स्वामी लीला
मोहोळ मध्ये एक शिल्पकार होता.. त्याची स्वामीच्या चरणी नितांत श्रद्धा होती.. त्याचा एक नित्य नेम होता.. तो दररोज स्वामींचे दर्शन घेतल्या शिवाय भोजन करत नसत.. हा त्याचा नेम सतत चार महिने सुरु होता.. एके दिवशी तो नित्य नियमाने स्वामींच्या दर्शनासाठी आला.. परंतु येतांना त्याच्या मनात एक विचार आला कि “ माझे कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड म्हाळसाकांत कैलासपती शिव आहे.. त्याचे दर्शन व्हावे हीच इच्छा आहे..!! ” आणि असा विचार करत करत तो स्वामींच्या दर्शना साठी आला.. स्वामींना साष्टंग दंडवत घालून तो हात जोडून उभा राहीला.. स्वामी भक्त हो !! आपले स्वामी महाराज परब्रम्ह आहेत.. आपल्या भक्ताच्या मनातील त्यांना समजत असते.. आणि
त्याच प्रमाणे घडेले.. शिल्पकाराच्या मनातील प्रार्थना स्वामींना समजली… स्वामींनी त्याच्याकडे करुणेच्या नजरेने बघितले आणि बोलले.. “ अरे… तुझ्या मनात आहे.. ते आता प्रत्यक्ष पहा !! ”. आणि त्याच वेळेला चमत्कार घडला स्वामींच्या ठिकाणी त्या शिल्पकाराला जटाधारी भस्मांकित शिव स्वरूप दिसु लागले.. शिल्पकाराचे देहभान हरपले.. त्यास काही काळासाठी समाधीच लागली.. शुद्धीवर आल्या नंतर त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला..आणि स्तुती करत बोलु लागला “हे शिव भगवान माझ्या बेचाळीस कुळाचा आज उद्धार झाला आहे..! हे गंगाधरा..हे पिनाकपाणी.. हे शिव मल्हारी हे सद्गुरू स्वामी आता माझ्या अनाथाचा उद्धार करा..!! ”. शिल्पकाराची व्याकुळतेची प्रार्थना
ऐकताच स्वामीनी त्याला आशीर्वाद दिला आणि बोलले “ जा.. आमचे भजन पूजन कर.. सर्वांभूती भगवत भाव ठेव म्हणजे तुझा उद्धार होईल..!! ” स्वामीनी असा आशीर्वाद दिल्या नंतर त्या शिल्पकाराने स्वामी आज्ञेचे पालन केले आणि तो इहपरसुखास पावला..!!बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट
निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! स्वामी हे गुरुतत्व आहे.. ते सतत आपल्याला मार्गदर्शन करत असते.. आजची स्वामी वाणी तर आपणास अनन्य भक्तीचा भाव जागृत करण्यासाठी स्वामीनी दिलेली प्रेरणा आहे.. मोहोळचा शिल्पकार ह्यांस त्याच्या कुलदैवताच्या रुपात दर्शन देवून स्वामींनी त्याची इच्छा पूर्ण केली.. आणि सर्वांच्या इच्छापूर्तीचा कल्पवृक्ष तुझ्या जवळच आहे हि समज त्यास प्राप्त झाली.. त्या नंतर त्याच्या हृदयात स्वामींच्या बद्दलचा अनन्य भाव जागृत झाला.. आणि त्याने उद्धाराची प्रार्थना केली तेव्हा स्वामींनी त्यास “ सर्वांभूती भगवत भाव ठेव..!! ” असा उपदेश करून त्यास हेच सांगितले कि “ जसे कुलदैवताच्या रुपात तुला मी दर्शन दिले.. अगदी तसेच चराचरात सुद्धा मीच आहे.. प्रत्येकात मीच आहे.. प्रत्येकाच्या हृदयात मीच आहे.. !! ” चला तर मग स्वामी भक्त हो !! आपल्याला सुद्धा स्वामींची आज
अनन्य भक्तीची प्रेरणा घ्यायची आहे… सर्वांभूती स्वामींना बघण्याचे प्रशिक्षण आपल्या मनाला द्यायचे आहे.. आपले काही संकट असेल आणि जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो तर हे शुद्ध चैतन्य स्वरूप स्वामीच आपले विविध लोकांच्या द्वारे संकट दूर करते आहे हि अनन्य भक्तीची दृष्टी ठेवायची आहे.. वा आपल्या जीवनात जर काही चांगल्या घटना घडत असेल तर तोच विविध शरीरांच्या द्वारे घडवून आणत आहे.. स्वामी भक्त हो !! पण हे सर्व करतांना आपली सामान्य बुद्धी ( common sense ) जागृत ठेवायची आहे.. दैववादी नाही
बनायचे.. स्वामींचे संकेत ओळखण्याचे प्रशिक्षण आपल्या मनाला द्यायचे आहे.. त्यासाठी सकारात्मक राहून आपले प्रयत्न.. आपले कष्ट करत रहायचे आहे.. आणि महत्वाचे म्हणजे अहंकारी.. लोभी.. स्वार्थी.. वृत्तीच्या लोकांपासून सावध रहायचे आहे.. चला तर मग आज
आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे स्वामीराया !! अरे मी तुझा लाडका बाळ आहे.. जेव्हा मी काही प्रार्थना करतो तेव्हा तु सर्व सृष्टीला माझी प्रार्थना पूर्ण करण्यासाठी कामाला लावतोस.. हे गुरुतत्वा !! माझी इतकीच प्रार्थना आहे कि सर्वांच्या ठाई तूच आहेस हे बघण्याची अनन्य भक्तीची दृष्टी दे.. आणि माझ्या साठी ज्या ज्या आज्ञा आहेत.. ते समजण्याचा विवेक मला दे.. हे श्री स्वामी समर्था !! तूच माझा पिता.. तूच माता.. तूच माझा गुरु आहेस.. मला प्रेरणा दे.. मला मार्गदर्शन कर..!! ”बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






