आपले स्वामी बोलतात.. “ तुला व्याधी बरी करायची आहे ना !! मग एक काम कर विष्ठा अंगास लाव.. म्हणजे तुझी व्याधी बरी होईल !! ”

Jan 24, 2020

स्वामी लीला
आपले स्वामी महाराज खूप मोठी शक्ती आहे.. हि शक्ती बुद्धीच्या पलीकडील आहे.. म्हणून तिला अतर्क्य म्हणतात.. अशी अतर्क्य शक्ती ह्या पृथ्वीवर युगानुयुगे विविध शरीर धारण करून विश्वाला मार्गदर्शन करत आहे.. अक्कलकोट नगरीत हि शक्ती पुन्हा सगुण रूपात आली.. आणि आगळ्यावेगळ्या लीला करत असे चरित्र निर्माण केले कि आज आपल्या पिढीसाठी नव्हे तर.. लाखो पिढ्यांसाठी ते मार्गदर्शक आहे. असो. असाच एक कृष्ठ रोगाने व्याधी ग्रस्त व्यक्ती त्याचा कृष्ठरोग बरा व्हावा म्हणून गाणगापुरास सेवेसाठी गेला होता.. नित्यनेमाने तो सेवा करत.. सकाळी संगमावर जावून स्नान करत.. श्री गुरुचरित्राचे पारायण करत.. “दत्त महाराज माझी व्यथा ऐका आणि माझा कृष्ठरोग बरा करा” अशा तळमळीच्या तो सतत प्रार्थना करत.. भरपूर दिवस झाले पण त्यास काहीच फरक पडला नाही. व्याधीचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता.. तशी तशी ह्याच्या हृदयातून तळमळीच्या प्रार्थना येत होत्या.. आपण जेव्हा तळमळीने ईश्वराला आळवतो तेव्हा त्याला ऐकावेच लागते आणि त्याच प्रमाणे घडले.. त्या व्यक्तीस स्वप्नात दृष्टांत झाला कि “ मी सगुण रूपात अक्कलकोट मध्ये आहे.. तेथे जावून सेवा करा.. म्हणजे तुमची व्याधी बरी होईल.. ”. स्वप्नातील दृष्टांत बघून ह्या व्याधीग्रस्त व्यक्तीला खूप दिवसांनी आशेचा किरण दिसला आणि तो लागलीच अक्कलकोट नगरीत आला.. स्वामीरायाच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या अक्कलकोट नगरीत येताच ह्या कृष्ठरोग झालेल्या व्यक्तीला खूप आधार आला.. आणि मनोमन विश्वास वाटू लागला कि माझे काम नक्की होणार.. मी नक्की व्याधी मुक्त होणार.. त्यानंतर ती व्यक्ती स्वामींच्या दरबारात आली.. स्वामीरायाची आजानुबाहू मूर्ती बघून भारावून गेली.. आणि स्वप्नात सांगितलेल्या दृष्टांता प्रमाणे स्वामी दरबारात सेवा सुरु केली.. माझी व्याधी आता बरी होणारच ह्या अतूट विश्वासाने त्याने सेवा सुरु केली.. आता अक्कलकोट मध्ये सुद्धा त्यास बरेच दिवस झाले… परंतु त्याची व्याधी बरी होण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती.. आता मात्र शारीरिक त्रास सहन होत नव्हता.. काय करावे त्यास सुचत नव्हते.. शेवटी एके दिवशी त्या व्यक्तीने स्वामींचे दर्शन घेत असतांना अत्यंत तळमळीने स्वामींना प्रार्थना केली “ हे आई आता मला हा त्रास सहन होत नाही.. एक तर माझी व्याधी बरी करा किवा मला मरण तरी दया म्हणजे मी ह्या त्रासातून कायमचा मुक्त होईल.. मी ह्या त्रासातून कायमचा मुक्त होईल..” स्वामी भक्त हो !! स्वामी आई आहे.. तिचे हृद्य कळवळले आणि तिने त्यास सांगितले कि “ तुला व्याधी बरी करायची आहे ना !! मग एक काम कर.. विष्ठा अंगास लाव.. विष्ठा अंगास लाव.. म्हणजे तुझी व्याधी बरी होईल !! ” स्वामींच्या मुखातून हे वाक्य बाहेर पडताच त्यास आनंद झाला.. हि स्वामी वाणी आहे.. ती सत्यच होणार असा मनोमन विश्वास ठेवून त्याने स्वामी आज्ञेचे पालन करण्याचे ठरविले.. स्वामी भक्त हो !! त्या व्यक्तीची स्वामींवर इतकी अतूट श्रद्धा होती कि त्याने मनोमन ठरविले कि विष्ठाच लावायची आहे ना…. मग दुसऱ्याची कोणाची विष्ठा का अंगास लावायची….. आपण स्वामींचीच विष्ठा अंगास लावू या !! आणि त्या प्रमाणे त्याने सुरु केले.. तो दररोज स्वामींचीच विष्ठा अंगाला लावत आणि धवून टाकत.. त्याने हा क्रम सुरु केला.. एक दिवस झाला.. दुसरा दिवस झाला.. तिसरा दिवस झाला.. स्वामी भक्त हो !! त्यानंतर आश्चर्य झाले.. अहो फक्त आठच दिवस झाले.. त्याच्या शरीरावरील कृष्ठरोग पूर्णपणे बरा झाला.. आणि त्याचे शरीर दिव्य झाले.. सर्वांना आश्चर्य वाटले.. इतक्या दिवसांची व्याधी फक्त आठच दिवसात बरी झाली.. ह्या स्वामीरायाच्या अतर्क्य लीला चा आनंद घेत सर्वांनी स्वामीनामाचा जयजयकार घेतला.. बोला अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

