स्वामी लीला
स्वामी भक्त हो !! स्वामी महाराज हे निर्गुण निराकार परब्रम्ह आहे.. आपल्या सारख्या पामरांसाठी ते अक्कलकोट मध्ये सगुण रुपात आले.. स्वामींनी असंख्य लीला केल्या.. अनेकांना भक्तीला लावले.. असंख्य लोकांचे संसार सुरळीत केले.. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पात्रते नुसार स्वामींनी दिले.. दिवसेंदिवस स्वामींचे महात्म्य वाढत होते.. तसे तसे त्यांची निंदानालस्ती टीका करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत होती.. आपण त्या टीकाकारांना कमनशिबीच म्हणू या..!! अहो ज्यांच्या चरणाचे दर्शन होण्यासाठी हजारो जन्माची वाट पहावी लागते ते परब्रम्ह सगुण रुपात समोर असतांना ते लोक ओळखत नव्हते..!! ओळख तर सोडाच पण उलट त्यांची निंदा नालस्ती करण्यातच त्यांना समाधान वाटत असे.. असो. त्यातीलच एक अभागी श्री नारायणबुवा म्हणून एक सोलापूरचा गृहस्थ होता.. तो अक्कलकोट मध्ये येत परंतु त्याची स्वामीचरणी काही श्रद्धा नव्हती.. तो सतत स्वामींची निंदा करत.. स्वामींच्या प्रत्येक घटनेवर त्याचे लक्ष रहात.. आणि त्यातील एखादी खोड काढून स्वामींवर टीका करण्याची संधी साधत.. मग समजा स्वामी कधी क्षुद्र जातीच्या भक्ताच्या घरी जेवणास गेले तर त्यावर स्वामींची तो निंदा करत.. तो बोलत कि “ हे असे कसे स्वामी.. ह्यांना काही विटाळ नाही.. कोणाकडेही जेवतात.. कोठेही निजतात.. ह्यांना काय संन्यासी म्हणावे ? ” परंतु स्वामी त्याच्या कडे नेहमी दुर्लक्ष करत.. स्वामी भक्त हो !! स्वामी तर साऱ्या ब्रम्हांडाची आई आहे.. स्वामी सर्व विश्वाची माउली आहे.. भरकटलेला का होईना परंतु नारायण बुवा स्वामींचाच बाळच होता.. आता त्यास धडा शिकवण्याची वेळ आली होती.. त्याला स्वामी भक्तीला लावण्याची वेळ आली होती.. आणि तो प्रसंग स्वामींनी जळवून आणला.. एके दिवशी नारायण अक्कलकोट मधून सोलापुरास जाण्यासाठी निघाला.. सोबत असलेली मंडळी स्वामींचे दर्शन घेत होते.. हे बघून नारायणने सुद्धा थट्टेने दर्शन घेतले.. नारायण दर्शन घेत असतांना स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि मोठ्याने बोलले कि “ बोंबलत जा !! ”. नारायणबुवा तर वेगळ्याच अहंकाराने फुगलेला होता.. त्याला काय स्वामींच्या वचनाचा अर्थ समजणार.. त्याने स्वामींचे हे वाक्य उपहासात्मक पणे घेतले आणि सोलापूरास आला.. स्वामी भक्त हो !! “बोंबलत जा” हि स्वामी वाणी होती.. ती सत्यच होती आणि तिच्या सत्यतेचा प्रत्यय नारायणबुवाला आला.. तो असा कि , जेव्हा नारायण बुवा मोठ्या डौलाने सोलापुरात आला.. घरी आल्या नंतर बघतो तर काय… घरात तीन ते चार हजार रुपयांची चोरी झालेली होती.. नारायणाला काय करावे सुचत नव्हते.. त्याने भरपूर तपास केला.. परंतु चोराचा काहीच तपास लागला नाही.. आणि अचानक त्याला स्वामी वाणी ची आठवण झाली.. स्वामी बोलले होते कि “बोंबलत जा ” ह्याचा अर्थ समजला.. आता मात्र नारायाणबुवास पश्चाताप झाला.. आपण स्वामीवर करत असलेल्या टीकेचे हे फळ आहे.. हे आपल्याच कर्माचे फळ आपणास भेटले असे त्यास मनोमन समजले आणि त्याने मनोमन स्वामींची माफी मागीतली आणि स्वामींची निंदा नालस्ती करण्याचे काम त्याने बंद केले आणि स्वामींच्या अनन्य भक्तीस सुरुवात केली..
