आपले स्वामी बोलतात.. “ आता तू आमची नोकरी कर.. म्हणजे ब्रम्हनिष्ठ होशील.. आणि तुझे हे गाठोडे आम्हाला दे..!! ”

Feb 26, 2020

स्वामी लीला
अहमदनगर जवळ बांबोरी नावाच्या गावी वामनबुवा नावाचे एक अत्यंत सात्विक वृत्तीचे गृहस्थ रहात होते.. ते दत्तउपासक होते.. त्यांना लहानपणापासून सत्संगाची आवड होती.. बुवा सरकारी नोकरी करत होते.. नोकरी मध्ये त्यांचे चित्त स्थिर नव्हते.. त्यांनी तीन – चार नोकऱ्या बदलल्या होत्या… त्यांच्या मनातील अस्थिरता जाण्यासाठी ते अनेक साधू… संत.. संन्यासी.. फकीर.. योगी.. ह्यांच्या सोबत वेदांत चर्चा करत.. परंतु त्यांचे चित्त स्थिर होत नव्हते… ह्यातच ते मातोश्रींना घेवून पुण्यात आले.. पुण्यात तुळशीबागेत नाना नातूंच्या वाडयात ते रहात होते.. उपजीविकेचे साधन म्हणून ते लिहिण्याचे काम करू लागले.. असेच एके दिवशी वामनबुवा आणि काही मंडळी सत्पुरुषांबद्दल आध्यात्मिक चर्चा करत होती.. चर्चा खूपच रंगली होती.. तितक्यात तेथे एक तेज:पुंज असा ब्राम्हण आला आणि तो बोलला “ अहो शेवटी सद्गुरुवाचून सर्व व्यर्थ आहे !! ” त्या अचानक आलेल्या ब्राम्हणाचे बोलणे ऐकताच.. बुवा एकदम म्हणाले.. ” जो माझ्या चित्ताची स्थिरता करेल त्यास मी सद्गुरू दत्तात्रय मानेन.. परंतु खंत हि आहे कि, अद्याप असा कोणी भेटलेला नाही हो !!” वूबांचे हे बोलणे ऐकताच ब्राम्हण स्मित हास्य करून बोलला “ असे आहे का… मग तु अक्कलकोटला जा.. तेथे श्री स्वामी समर्थ तुला गुरुदर्शन देतील.. तुझे संपूर्ण समाधान होईल.. जा लवकर जा.. वेळ वाया घालवू नकोस..!! ” त्यानंतर तो ब्राम्हण तेथून निघून गेला.. तो कोठे गेला हे कोणालाच समजले नाही असो. त्या ब्राम्हणाच्या बोलण्यात एक वेगळीच उर्जा होती.. असे बोलणे ऐकताच बुवांसह तेथे असलेल्या सर्व मंडळींनी ह्यात काहीतरी तथ्य नक्की असेल असे समजून अक्कलकोट मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला वामनबुवा अक्कलकोट येथे येण्यास निघाले.. सोलापूर पर्यंत रेल्वेने आले.. आणि तेथून ते पायीच अक्कलकोट मध्ये आले.. अक्कलकोट मध्ये आल्या नंतर स्वामी बाजूलाच असलेल्या ह्द्रेस गेले आहे असे समजले.. बुवा स्वामींच्या दर्शनासाठी व्याकूळ झालेले होते.. स्वामींच्या शोध घेत घेत.. रोडगी आणि मिरगी ह्या दोन्ही गावांच्या मध्ये असेलेल्या पयोनदी परिसरात स्वामीं वामनबुवास दिसले.. स्वामींचे दिसताच बुवास खूप आनंद झाला.. बुवांनी धावत जावून स्वामींचे दर्शन घेतले.. तेव्हा स्वामींनी त्यांच्या कडे बघितले आणि बोलले कि “काय रे !! आमच्या ब्राम्हणाची थट्टा करतोस ??”… स्वामींनी असे बोलताच बुवांस आश्चर्य वाटले.. त्या ब्राम्हणाला स्वामीनीच पाठवले होते हि खूण त्यांस पटली आणि त्यानंतर त्यांनी नदीमध्ये स्नान करून स्वामींचे पूजन केले.. आणि अत्यंत व्याकूळ मनाने स्वामींचे चरण घट्ट पकडून बोलले “ स्वामी आपणच माझे श्री गुरु आहात.. आता मला अनुग्रह द्या..!! ” बुवांनी असे बोलताच स्वामींनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने बघितले त्यांस अवधूत गीता दिली आणि बोलले “ आता तू आमची नोकरी कर.. म्हणजे ब्रम्हनिष्ठ होशील.. आणि तुझे हे गाठोडे आम्हाला दे..!!” त्यांनंतर बुवांनी स्वामी आज्ञेप्रमाणे कमरेला लंगोटी लावली आणि सर्व सामान स्वामी चरणी अर्पण केले.. बुवांचा समर्पित भाव बघताच स्वामींना आनंद झाला.. स्वामींनी त्यास त्याचे सामान पुन्हा परत दिले..
