आपले स्वामी बोलतात.. “ काय रे मुर्खा..!! माजलास काय ? पूर्वीचे स्मरण विसरलास वाटत.. !!अरे चढेल तो पडेल.. हा व्यर्थचा पोकळ अभिमान सोडून दे !! ”

Jun 20, 2020

स्वामी लीला
आपले स्वामी महाराज प्रेमाचा सागर आहेत.. ज्याला ज्याला स्वामींभक्तीची गोडी लागते.. तो स्वामीमय होउन जातो.. असेच अक्कलकोट मध्ये राजेसाहेबांचा गव्हार नावाचा हत्ती पिसाळला होता.. त्याला महिपालाच्या मंदिराजवळ बांधून ठेवले होते.. तो इतका पिसाळला होता कि महिपालाच्या मंदिराजवळून लोकांना जाण्याची भीती वाटत होती.. त्याच्या चारही पायाला साखळदंडांनी बांधून ठेवलेले होते तरीही तो सोंडेने दगडांचा वर्षाव करीत.. त्या रस्त्याने गाई म्हशी सुद्धा जाण्याच्या बंद झाल्या.. सर्वांना तेथून जाण्याची भीती वाटू लागली.. कारण तो कधी साखळ दंड तोडून पळेल आणि प्राण घेईल ह्याचा भरवसा राहिला नव्हता.. हत्तीचा मद बघता.. राजेसाहेबांना खूप चिंता वाटू लागली.. काय करावे हे त्यांस सुचत नव्हते.. हत्ती तर मुका प्राणी.. त्याला कसे नियंत्रित करावे.. हा प्रश्न राजेसाहेबांस पडला.. शेवटी त्यांच्या मनात एक विचार आला.. कि ज्याने अनंत कोटी ब्रम्हांड तयार केले.. ज्याने मानवासह हे पशु पक्षी तयार केले.. त्या परम पित्यालाच… स्वामीरायलाच शरण जावे.. !! आणि त्या प्रमाणे राजेसाहेब स्वामींच्या दर्शना साठी येतात.. स्वामींच्या दर्शनास आल्यानंतर.. परब्रम्ह स्वामी राया समोर हात जोडून उभे राहतात.. आणि स्वामींना विनंती करतात कि “ महाराज.. आमचा हत्ती खूपच पिसाळला आहे.. लोकांना त्याची खूप भीती वाटते आहे.. त्याला गोळी मारून ठार मारावे कि काय ? ”. राजेसाहेबांचे असे बोलणे ऐकताच स्वामींनी त्यांच्या कडे बघितले आणि बोलले “ अरे त्याला मारू नकोस !! ” आणि असे बोलून स्वामी महाराज सेवेकरी मंडळींना सोबत घेवून हत्ती कडे जाण्यासाठी निघाले.. स्वामी निघाले असता.. रस्त्याने काही लोकांनी स्वामींना विनंती केली कि “ महाराज ह्या रस्त्याने आपण जावू नये.. हत्ती सोंडेने मोठे मोठे दगड फेकतो आहे..!! ”. हे ऐकताच जे जे कच्चे स्वामींचे भक्त होते.. जे स्वामींना मनुष्यमात्र मानत होते.. ते मात्र माघारी फिरले.. परंतु चोळप्पा आणि बाबा यादव मात्र स्वामींच्या सोबत होते.. असो. स्वामीं चालत चालत ज्या ठिकाणी हत्तीला बांधले होते.. तेथे येतात.. आजानुबाहू परब्रम्ह स्वामी रायाची स्वारी कमरेवर हात ठेवून हत्तीच्या समोर उभी राहते…. आणि स्वामी त्याच्या कडे बघून शिव्या देत बोलू लागतात..“ काय रे मुर्खा..!! माजलास काय ? पूर्वीचे स्मरण विसरलास वाटत.. !! अरे चढेल तो पडेल.. हा व्यर्थचा पोकळ अभिमान सोडून दे !! ” स्वामी भक्त हो !! स्वामींची हि वाणी होताच.. हत्ती एकदम शांत झाला.. आणि पुढचे पायांचे गुडघे टेकवुन श्री चरणी नतमस्तक झाला.. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी सुरु झाले.. अहो..!! पिसाळलेला हत्ती गाई प्रमाणे एकदम शांत झाला.. कसला हा चमत्कार… अक्कलकोटवासीयांचे डोळे तर आश्चर्याने भरावून गेले… जे जे स्वामींना सोडून पळून गेले.. त्यांना तर खरोखर लाजल्यासारखे झाले.. स्वामी रायाचा हा अद्भुत चमत्कार बघता.. सर्वांनी एका घोषात स्वामींचा जयजयकार केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

