आपले स्वामी बोलतात.. “ काय रे !! आम्हाला भिकारी समजतोस का ? पारायणाच्या दिवशी आमच्या नैवेद्यावर फक्त एकच लाडू आणि मुठभर भात का वाढला होता.. तेवढ्यात आमचे पोट कसे भरेल.. खरतर हे ब्रम्हनिष्ठ बुवांनाच कळायला हवे !! ”

Jan 29, 2020

स्वामी लीला
स्वामी भक्त हो !! आजची स्वामी वाणी !! आपले स्वामी महाराज हे खूप मोठी शक्ती आहे.. स्वामी महाराज अशी शक्ती आहे कि ज्यातून हे विश्व निर्माण होते आहे.. संचालित होते आहे.. आणि ह्यातच विलीन होते आहे.. अशी हि ब्रम्हांडातील सर्वोच्च एकमेव शक्ती सगुण रुपात अक्कलकोट नगरीत अवतरली होती.. स्वामींच्या आगमनाने अक्कलकोट नगरीचे भाग्य उजळले होते.. तेथील प्रत्येक व्यक्ती स्वामीमय झालेली होते.. स्वामी दत्तावतारी आहेत.. ह्याची प्रचीती असंख्य स्वामी भक्तांना आलेली होती.. प्रत्येक स्वामी भक्त त्याच्या त्याच्या पद्धतीने स्वामींची सेवा करत.. कोणी स्वामी दरबारात साफसफाई करत.. कोणी स्वामी नामाचा जप करत तर कोणी श्री गुरुचरित्राचे पारायण करत.. कोणी स्वामींना नैवेद्य दाखवून पुन्हा घरी प्रसाद म्हणून घेऊन येत… असेच एकदा जोशी बुवा ह्यांनी दत्तजयंतीच्या उत्सवात श्री गुरुचरित्रचे पारायण सुरु केले होते.. त्यावेळी त्यांच्या कडे बडोद्याचे ब्रम्हनिष्ठ बुवा हे सुद्धा आलेले होते.. पारायण सुरु असतांना स्वामींनी आपल्या घरी भोजनाला यावे म्हणून जोशी बुवा स्वामींना विनंती करण्यासाठी येतात.. त्या दिवशी स्वामी आनंदात होते.. आणि हीच संधी साधून जोशी बुवांनी स्वामींना विनंती केली कि “ स्वामी रायाने घरी भोजनास यावे !!” तेव्हा स्वामींनी त्यांस लागलीच सांगितले कि “आम्ही चौथे दिवशी येवू”
आणि त्या नंतर बरोबर स्वामी चौथे दिवशी सोबत असलेल्या सेवेक-या सह जोशी बुवांच्या घरी जेवनास गेले.. स्वामींचे आगमन घरी होताच.. सर्वांनी स्वामींच्या पूजन केले.. स्वामी चरणाचे तीर्थ सर्वांना दिले आणि स्वामींसह सर्व सेवेकरी जेवणास बसले.. जेवण सुरु असतांना जोशीबुवांस खूप आनंद झालेला होता.. आणि त्या आनंदाच्या भरात जोशीबुवा जरा विनोदाच्या स्वरात बोलले कि “ पारायण सुरु असतांना स्वामींचे आगमन झाले नाही.. ह्याचेच खूप वाईट वाटते आहे..!! ”. जोशी बुवांनी असे बोलताच स्वामींचा चेहरा रागाने लालबुंद झाला आणि स्वामी लागलीच बोलले “ काय रे आम्हाला भिकारी समजतोस का ? पारायणाच्या दिवशी आमच्या नैवेद्यावर फक्त एकच लाडू आणि मुठभर भात का वाढला होता.. तेवढ्यात आमचे पोट कसे भरेल.. खरतर हे ब्रम्हनिष्ठ बुवांनाच कळायला हवे !!”
