स्वामी लीला
स्वामी भक्त हो !! आजची स्वामी वाणी !!! आपले स्वामी महाराज गुरुतत्व आहे.. ते सतत क्षणो क्षणी आपल्याला मार्गदर्शन देत आहेत.. आपल्याला कृतीद्वारे घडवत आहे.. असेच एकदा स्वामी महाराजांची स्वारी अक्कलकोट मध्ये श्री रामचंद्रांच्या विहिरीच्या कठाडयावर बसलेली होती.. स्वामी महाराज आपल्या स्व स्वरूपाच्या आनंदात तल्लीन झालेले होते.. त्याच वेळेला चिमा नावाची एक स्त्री स्वामींच्या दर्शनासाठी आली..तिच्या हातात तांब्या होता.. तिने स्वामींचे दर्शन घेतले… त्याच वेळेला स्वामीनी तिच्या हातातील तांब्या घेतला आणि बाजूच्या खोल विहिरीत फेकून दिला.. तांब्या फेकून दिल्या नंतर चिमा रडू लागली आणि म्हणू लागली कि “ महाराज आता मी कशाने पाणी पिऊ !!”. तेव्हा स्वामी महाराज मोठ मोठ्याने हसू लागले आणि बोलले “ अगं !! टाक विहिरीत उडी.. आणि घे काढून आपला तांब्या..!! ”. स्वामी भक्त हो !! स्वामींची अशी आज्ञा होताच चिमाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता.. थेट विहिरीत उडी टाकली.. आणि त्याच वेळेला ती तळाला गेली.. सभोवताली मंडळीना लगेचच धावपळ केली आणि चिमाला बाहेर काढण्यासाठी खाली विहिरीत उतरू लागली.. तोच त्याच वेळी स्वामीनी त्यास आज्ञा दिली आणि बोलले..” कोणीही तिला काढू नका !! ”. आता थोडा वेळ झाल्या नंतर सर्व सेवेक-यांना वाटले कि आता चिमा बुडाली आहे.. आणि स्वामींना विनंती करत बोलू लागले कि “स्वामी.. चिमा आता बुडाली आहे.. तिचे प्रेत काढले पाहिजे..!! ” . सेवेक-यांचे असे बोलणे ऐकताच स्वामी मोठ्याने बोलले “ अरे..!! ती बुडते कशाने.. आता वरती येईल !! ” आणि स्वामी भक्त हो !! आश्चर्य झाले चिमा आपला तांब्या घेवून वरती आली आणि तिने हसत हसत स्वामींचे दर्शन घेतले.. सर्वांना आश्चर्य वाटले आणि सर्वांनी एका स्वरात स्वमिनामाचा जयजयकार केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास अनन्य भक्तीच्या खजान्याची ओळख करून देत आहेत.. अनन्य भक्ती म्हणजे अशी स्वामींच्या बद्दल असेलेली बेशर्त प्रेमाची भावना.. अतूट अभेद्य विश्वासाची भावना कि जी कृतीशील आहे.. जेव्हा आपल्या मध्ये हि भक्तीची भावना दृढ होत जाते तेव्हा आपल्यात ईश्वरीय गुणांचा विकास होऊ लागतो.. बघा ना..!! आजच्या स्वामी लीलेत चिमा हिने स्वामींची आज्ञा होताच.. मागे पुढे न पाहता.. लागलीच विहिरीत उडी घेतली… खरतरं तिच्यात हे साहस कशामुळे आले ? उत्तर आहे.. स्वामीं वरील अतूट अभेद्य श्रद्धा !! कारण चिमाला माहित होते कि स्वामी महाराज खूप मोठी शक्ती आहे.. ती माझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही.. स्वामी मला नक्कीच तारणार आहे. स्वामी भक्त हो !! आपल्याला भेटलेली अनन्य भक्ती म्हणजे स्वामीनी आपल्यावर केलेली कृपाच आहे.. अनन्य भक्ती म्हणजे ईश्वरीय गुणांचा खजाना आहे.. स्वामी आपल्याला विविध घटना द्वारे ह्या खजान्यातील एक एक गुणांना प्रगट करत असतात.. उदा. जसे कोणी एक विद्यार्थी आहे.. आणि त्याला आयपीएस व्हायचे आहे आणि समाजाची सेवा करायची आहे.. त्या विद्यार्थ्याच्या नजरेत हि सेवा म्हणजेच स्वामींची अनन्य भक्ती आहे.. त्यानंतर तो स्वामींची भक्ती म्हणून अभ्यास करेल.. आणि हा अभ्यास करतांना त्यात इच्छा शक्ती नावाचा गुण विकसित होईल.. त्याची एकाग्रता वाढेल.. हि स्वामी भक्ती असल्याने तो कॉपी वगैरे असले प्रकार करणार नाही.. त्या ऐवजी प्रामाणिक पणा हा गुण त्यात विकसित होईल… अपयश आले तर तो आशावादी राहून स्वामींची इच्छा म्हणून पुन्हा प्रयत्न करेन.. येथे त्याचा चिकाटी गुण विकसित होईल.. स्वामी भक्त हो !! एकाग्रता.. इच्छा शक्ती.. प्रामाणिकपणा.. चिकाटी हे सर्व अनन्य भक्तीच्या खजान्यातील गुण आहेत.. ह्या गुणांचा फायदा त्याला त्याच्या उर्वरित आयुष्यात सुद्धा होईल.. असो. हे मात्र एक उदाहरण आहे..आजच्या स्वामी लीलेचा संदर्भ घेता.. आपल्याला सुद्धा चिमा सारखा कृतीशील विश्वास स्वामींवर ठेवायचा आहे.. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे कि स्वामी माझ्या सतत पाठीशी आहेत.. आज आपल्या जीवनात काही संकट असतील वा दु:ख असतील तर त्याकडे सकारात्मक दुष्टीने बघायचे आहे.. आपल्याला हृदयातील स्वामींचे मागर्दर्शन घ्यायचे आहे आणि अत्यंत प्रामाणिक कष्ट करायचे आहे. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था..!! अरे तुझ्या अनन्य भक्तीचा खजाना भेटणे म्हणजे कृपा आहे.. हे दत्तात्रेया !! हा तुझा अनन्य भक्तीचा खजाना आता लुटवुन टाक.. माझ्या जीवनात.. तुझ्या प्रेम.. आनंद.. शांती.. साहस.. कृतज्ञता.. समृद्धी आदी गुणांची उधळण कर.. मी तुला माझे सर्वस्व अर्पण केले आहे.. ज्या धेय्यासाठी मला पृथ्वीवर पाठवले ते धेय्य साध्य कर…. समर्था तू माझा पिता आहेस..माता आहेस.. गुरु आहेस..!! मला प्रेरणा दे.. मला मार्गदर्शन कर..!!”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