पुढे असेच एकदा बुवा गाणगापुरास श्री गुरुचरित्र पारायणास गेले असता.. त्यांस स्वप्नात श्री दत्तगुरूंनी दर्शन दिले आणि पोथी हातात देत सांगितले कि “ मीच अक्कलकोटनगरीत सगुण रुपात आहे.. आता इकडे तिकडे भटकू नकोस.. भटाचा आणि तिथीचा विचार कर !!” असा स्पष्ट संकेत मिळताच बुवा पारायण आटोपून अक्कलकोटमध्ये आले.. अक्कलकोट मध्ये येताच त्यांनी स्वामी दर्शन घेतले आणि स्वामींना विनंती केली कि “ स्वामी.. आपण स्वप्नात सांगितले कि भट आणि तिथीचा विचार कर.. त्याचे मनन कर.. पण स्वामी मी अज्ञानी आहे.. कृपा करून भट म्हणजे काय आणि तिथी म्हणजे काय… ह्याचा अर्थ सांगावा..!! ” त्यानंतर स्वामींनी त्यासकडे करुणामय नजरेने बघितले आणि बोलले “ अरे ह्याचा अर्थ आहे प्रकृति-पुरुष.. ”… त्या नंतर बुवा काही दिवस स्वामीसेवेत राहिले.. स्वामींनी त्यास प्रत्यक्ष अनुभवाने सर्व ज्ञान दिले.. अव्यक्त निराकार अस्पर्शा मूळ पुरुषाचे म्हणजेच सुर्ष्टी निर्माण होण्यापूर्वीच्या स्वामींच्या पूर्व अवस्थेचे अनुभवाने ज्ञान दिले.. आणि कर्मेंद्रियांच्या द्वारे अनुभवणाऱ्या प्रकृतीचे सुद्धा ज्ञान दिले.. त्यातील भेद अनुभवाने समजावला.. आणि त्या नंतर घरी जावून गाईची सेवा कर.. म्हणजेच आता अंत:करण शुद्ध ठेवून भक्तीत रममाण हो.. असे सांकेतिक भाषेत उपदेश दिला.. त्यानंतर बुवा पुण्यात आले.. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या मातोश्रींची सेवा.. स्वामींचे भजन पूजन आणि वेदांत ग्रंथांचे अवलोकन करत आनंदाने राहिले.. बुवा पूर्णत्वास प्राप्त झाले..!!
बोला अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटनिवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!!