स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! नारायण बुवाच्या लीलेतून स्वामी आज आपणास हेच सांगत आहेत कि आपणास कोणाची टीका तिरस्कार वा मत्सर करायचा नाही वा आपली कोणी टीका करत असेल तिरस्कार वा मत्सर तर त्या कडे लक्ष द्यायचे नाही.. त्याला माफ करायचे..!! खरतर स्वामी आज आपणास पुन्हा एकदा कर्माच्या नियमाची आठवण करून देत आहेत. कर्माचा नियम आपणास हेच सांगतो कि आपण जे कर्म करतो.. आपणास त्या कर्मा मागील भावनेचे फळ भेटते.. बघा ना !! नारायण बुवा हे नशीब किती खराब होते.. ते तर प्रत्यक्ष परब्रम्हाचा तिरस्कार करत होते.. आणि त्यांस स्वामींनी “ बोंबलत जा ” ह्या स्वामी वाणी तून त्याच्या कर्माचे फळ काय येणार ह्याचे पूर्वसंकेत दिले होते.. आणि त्या प्रमाणे त्यास फळ देखील आले.. पण त्यांचे पूर्वपुण्य असावे म्हणून त्यांस वेळीच सद्बुद्धी भेटली आणि ते स्वामी भक्तीत रममाण झाले. आपणास सुद्धा वरील स्वामी वाणी वाणीतून बोध घेत हेच शिकायचे आहे कि जर तुम्ही अतिशय शुद्ध भावनेने अव्यक्तिगत सेवाकार्य वा सामाजिक सत्कार्य करत असाल आणि तुम्हाला कोणी विनाकारण त्रास वा तुमचा तिरस्कार करत असेल तर त्याचे काहीही मनावर घेवू नका.. जेव्हा एखाद्या अहंकाराला स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटते तेव्हा तो टीका.. तिरस्कार वा त्रास देण्यास सुरुवात करतो.. कदाचित नारायण बुवा मधील अहंकाराला स्वामींचे चमत्कार वा लीला बघून स्वतःचे अस्तित्व जाते कि काय हे वाटले असावे.. आणि त्याचे रूपांतरण तीरस्कारात झाले.. कारण अहंकाराला हिरे सुद्धा कोळसे दिसतात.. म्हणून स्वतः वर विश्वास ठेवा.. स्वतःच्या सत्कर्मावर विश्वास ठेवा.. तुमचे काहीही बिघडणार नाही कारण तुमच्या भोवती स्वामींचे संरक्षण कवच आहे.. उलट त्याच्या टीकेला आपल्या प्रगतीची शिडी बनवा.. त्याचे सल्ले आपण आचरणात आणू या.. आणि स्वामी भक्तीत प्रगती करू या.. आपल्याला आपले लक्ष फक्त स्वामी भक्ती वर ठेवायचे आहे.. आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे त्यास मोठ्या मनाने माफ करू या.. कारण जेव्हा आपण त्यास माफ करतो तेव्हा त्याच्या सोबत तयार झालेल्या कर्म बंधनातून आपण मुक्त होतो.. आणि त्याच्या कर्माचे फळ काय येणार हे स्वामींवर सोडू या.. !! कारण स्वामींच्या दिव्य नियोजनात काय आहे हे आपल्याला काय माहित.. कदाचित त्याला स्वामी भक्तीस लावायचे असेल म्हणून आपल्याला निमित्त करून त्याच्या कडून हे कर्म करवून घेत असावेत..असो.करता आणि करविता ! तूची एक स्वामी नाथा !! माझिया ठाई वार्ता ! मी पणाची नसेची !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com