स्वामींचे हे वाक्य ऐकताच जोशीबुवा आणि ब्रम्हनिष्ठ बुवा ह्यांना आश्चर्य वाटले आणि जर गोंधळल्यासारखे सुद्धा वाटले.. स्वामींच्या बोलण्याचा अर्थ कोणालाच समजला नाही. जेवण झाल्या नंतर उभयतांनी चौकशी केली आणि त्यात असे समजले कि पारायण सुरु असतांना दररोज स्वामींना नैवेद्य दाखविला जात असे.. आणि त्या दिवशी सुंदराबाई ने स्वामींच्या नैवेद्यात फक्त एक लाडू आणि मुठभर भातच वाढला होता.. आता मात्र जोशिबुवांस समजले कि आपण दररोज स्वामीना जो नैवेद्य दाखवत असतो.. भलेही स्वामी तो खात नसतील.. वा तेथील भक्तांना किवा प्राण्यांना प्रसाद म्हणून देत असतील.. परंतु तो अप्रत्यक्ष्य का होईना स्वामीच ग्रहण करत होते.. ह्याची प्रचीती आली.. आणि त्या नंतर त्यांनी स्वामींची नाक घासून माफी मागितली .. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वामींना नैवेद्य अर्पण केला .. तेव्हा स्वामींना खूप आनंद झाला आणि स्वामींनी त्यांस आज्ञा दिली कि नैवेद्य देतांना “ एक दोन माणसांना पुरेल इतके अन्न वाढत जावे…!! ” आणि जोशीबुवांनी सुद्धा आनंदाने स्वामी आज्ञेचे पालन केले. बोला अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! आजचा स्वामी बोध !!
आजच्या स्वामी वाणी तून स्वामी आज आपणास आजच्या पिढीसाठी हेंच सांगत आहेत कि भलेही मी तुम्हाला दिसत नसलो.. परंतु तुम्ही जे जे कर्म वा सेवा अनन्य श्रद्धेने माझ्या सोबत करत आहात.. ते मला पोहचत आहे.. जसे जोशीबुवांना वाटले कि स्वामीनी त्यांच्याकडे पारायण सुरु असतांना जेवणास यायला हवे होते..परंतु स्वामीनी त्यास लगेचच स्पष्ट केले कि तू जो मला नैवद्य दाखवत होतास तो मी स्वीकार करत होतो.. त्याचे भोजन मी करतच होतो.. भलेही पारायण काळात नैवेद्य प्रत्यक्षपणे मी खाल्ला नसेल.. स्वामी प्रसाद म्हणून इतर कोणीतरी खाल्ला असेल.. मग तेथील सेवेकरी असो वा तेथील पाळीव प्राणी असो.. शेवटी तो स्वामींनाच प्राप्त होत होता.
स्वामी भक्त हो !! आज आपण सुद्धा आपल्या श्रद्धेने स्वामींची सेवा करत आहात.. कोणी पारायण करत असेल.. कोणी माळ जपत असेल वा कोणी स्वामी सेवा म्हणून सामाजिक कार्य करत असेल.. वा कोणी समाधी अवस्थेत जावून स्वामी अनुभवावर राहून भक्ती करत असेल.. स्वामींच्यासाठी कोणीही मोठ नाही वा छोटा नाही.. आपली स्वामी श्रद्धा इतकी दृढ करा कि जर आपण स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तर प्रत्यक्ष स्वामी समोर बसलेले आहे ह्या अतूट श्रद्धेच्या भावनेने दाखवा.. आपण पारायण वाचत असाल तर प्रत्यक्ष परब्रम्ह समोर बसलेला आहे आणि त्यास आपण त्याचे चरित्र ऐकवत आहोत हि श्रद्धा बाळगा.. अथवा आपण सामाजिक कार्य करत असाल तर आपण प्रत्यक्ष स्वामींचीच सेवा करतो आहे अशी श्रद्धा ठेवा.. जशी आपली श्रद्धा तसे आपले जीवन हा स्वामींच्या प्रकृतीचा नियम आहे.. चला तर मग सर्व मिळून स्वामींना आळवू या आणि तळमळीने प्रार्थना करू या “ हे गुरुमाउली !! माझ्या शरीराला निमित्त करून तूच तुझी अनन्य भक्ती करवून घेतो आहेस..!! हे स्वामीआई.. माझी इतकीच प्रार्थना आहे कि हि भक्ती बघून तुला खूप आनंद होतो आहे आणि तू ह्या भक्तीचा अतिशय आनंदाने स्वीकार करतोच आहेस हे बघण्याची मला अतूट श्रद्धेची दिव्यदृष्टी दे…!! ” बोला अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटनिवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News