अफलातून मज्जा ! काळ चित्रपट नुकताच प्रदर्शित

Feb 2, 2020

माझा मित्र अभिनेता संकेत विश्वासराव याचा नुकताच प्रदर्शित झालेला “काळ” हा चित्रपट आज त्याच्यासोबतच पाहण्याचा योग आला…. जगाचा एक नियम आहे तेच तेच दाखवण्यापेक्षा इतरांहून आपण वेगळं काय करतो हे लोकांना जास्त भावतं आवडत.  असाच एक आगळा वेगळा प्रयोग एका नव्या उमद्या दिग्दर्शकानं केला आणि तो यशस्वी सुद्धा झाला…
सिनेमा बनवलाय म्हणून उगाचच त्यात काही तरी मिक्स मसाला भरायचा. नको ते बळेच हसायला लावणारे शब्द टाकायचे.. आणि काही तरी वापरून झकपक असा सिनेमा तयार करायचा आणि लोकांनी उगाचच तो बघायचा हा ट्रेंड आता बंद होत आलाय…
मनोरंजनासह त्यातील तांत्रिक बाजू समजून घेणारा त्या चित्रपटाच्या पडद्यामागच्या टीमचा विचार करणारा, कथेवर विचार करणारा प्रेक्षक वर्ग उदयाला येऊ लागलाय..  आणि अगदी अशाच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारा काळ हा चित्रपट आहे….. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि तंत्रज्ञांसह सर्वांनी आपल्या भूमिका चोख पार पाडून मेहनतीने “काळ” प्रेक्षकांच्या समोर ठेवलाय.
वाऱ्याच्या दिशेने जो सहज फडकतो त्याला मी झेंडा म्हणतो…  आणि वाऱ्याच्या विरुद्ध जो ठाम उभा राहतो त्याला मी पर्वत म्हणतो…  असच अगदी पर्वतासारखं काम करून संदीप सर आणि सगळ्या टीमने इतर लोकांपेक्षा वेगळं करण्याचा अप्रतिम प्रयत्न केला आहे….
मला भयपटांची विशेष आवड आहे… आणि मी मित्रांना बघण्यासाठी नेहमीच आग्रह करत असतो. कारण भिती काय असते किंवा आपल्याला भिती वाटते का असं वारंवार मला वेगवेगळ्या चित्रपटांमुळे स्वतःबद्दल तपासायला आणि अनुभवायला आवडत. काळ बघताना सुरवातीला भिती अधिक विनोद असं वातावरण तयार झालं..  आणि मध्यंतरानंतर तर अंगावरचे शहारे आणि हृदयाचे ठोके वाढत वाढतच गेले….
पण अफलातून मज्जा आली…
सरळ सोप्या पद्धतीने आपल्या समोर एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा बऱ्याच दिवसांनंतर आलाय… 
सर्वांनी तो नक्की बघा अशी माझी सर्व मित्र परिवाराला विंनती आहे..  तर लवकरात लवकर जवळच्या चित्रपटगृहात जा आणि काळ नक्की बघा…

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News