स्वामी लीला
हैद्राबाद मध्ये श्री कक्कुभाई राजेंद्र जहागीरदार ह्यांची स्वामी चरणी अनन्य भक्ती होती.. त्यांच्या मुलाचे जावळ काढण्याचा कार्यक्रम त्यांनी स्वामींच्या दरबारातच करण्याचा ठरविला होता.. आणि ठरविल्या प्रमाणे जहागीरदार अक्कलकोटमध्ये येतात.. येथे आल्या नंतर स्वामी महाराज दुधनी नावाच्या गावी असल्याचे समजते.. असे समजल्या नंतर श्री जहागीरदार हे दुधनी गावात येतात.. त्यांनी सोबत भरपूर शिधा सामग्री आणलेली होती…. तीन दिवस तेथे उपस्थित असलेल्या सेवेक-यांना येथेच्छ भोजन देवून.. मुलाचा जावळ चा कार्यक्रम करतात.. मुलाच्या जावळाचा कार्यक्रम पूर्ण होताच श्री जहागीरदार आपल्या गावी निघून जातात.. सर्व कार्यक्रम आटोपल्या नंतर उपस्थित नृसिंह भोसले ह्यांनी स्वामींना अतिशय आदराने विनंती केली कि “ स्वामीनी आता अक्कलकोट येथे चलावे..!! ”. श्री भोसले असे बोलताच स्वामी त्यास बोलले “अरे.. आम्ही आता गौड गावी जाणार आहोत..!! ” त्यावेळेला सोबत असलेली काही सेवेकरी मंडळी बोलली कि “ स्वामी हे गौड गाव कुठे राहिले.. आणि उगीचच का जायचे त्या गावाला ?” त्यावेळेला स्वामीनी सर्वांकडे बघितले आणि बोलले “जगाच्या कल्याणासाठी आम्ही वाटेल तिथे जाऊ..!! ” आणि स्वामी महाराज ताडकन उठेले आणि गौड गावाच्या दिशेने झरझर जाण्यास निघाले.. गौड गावी आल्या नंतर तिथे स्वामीनी एक लीला केली ती अशी कि एक तिथे एक दिवसापूर्वी सर्प दंशाने एक बैल मृत्यमुखी पडलेला होता.. अनंत कोटी ब्रम्हांडाचा स्वामी त्या बैलाच्या जवळ गेला आणि त्या बैलाला हाक मारली आणि तोच चमत्कार घडला.. मृत्युमुखी पडलेला बैल उठून उभा राहिला.. स्वमिरायाची हि लीला बघताच उपस्थित सेवेक-यांच आश्चर्य वाटले.. आणि गौड गावी येण्याचे प्रयोजन समजले.. त्या नंतर सर्वांनी स्वामींचा एका घोषात जयजयकार केला आणि स्वामींसह सर्व मंडळी अक्कलकोट येथे परतली… !!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! आपले स्वामी महाराज खूप मोठी शक्ती आहे.. आपले स्वामी हे अतर्क्य आहेत.. त्यांच्या लीलांचा अर्थ समाजवून घेण्याचा प्रयत्न म्हणजे छोट्याश्या मुंगीने हिमालयाला डोक्यावर उचलून घेण्याचेच धाडस होय.. तरीही स्वामींच्याच कृपेने आपण सर्व हा प्रयत्न करतो आहे.. खरोखर आपण सर्व नशीबवान आहोत कि आज मुखात स्वामी नाम आहे.. आपल्याला स्वामीं लीलांची गोडी आहे.. आजच्या स्वामी लीलेतून “ जगाच्या कल्याणासाठी आम्ही वाटेल तिथे जाऊ” ह्या स्वामींच्या अभय वाणीतुन तर स्वामींचे आपल्या बाळांप्रती असलेले प्रेम स्पष्ट दिसते आहे.. स्वामींनी पृथ्वीवर अवतार का घेतला ह्याचे स्पष्ट प्रयोजन दिसते आहे.. आजच्या लीलेत स्वामींनी एक सर्पदंश झालेल्या मुक्या बैलाला जिवंत केले.. ह्यातून स्वामींचा अवतार हा फक्त मानवच नाही तर निसर्गातील पशु पक्षी प्राणी आदींच्या उद्धारासाठी झालेला आहे हे स्पष्ट होते.. ह्या सह आजच्या स्वामी लीलेचे अजून खोलवर मनन चिंतन केले असता आपणास हे लक्षात येते कि येथे बैल.. हे प्रचंड सोशिकता, सहनशीलता असलेल्या आज्ञाधारी मनाचे प्रतिक आहे असे समजुया..!! आणि मायेच्या प्रभावाने वा सभोवताली असलेल्या वातावरणाने.. मानवाच्या ह्या सद्गुणी मनाला जेव्हा विकाररुपी सर्पाचा दंश होतो.. तेव्हा मानव हा दिशा हीन होऊन जातो.. तो काय करत आहे.. त्याच्या जीवनाचा उद्देश काय ह्याचा त्याला विसर पडतो.. तो असंवेदनशील बनतो.. तेव्हा ह्या असंवेदनशील मृत झालेल्या मनाला पुन्हा जिवंत करण्यासाठी.. त्याला प्रेरणा देण्यासाठी.. जीवनात धेय्य देण्यासाठीच.. स्वामींचा अवतार आहे.. आणि आपण नशीबवान आहोत कि आज आपल्या मुखात स्वामी नाम आहे.. स्वामी भक्त हो !! म्हणून संसार करत असतांना ह्या विकार रुपी सर्पदंशापासून बचाव करायचा असल्यास.. जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास.. आपल्याला मुखात स्वामी नाम घेत.. हृदयात स्वामी मूर्तीचे सदैव स्मरण ठेवुन.. हृदयातून स्वामींचे मार्गदर्शन घ्यायचे आहे आणि आपले प्रामाणिक कर्म करायचे आहे..!! चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे अनंता..!! मला माहित नाही कि.. माझे ह्या पूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे.. पण हे स्वामीराया..!! हा पक्का विश्वास आहे कि प्रत्येक जन्मात तूच माझ्या सोबत होता.. तूच माझा मार्गदर्शक होता.. हे दत्तात्रेया !! मला मोक्ष नको.. कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे.. फक्त एकच विनंती आहे कि हा प्रपंच करत असतांना ह्या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव..!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com