स्वामी बोध
स्वामी गुरुतत्व आहेत.. अक्कलकोट नगरी म्हणजे स्वामींचे प्रशिक्षण केंद्र होते.. तेथे स्वामी प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकवत.. स्वामींना फक्त अनन्य भक्ती हवी आहे.. आणि अतूट अभेद्य श्रद्धा..!! नसल्यास स्वामी ती विकसित करत कारण स्वामींवरील प्रेम आणि विश्वास हे सर्व गुणांचा राजा आहे.. ज्याच्या मनात स्वामी बदल अनन्य भक्ति आहे.. स्वामींवर अतूट अभेद्य श्रद्धा आहे.. त्याच्या साठी ह्या विश्वात कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
बघा ना !! स्वामींनी त्या कृष्ठरोग्याच्या बाबतीत हेच केले… सेवा–साधना करवून घेत त्याच्यातील विश्वास दृढ केला.. तो विश्वास इतका दृढ केला कि त्याची चाचणी करण्यासाठी स्वामींनी त्यास विष्ठा लावण्याची आज्ञा दिली.. स्वामी भक्त हो !! तो कृष्ठरोगी परब्रम्हाच्या परीक्षेत पास झाला.. आणि त्याच्या जीवनात चमत्कार झाला… त्याचा कृष्ठरोग फक्त आठ दिवसात बरा झाला… खरतर स्वामींना त्याचा कृष्ठरोग बरा करण्यासाठी इतकी आटापिटा करण्याची गरजच नव्हती.. ते तर परब्रम्ह आहेत.. त्यांच्या एका दृष्टीक्षेपाने तो बरा झाला असता.. परंतु स्वामी गुरु आहेत.. स्वामींनी त्यातील गुण विकसित करून त्यास पात्रतेचे बनविले.. त्याला आत्मनिर्भर बनविले.
आजही आपल्याला समस्या असतील वा अडचणी असतील आणि आपण बोलाल कि इतके दिवस मी सेवा करतो माझे संकट का जात नाही.. वा अडचण का सुटत नाही तर त्या वरील उत्तर म्हणजे आजची स्वामी वाणी आहे.. स्वामी भक्त हो !! आपणास अतिशय कळकळीने सांगणे आहे कि नि:शंक राहा..निर्भय राहा.. स्वामी आपल्यातील प्रेम आणि विश्वास हे मुख्य गुण विकसित करत आहेत.. जसे १०० डिग्री सेल्सिअसला पाण्याची वाफ होते.. आणि त्या वाफेत इतकी शक्ती आहे कि ते इंजिन सुद्धा चालवू शकते.. अगदी तसे आपल्या शरीरातील विश्वास एका उच्चतम अवस्थेवर गेला कि कोणतेही संकट असू दे… जीवनात चमत्कार होण्यास सुरुवात होती..
स्वामी भक्त हो !! आजच्या स्वामी वाणी मुळे तर आपणास हा आधार भेटतो आहे कि स्वामी आपला विश्वास त्या सर्वोच्च अवस्थेवर नेणारच.. आणि आपल्या जीवनात चमत्कार होणारच.. आपल्याला फक्त हाच विश्वास ठेवून समर्पण करायचे आहे कि आपले गुरु कोणी साधे सुधे व्यक्ती नाही तर ह्या विश्वाचा चालक मालक पालक परब्रम्ह स्वामी महाराज आहेत.. बस फक्त इतका विश्वास स्वामींना आपल्या कडून हवा आहे..
चला तर मग स्वामींना आज आपण प्रार्थना करू या “ हे गुरुमाउली…!! तू माझी आई आहेस.. तूला माझी सतत काळजी आहे.. तु माझे संपूर्ण जीवन चालवते आहेस.. तु माझे फक्त कल्याणाच करते आहेस.. आई..!! मला माहित आहे कि जरीही माझ्या जीवनात संकट असतील वा दु:ख असतील तर त्याला निमित्त करून तू माझ्यात श्रद्धा दृढ करते आहेस.. माझी भक्ती वाढविते आहेस.. मला तुझ्या कृपेच्या पात्रतेचे करते आहेस..!! आई.. माझी फक्त एकच विनंती आहे कि मला त्या संकटाचा सामना करण्याची शक्ती दे.. आणि तू जे आहेस ते मार्गदर्शन समजण्याची बुद्धी दे !! ” धन्यवाद स्वामी..!! कोटी कोटी धन्यवाद स्वामी !!!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News