी हे प्रत्यक्ष दत्तावतारी आहेत.. त्यानंतर श्रींमंत मालोजी राजे अक्क्कोट येथे आले.. स्वामींचे दर्शन घेतले.. आणि त्यानंतर दरवर्षी गुरुप्रतीपदेला गाणगापूर येथे न जाता ते अक्कलकोट नगरीतच उत्सव साजरे करू लागले.. स्वामी भक्त हो !! श्रीमंत मालोजी राजे हे दर गुरुवारी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येत.. स्वामी कोठेही असोत त्या ठिकाणी ते न चुकता येत.. स्वामी भक्त हो !! मालोजी राजे दर्शनास येत परंतु त्यांचा थाटमाट खूप मोठा असत.. सोबत भरपूर सेवक.. घोडे.. वगैरे सोबत मोठा ताफा असत… परंतु स्वामी भक्त हो !! हे पण मात्र खरे होते कि श्रीमंत मालोजी राजेंची स्वामी चरणावरील भक्ती दिवसेंदिवस दृढ होत होती.. असो. असे भरपूर दिवस त्यांचा नित्यक्रम सुरु होता..
स्वामी भक्त हो !! एके गुरुवारी मात्र अतिच झाले.. श्रीमंत मालोजी राजे चक्क हत्तीवर बसून स्वामींच्या दर्शनासाठी आले.. स्वामी ज्या ठिकाणी बसलेले होते.. त्या ठिकाणी मालोजीराजे अतिशय थाटात आले.. स्वामींचे दर्शन घेण्यासाठी हत्ती वरून खाली उतरले.. खाली उतरताच स्वामींच्या जवळ गेले आणि हात जोडून त्यांनी दर्शनासाठी मान झुकवली तोच स्वामींचा चेहरा लालबुंद झाला.. स्वामी भक्त हो !! स्वामींचा संताप इतका झाला होता कि स्वामींनी श्रीमंत मालोजी राजेचा श्री मुखात फाडकन भडकवली.. स्वामी भक्त हो !! स्वामींचा फटका इतका जोराचा होता कि राजाचे पागोटे दूर जावून पडले.. स्वामी भक्त हो !! अचानक झालेला प्रकार बघून राजाचा चेहरा तर अगदी काळवंडला… तेव्हा सोबत असलेल्या एका सेवकाने पटकन पागोटे आणून दिले आणि त्यांच्या डोक्यात घातले..
स्वामी भक्त हो !! आता मालोजी राजेंच्या संपूर्ण अंगाचे थरथर कापरे सुरु झाले.. काय सुरु आहे हे त्याला काहीच समजत नव्हते.. आणि हात जोडून उभे राहिले तोच स्वामींनी उग्र स्वरूपात त्याच्या कडे बघून बोलले.. “ तुझे मोठेपण तुझ्याच घरी ठेव.. इथे तुझे मोठेपण कशाला पाहिजे आहे.. आम्ही तुझ्या सारखे कित्येक बुद्बलके राजे बनवतो आणि मिटवून पण टाकतो.. चल निघ येथून !! ” स्वामी भक्त हो !! श्रीमंत मालोजी राजेंना आपली चूक समजली.. आणि त्यांनी स्वामींकडे क्षमा मागितले.. स्वामींच्या दरबारात कोणीही मोठा नाही कोणीही छोटा नाही.. स्वामींच्या दरबारात फक्त भक्ताची भक्तीच मोठी हे मालीजी राजेंना कळून चुकले.. आणि त्यांचा अहंकार पूर्ण पणे गळून गेला… ते स्वामींचे अनन्य भक्त झाले.. स्वामी भक्त हो !! त्यानंतर मात्र ते दर गुरुवारी जेव्हा जेव्हा स्वामींच्या दर्शनाला येत तेव्हा तेव्हा ते मेणा स्वामींना दिसणार नाही अशा ठिकाणी लावत आणि तेथून ते पायी स्वामींच्या दर्शनाला येत.. “बोला अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्क्कोट निवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय”
स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! स्वामी तर निर्गुण निराकार परब्रम्ह आहे.. हे एकमेव गुरुतत्व आहे.. हे गुरुतत्व आपल्या हृदयातुन भावनेच्या रुपात सतत मार्गदर्शन देत असते.. परंतु आपल्यातील अहंकारामुळे आपल्याला स्वामींची भाषा समजत नाही.. आणि विशेष म्हणजे हा अहंकार इतका हुशार आहे कि तो कसा जीवनात प्रवेश करेल ह्याचा पत्ता लागणार नाही.. ह्या अहंकाराचे अनेक दरवाजे आहेत.. असो. स्वामी भक्त हो !! आजच्या श्रीमंत मालोजी राजेंच्या लीलेतून स्वामी आपणास “पद – प्रतिष्ठा – श्रेय” ह्या अहंकाराच्या दरवाजाची ओळख करवून देत