शिवजन्मानिमित्त होणाऱ्या कॉन्टेस्टमध्ये प्रेक्षकांना मिळणार शाही नथ जिंकण्याची संधी, महाविजेत्याला मिळणार ठुशी जिंकण्याचा मान!

Feb 4, 2020

सोनी मराठीवरील  ‘स्वराज्य जननी जिजामाता’  या मालिकेत आता जिजा माऊलीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण लवकरच  दाखवला जाणार आहे. हा क्षण आहे शिवरायांच्या जन्माचा. शिवनेरी गडावर या मुलखावेगळ्या आईच्या पोटी शिवबा जन्मला. हा इतिहासातला सुवर्णक्षण होता. या सोन्यासारख्या क्षणाचा सोहळा सोनी मराठी, पु. ना. गाडगीळ यांच्या साथीने साजरा करत आहे.  ज्यांनी स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेसाठी खास दागिने तयार केले आहेत तसेच लहानग्या शिवबा साठी देखील पु. ना. गाडगीळ यांनी खास दागिने तयार केले आहेत. आता प्रेक्षकांना या मालिकेच्या निमित्ताने ‘शाही नथीचा नजराणा’ आणि ठुशी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होऊन जिंकता येऊ शकणार आहे.  
शिवजन्मानिमित्त आयोजित ‘शाही नथीचा नजराणा’ या प्रश्नमंजुषा  स्पर्धेत सहभागी होण्यासाठी sonymarathi.com वर लॉग इन करून रात्री ८.३० वाजता, स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना द्यावी लागणार आहेत. या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या स्पर्धकांपैकी एका भाग्यवान विजेत्याचं नाव दुसऱ्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या भागातून जाहीर केलं जाणार आहे. ८ ते १९ फेब्रुवारीदरम्यान दररोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या प्रेक्षकांमधून एक विजेता ठरणार असून त्याला पु. ना. गाडगीळ यांनी खास तयार केलेली शाही नथ तर एका महाविजेत्याला ठुशी भेट दिली जाणार आहे.  
तेव्हा ८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी sonymarathi.com वर लॉग इन करा आणि ‘शाही नथीचा नजराणा’ प्रश्नमंजूषेत सहभागी व्हा. यासाठी पाहत राहा स्वराज्यजननी जिजामाता सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता, फक्त सोनी मराठीवर.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News