दि. 20 ते 24 सप्टेंबर रोजी माध्यम प्रतिनिधी करतील मूल्यधिष्ठीत पत्रकारितेसाठी विचार मंथन
आध्यात्मिकतेद्वारे शांती आणि सदभावना प्रस्थापनेसाठी माध्यमांची भूमिका या विषयावर ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागाद्वारे शांतीवन माऊंट आबू, राजस्थान येथे 20 ते 24 सप्टेंबर, 2019 राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वात शांती आणि सद्भावनेसाठी कटिबद्ध आध्यात्मिक शिक्षण संस्था ब्रह्माकुमारीज्च्या मीडिया प्रभागातर्फे प्रतीवर्षी माध्यम प्रतिनिधींसाठी राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन केले जाते. देशातील मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक, सायबर मीडियातील सुमारे 2000च्या वर माध्यम प्रतिनिधी यात सहभागी होतात. त्यात वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, एफ.एम. रेडिओ, केबल, दूरचित्रवाणी, खाजगी आणि सरकारी वाहिन्यांचे प्रतिनिधी, मालक, मुद्रक, संपादक, वार्ताहर, व्हिडिओ जर्नालिस्ट, सायबर मीडियाचे प्रतिनिधी, दूरसंचार आणि दळणवळण संवाद माध्यमांचे प्रतिनिधी, मीडिया शिक्षण देणाया संस्थांमधील शिक्षक, विद्यार्थी, जनसंपर्क अधिकारी, सरकारी मीडिया क्षेत्रातील संस्था अशा सर्वसमावेश माध्यमांच्या प्रतिनिधींचे एकत्रीत संमेलन माऊंट आबू सारख्या निसर्गरम्य आणि आध्यात्मिक शक्तिच्या अद्वितीय ठिकाणी या मीडिया संमेलनाचे आयोजन केले जात आहे.
यासाठी नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने केली जाणार आहे. केवळ मीडिया प्रतिनिधीच यात सहभागी होऊ शकतील. त्यासाठी ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रामार्फत ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रतिनिधी आणि सेवाकेंद्र संचालिकांना संपर्क साधावा असे आवाहन ब्रह्माकुमारीज् माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले आहे.