स्वामी लीला
आपल्या स्वामी महाराज चराचरात आहेत.. स्वामी हे खूप मोठी शक्ती आहेत.. स्वामी प्रत्येकाच्या हृदयात आहेत.. तेथुन ते सतत मार्गदर्शन करत आहेत.. असेच एक ब्राम्हण पोटदुखीच्या दुखण्याने बेजार झालेला होता.. त्याची दत्त महाराजांच्या चरणी दृढ भक्ती होती.. तो नेहमी नरसोबाच्या वाडीला दर्शनाला जात असे.. पोटदुखी जाण्या साठी त्याने असंख्य वैद्य केले परंतु काहीच उपाय होत नव्हता… एकेदिवशी तो नरसोबाच्या वाडीला दर्शनाला आला असतांना त्याने दत्तप्रभूंना अतिशय तळमळीने आपले दुखणे सांगितले.. त्याने आपला आजार बरा व्हावा म्हणून दत्तगुरूंना विनंती केली आणि अतिशय विश्वासाने साकडे घातले कि माझा पोटदुखीचा आजार बरा झाल्यास “सव्वा रुपयाचे पेढे वाहीन”. असा भोळाभाबडा नवस करून तो ब्राम्हण त्या नंतर त्याचे घरी आला.. त्यांनंतर काही दिवसातच दत्त कृपेने त्याचे दुखणे बरे झाले… आणि त्यानंतर त्याचे दैनदिन जीवन सुरळीत सुरु झाले.. परंतु दैनदिन जीवन सुरळीत सुरु झाल्या नंतर त्यास दत्त प्रभूंना दिलेल्या शब्दाचा विसर पडला.. असे जवळ पास दहा वर्ष गेली.. दहा वर्षांनंतर तो काही कामा निमित्त अक्कलकोट मध्ये आला होता.. अक्कलकोट मध्ये आल्या नंतर त्यास स्वामींच्या लीलांबद्दल समजले.. स्वामी दत्त अवतारी आहेत ह्या बद्दल त्याने पुष्कळ ऐकले.. आणि ह्याच कुतूहलापोटी तो स्वामींचे दर्शन घेण्यासाठी स्वामींच्या दरबारात आला.. स्वामींची आजानुबाहू तेज:पुंज मूर्ती बघून त्यास खूप समाधान वाटले आणि स्वामींचे दर्शन घेण्यासाठी जवळ आला.. स्वामींचे दर्शन घेत असतांना स्वामींनी त्याच्याकडे अचानक बघितले आणि मोठ्याने बोलले “ काय रे !! ब्राम्हणा आमचे सव्वा रुपयाचे पेढे कुठे आहे.. अरे !! आम्हाला दिलेला शब्द विसरलास का ? ” स्वामींची हि वाणी ऐकताच ब्राह्मणास लगेच दहा वर्षा पूर्वी नरसोबावाडीला पोटदुखी थांबावी म्हणून दत्त गुरूंना केलेल्या नवसाची आठवण झाली… आणि स्वामींना हे कसे कळले म्हणून त्यास आश्चर्य वाटले.. आणि मनोमन स्वामी दत्तावतारीच आहेत ह्याची खात्री पटली.. त्या नंतर त्या ब्राम्हणाने स्वामींची नाक घासून माफी मागितली आणि आपल्या नवसाची पूर्तता अक्कलकोट मध्ये केली.. आणि पुढे तो स्वामी भक्तीत रममाण झाला.. बोला अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
आजची स्वामी वाणी जरी छोटी असेल परंतु त्यातील मतितार्थ खूप मोठा आहे.. आजच्या स्वामी लीलेतून स्वामीं आपणास पुन्हा एकदा वचनबद्धता ह्या दिव्य गुणाची आठवण करून देत आहेत.. खरतर सामान्य बुद्धीने विचार केला तर जो ब्रम्हांडाचा नायक आहे.. ज्याने सारे विश्व तयार केले.. त्याला सव्वा रुपयाच्या पेढ्याची गरज तरी काय आहे !! स्वामी भक्त हो !! अहो त्याला काहीच गरज नाही !! पण भविष्यातील पिढ्यांसाठी दूरदृष्टीकोन समोर ठेवून.. वचनबद्धता.. प्रामाणिकपणा ह्या गुणांची शिकवण देण्यासाठी स्वामींनी हि लीला केली.. कारण आज ह्या विश्वाला.. समाजाला.. विश्वसनीय लोकांची खूप गरज आहे.. जर आपण प्रामाणिक असाल.. शब्दाला जागणारे असाल.. तर विश्वाच काय पण खुद्द स्वतः स्वामी आपल्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात.. म्हणून आजच्या स्वामी वाणी चा संदर्भ घेता.. सर्वप्रथम कालच्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपण स्वामींना काही संकल्प केला असेल तर त्याचे स्मरण आणि अंमलबजावणी आपल्याला करायची आहे.. हि अंमलबजावणी करणे हीच स्वामी सेवा आहे… आपल्याला त्या शब्दाला आपल्याला जागे रहायचे आहे.. अहो !! आपण समाजाच्या नजरेत विश्वसनीय बनल्याने आपल्याला जर इतका फायदा होत असेल.. तर विचार करा कि स्वामींच्या नजरेत विश्वसनीय बनल्याने आपल्या जीवनात काय काय चमत्कार घडतील ह्याची कल्पनाच आपण करू शकणार नाही.. स्वामी नामाचा संकल्प सोडा.. ह्याने मनाची एकाग्रता वाढेल.. मनाची एकाग्रता वाढल्याने स्वामींचा आतील आवाज ऐकू येईल.. आणि प्रत्यक्ष परब्र्म्हाच्या हृदयातून येणाऱ्या आदेशाचे जर आपण पालन केले तर बघा जीवन किती छान असेल.. सुंदर असेल.. समृद्ध असेल..!! चला तर स्वामींना प्रार्थना करू या “ हे परब्रम्हा !! माझ्यात वचनबद्धता हा गुण विकसित कर.. मला तुझ्या नजरेत विश्वसनीय बनव.. मी जे जे संकल्प केले आहेत.. जे धेय्य ठरविले आहेत.. ते साध्य करण्याची शक्ती मला दे.. हे स्वामी समर्था.. तू माझा गुरु आहेस.. ह्यासाठी मला सतत प्रेरणा दे.. मला तुझे मार्गदर्शन दे..!!” बोला अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com