स्वामी बोध

आजच्या स्वामी वाणीतून तर स्वामींनी आपल्यातील अहंकारावर आघात केला आहे.. इथे पिसाळलेला हत्ती हे अहंकाराचे प्रतिक आहे.. खरंतर जीवनात आपणास जे जे काही भेटते ते सर्व आपणास स्वामी कृपेनेच भेटले आहे.. मग पद.. पैसा.. प्रतिष्ठा.. वगैरे. आणि हे प्राप्त होताच आपले अज्ञानी मन अहंकाराने मोठे होते.. ते इतके मोठे होते कि वरील स्वामी लीलेत पिसाळलेल्या हत्ती प्रमाणे वागायला सुरुवात करते.. आज स्वामी आपणास हत्तीच्या बहाण्याने आपल्यातील अहंकारी मनालाच सुनावत आहे कि “ हे अहंकारी मना.. तू पूर्वीचे स्मरण विसरू नकोस.. तुला जे जे भेटले आहे त्या मागे ईश्वरीय शक्तीच आहे.. अरे अहंकारी मना तू जास्त अहंकार केलास तर अधोगतीला नक्कीच जाशील.. आणि जे जे तुला भेटले आहे.. त्या सर्व गोष्टी तुझ्या जीवनातून निघून जातील..!! ”
स्वामी भक्त हो !! वरील स्वामी लीलेत हत्ती हा मुका प्राणी आहे.. त्याला तर काही क्षणात स्वामींची भाषा समजली.. स्वामींचे संकेत समजले आणि तो स्वामीरायाच्या चरणी नतमस्तक झाला.. आता आपल्याला आपल्या अहंकारी मनाला सुद्धा स्वामींचा गुलाम बनवायचे आहे.. विविध घटना.. प्रसंगात हे अहंकारी.. नकारात्मक मन.. पद.. प्रतिष्ठा.. पैसा.. ह्याचा दाखला देण्याचा प्रयत्न करेन.. हे अहंकारी मन सतत काहीतरी नाटक करण्याचे प्रयत्न करेल.. पण त्याला दरडावून सांगायचे आहे कि “ हे मना.. अरे लक्षात ठेव.. तुझ्या पेक्षा माझे स्वामी मोठे आहेत.. जे जे काही तुला सुखसुविधा भेटली आहे.. ती मात्र माझ्या स्वामीरायाची कृपा आहे..!! ” हा स्वसंवाद आपल्या अहंकारी मनाला शांत करेन आणि त्याला स्वामींच्या अनन्य भक्तीला लावेल.. आणि एकदा कि त्याला स्वामी भक्तीची गोडी लागली.. मग त्याला पद.. प्रतिष्ठा.. पैसा.. ह्याचा नाही तर स्वामी भक्तीत खरा आनंद भेटेल.. आणि स्वामी कृपेने भेटलेल्या पद.. प्रतिष्ठा.. पैसा.. ह्याचा उपयोग तो स्वामी भक्तीच्या प्रसारासाठी करेल..
चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे गुरुराया.. माझ्या जीवनात जे जे काही भेटले आहे मग ते पैसा.. प्रतिष्ठा.. पद.. वा अन्य काहीही असोत… मला माहित आहे कि हि मात्र तुझीच कृपा आहे.. आई.. अगं तुझ्या शिवाय हे प्राप्त होणे अशक्य आहे.. पण कधी कधी माझ्यातील अहंकारी मन जागृत होते.. त्याला वाटते कि हे सर्व मीच मिळवले आहे.. !! हे स्वामी समर्था… ह्या अहंकारी मनाला चांगला धडा शिकव.. त्याचे अज्ञान दूर कर..त्याला सत्याची समज दे.. आणि तुझ्या अनन्य भक्तीचा गोड स्वाद त्याला दे.. हे परब्रम्हा !! तू तर माझा गुरु आहेस.. मला प्रेरणा दे.. मला मार्गदर्शन दे..!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News