आहेत… स्वामींनी आजच्या लीलेमध्ये मालोजी नावाच्या भक्ताला नाही तर मालीजी राजे रुपी अहंकाराला थप्पड मारली आहे.. आणि त्या अहंकाराला स्वामींनी सांगितले कि “ह्या ब्रम्हांडाचा स्वामी मी आहे.. मी कोणा राजाला ओळखत नाही.. मी तुझ्या सारखे दररोज कितीही राजे बनवितो आणि त्यांना मोडून पण टाकतो.. मला फक्त अनन्य भक्तच दिसतात.. तेच माझ्या सोबत सदैव असतात.. मी त्यांच्या सोबत सदैव असतो.” स्वामी भक्त हो !! वरील स्वामी लीलेतून स्वामी आपणास हेच सांगत आहेत कि तुम्हाला समाजात भेटलेले ‘पद’ हा सुद्धा अहंकाराचा एक दरवाजा होऊ शकतो… जेव्हा आपल्या जीवनात एखादी गरज निर्माण होते.. तेव्हा आपणाकडून प्रार्थना करवून घेतली जाते.. आणि त्या वेळेला स्वामी आपल्या शरीराची.. मनाची पात्रता वाढवतात.. आपल्या शरीरात विविध गुण विकसित करतात.. आणि आपली गरज पूर्ण करतात.. आपल्या प्रार्थनेत जर बळ असेल तर स्वामी आपल्या शरीराला इतके तयार करतात कि आपण त्या क्षेत्रात प्राविण्य कमवतो.. आणि आपली गुणवत्ता बघून समाज आपणास एक स्थान देते.. त्या स्थानाला आपण “पद” म्हणतो. जसे तुम्ही उत्तम गायक असाल.. तुमची गायकीची पात्रता वाढली तर समाज तुम्हाला गायन क्षेत्रात उच्चतम पदावर आरूढ करतो.. असे अनेक उदाहरण सामाजिक.. आर्थिक.. आध्यात्मिक.. राजकीय वा वैयक्तिक जीवनात आहेत.. पण पण पण स्वामी भक्त हो !! ह्या मध्ये आपण स्वतःला विसरतो.. आपल्या ख-या स्वभावापासून दूर जातो.. ह्या खोट्या ओळखेलाच आपण सत्य मानून चालतो.. आणि स्वामी भावनेपासून आपण दूर जातो.. शांती पासून दूर जातो.. आनंदापासून दूर जातो.. स्वामी भक्ती पासून दूर जातो.. आणि खोटया प्रतिमेलाच सिद्ध करण्याचा सतत प्रयत्न करतो.. स्वामी भक्त हो !! मालोजी राजेंच्या बाबतीत हेच घडत होते.. मालोजी राजे स्वामींच्या समोर स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते.. आणि स्वामींनी त्यांच्या कानशीलात लावून हेच सांगितले कि ह्या खोट्या प्रतीष्ठेत तू अडकत चालला आहेस.. प्रजेचे कल्याण.. प्रजेचे रक्षण हे आपले आद्य कर्तव्य आहे..हि जाणीव करवून दिली. स्वामी भक्त हो !! आपणास सुद्धा हीच जाणीव सतत ठेवायची आहे.. आपले “पद” हि स्वामींनी आपल्याला दिलेली जबाबदारी आहे ह्याची जाणीव ठेवायची आहे.. मग ते पद घरातील कुटुंब प्रमुखाचे असू दे.. वा कंपनीतील मालकाचे वा कामगाराचे वा देशाच्या राष्ट्र्पतीचे असू दे.. कोणतेही असू दे..!! ह्या सृष्टीचे चालक मालक पालक स्वामीच आहेत.. हि सृष्टी सुंदर व्हावी.. म्हणून पृथ्वीवरील समाजाची रचना तर स्वामींनीच केलेली आहे.. असो. स्वामी भक्त हो !! जाता जाता अगदी थोड्या शब्दात सांगायचे झाले तर आपण करत असलेले काम हि स्वामींचीच सेवा ह्या भावनेने कर्म केले तर हा “ पद प्रतिष्ठेचा ” अहंकार आपले काहीच बिघडवणार नाही.. आणि प्रपंच करत आपली आध्यात्मिक उन्नती होत राहील असे स्वामींना आपल्याला सांगायचे आहे.. खरतर स्वामी लीलांचा अर्थ खूप खोल आहे.. खूप काही सांगावेसे वाटते.. एका एका लीलेमध्येच इतका अर्थ दडलेला आहे कि त्याचे हजारो पानांचे पुस्तक तयार होईल.. परंतु वेळ आणि जागेचे भान ठेवून स्वामींची आज्ञा घेवून इथेच थांबतो.. आणि “ हे स्वामीराया आजचे हे स्वामी वाणीचे तुझे हे फुल तुझ्याच चरणी अर्पण करतो..” “बोला अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्क्कोट निवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !! ”
संदर्भ :- www.SwamiVaani.com