स्वामी बोध

स्वामी भक्त हो !! उदया २७ जुलै २०१८. उदया प्रत्येक शिष्याच्या जीवनातील अत्यंत भावूक आणि जिव्हाळ्याचा दिवस आहे.. तो म्हणजे श्री गुरुपौर्णिमा.. आपले गुरु तर प्रत्यक्ष परब्रम्ह आहेत.. ज्याने अनंत कोटी ब्रम्हांड निर्माण केले.. असे मूळ पुरुष ब्रम्हांडनायक आपले श्री गुरु आहेत.. अशी हि आपली स्वामी आई आपला आणि आपल्या कुटुंबाचा तळहातावरील फोडा प्रमाणे क्षणोक्षणी काळजी घेत आहे.. ह्या आपल्या लाडक्या श्री गुरूं दैवताचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे श्री गुरुपौर्णिमा आहे.. खरतर आपल्या शरीराच्या चामड्याची चप्पल करून जरीही आपण स्वामी चरणी अर्पण केली तरी स्वामींचे ऋण आपण फेडू शकणार नाही.. परंतु आजच्या स्वामी वाणीचा संदर्भ घेता.. जसे वामनबुवांनी स्वामींना विनंती केली कि स्वामीं तुम्हीच माझे गुरु व्हा.. माझ्या वर अनुग्रह करा.. तेव्हा स्वामींनी त्यास आमची नोकरी कर.. म्हणजेच आमची भक्ती कर.. असा उपदेश दिला आणि आपले गाठोडे देण्याचा आदेश दिला आहे.. इथे गाठोडे चा अर्थ आहे कि आपल्या मान्यता.. संस्कार.. विकार.. अहंकार.. दु:ख.. समस्या.. वगैरे वगैरे वगैरे. स्वामी भक्त हो !! आपणास सुद्धा आपले अहंभावाचे गाठोडे स्वामींच्या चरणी अर्पित करायचे आहे..+ आपले दु:ख.. आपले समस्या.. आपली संकटे ह्याचे गाठोडे स्वामींना समर्पित करायचे आहे.. आणि हृदयातून मिळणाऱ्या स्वामी आदेशाची अंमलबजावणी करून.. स्वामी आदेशा प्रमाणेच कर्म करायचे आहे.. भक्तीच्या.. स्वामी प्रेमाच्या भावनेवर राहूनच कर्म करायचे आहे.. वामनबुवास त्यांच्या चित्तास स्थैर्य हवे होते.. म्हणजे त्यांना स्वानुभव हवा होता.. पण त्यांस दिशा भेटत नव्हती.. जेव्हा त्यांनी स्वामींना समर्पण केले… त्यानंतर त्यास योग्य मार्गदर्शन सुरु झाले.. जसे “ प्रकृती पुरुष… गाईची सेवा कर ” आदी संकेत देवून स्वामींनी त्यांच्या आध्यात्मिक यात्रेस दिशा दिली.. आज आपण ह्या विषयावर जास्त खोल नाही जाणार.. भविष्यात स्वामी ह्यावर नक्कीच बोलून घेतील.. परंतु आज आपण इतका अर्थ घेवू कि आपली समस्या काहीही असो.. मग तुम्हाला वामनबुवा सारखा आत्मसाक्षात्कार हवा असेल वा आपल्या दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी हि समस्या असेल.. प्रत्येकाची वाटचाल हि पूर्णत्वाच्या दिशेलाच आहे.. अंतिम समाधानाकडेच आहे.. स्वामींसाठी कोणीही मोठा नाही वा छोटा नाही.. स्वामी प्रत्येकाच्या गरजे नुसार मार्गदर्शन करत आहेत.. स्वामींना फक्त भक्ती हवी आहे.. विश्वास हवा आहे…. तुम्ही कितीही ज्ञानी झालात परंतु भक्ती शिवाय सर्व अपूर्ण आहे.. आज स्वामींनी बुवांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर गाईची सेवा करण्यास सांगितली.. म्हणजेच भक्ती करण्यास सांगितली.. ज्ञानाने दिव्यशांती अनुभवाची ओळख होते तर भक्तीनेच दिव्य शांती अनुभवाच्या आनंदावर वर स्थिर राहता येते.. चला तर मग आज स्वामींना आपण प्रार्थना करू या “ हे स्वामीराया अरे.. तू सोडून मला कोणीच नाही… तूच माझा गुरु.. तूच माझी आई.. तूच माझा बाप.. तूच माझा सखा.. सर्वकाही तूच आहेस.. हे आई !! हे संपूर्ण जीवन तुला समर्पित करतो आहे.. माझी इतकीच विनंती आहे कि माझ्या कडून तुला भूषणावह होईल असे कर्म करवून घे.. आणि जीवनात घडणारी प्रत्येक घटना तुझ्याच इच्छेने होत आहे हे बघण्याची अनन्य भक्तीची दृष्टी दे !! ”बोला अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटनिवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News