आपले स्वामी बोलतात.. “ तुझे सहस्त्र भोजन झाले बरे.. जा आता.. !! ”

Aug 19, 2020

स्वामी लीला

स्वामी भक्त हो !! आजची स्वामी वाणी !!! आपले स्वामी महाराज कल्पवृक्ष आहे.. स्वामी भक्तांच्या मनातील इच्छा जाणून त्याची पूर्तता करत असतात.. असेच एका ब्राम्हणास शेयर मार्केटमध्ये भरपूर नफा होतो.. त्याच्याकडे भरपूर पैसा येतो.. भरपूर पैसा असल्याने सर्व भौतिक सुख सुविधांची त्याला उणीव भासत नव्हती.. परंतु त्यास संतती नसल्याने मन नेहमी दु:खी असत.. एके दिवशी उभयतांनी असे ठरविले कि आपण गाणगापुर येथे जावून दत्त महाराजांना साकडे घालूया आणि त्या प्रमाणे दोघे ब्राम्हण पतीपत्नी गाणगापूर येथे येतात.. दत्त
महाराजांना अतिशय विनम्र भावनेने शरण जातात आणि नवस बोलतात कि “ आम्हाला पुत्र लाभ झाल्यास सहस्त्र भोजन घालु !! ”. असा नवस बोलुन दोघे हि घरी येतात.. स्वामी भक्त हो !! अनन्य भावनेने ईश्वराला आळवल्यास.. त्या परम पित्याला ऐकावेच लागते आणि तसेच घडले.. पुढे एक वर्षाच्या आत उभयतांस एक मुलगा झाला.. सर्वांना आनंद झाला.. परंतु जीवनाच्या गाडीत चढ उतार असतातच.. आणि नेमके त्याच काळात शेयर मार्केट मध्ये ह्या ब्राम्हणास खुप तोटा झाला.. त्याचे दिवाळेच निघाले म्हणा.. त्याच्याकडे होते नव्हते सर्व गेले..!! आणि ह्या काळजीने त्याचा मृत्यु झाला.. ब्राम्हण स्त्रीच्या मनात नवसाची आठवण होती.. परंतु आता “ यजमान नाही आणि पैसा हि
नाही.. आपल्या हातून नवस कसा फिटणार..? ” हा विचार तिच्या मनात सतत घोळत होता.. त्याच वेळेत एका कोण्या एका हितचिंतक सात्विक महिलेने तिला सांगितले कि “ दत्त महाराज करुणेचा सागर आहेत.. तु तुझ्या मुलाला घेऊन गाणगापुरास जा.. तेथे सेवा कर.. दत्त महाराज तुझा नवस पूर्ण करवून घेतील..!! ”. ब्राम्हण स्त्रीस हा विचार पटला आणि ती आपल्या मुलाला सोबत घेवून गाणगापुरास आली.. आणि त्या ठिकाणी दत्त महाराजांची अनन्य भावनेने सेवा सुरु केली.. सेवा सुरु असतांना तिला एके रात्री स्वप्नात दृष्टांत झाला.. “ तु अक्कलकोट येथे जा.. श्री स्वामी समर्थ महाराजांना जेवु घाल.. म्हणजे तुझा नवस फिटेल..!! ”. स्वप्नातील दृष्टांत बघून ब्राम्हण स्त्रीस आनंद झाला.. आणि दुसरे दिवशी अक्कलकोट येथे आली.. स्वामींच्या दरबारात आली.. स्वामी महाराजांची आजानुबाहू तेज:पुंज मूर्ती बघून
ती भारावूनच गेली आणि दूरच हात जोडून उभी राहिली.. स्वामी भक्त हो !! आपले स्वामी भक्तवत्सल आहेत.. त्यांना भक्तांच्या मनातील समजत असते.. ती ब्राम्हण स्त्री हात जोडून उभी राहिली होती.. स्वामींना त्या ब्राम्हण स्त्रीच्या मनातील समजले होते.. स्वामींनी ब्राम्हण स्त्री कडे बघितले.. तीला जवळ बोलाविले आणि बोलले.. “ अगं.. आम्हाला जेवु घाल..!! ”. स्वामींनी असे बोलताच ब्राम्हण स्त्री आनंद झाला.. आणि तिने अतिशय भक्त भावनेने स्वामींना नैवेद्याचे ताट करवून आणले.. आणि आपल्या स्वामींनी सुद्धा ते अतिशय आनंदाने  खाल्ले.. !! स्वामींनी पोटभर जेवण केले.. आणि ढेकर देत.. पोटावर हात फिरवत.. बोलले.. ” तुझे सहस्त्र भोजन झाले बरे.. जा आता.. !! ”. स्वामीनी असे बोलताच बाईला खूप आनंद झाला.. तिने घडलेली सर्व हकीकत उपस्थित सेवेक-याना सांगितले.. स्वामींची हि लीला बघून सर्वाना आश्चर्य वाटले आणि सर्वांनी एका घोषात जयजयकर केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

स्वामी बोध

स्वामी भक्त हो !! आजच्या स्वामी लीलेत ब्राम्हण स्त्रीची अनन्य भक्ती खरोखर खूप प्रेरणा देत आहे.. तिची सहस्त्र भोजनाची परिस्थिती नसतांना हि तिच्या मनाने कोणतेच नकारात्मक कारण दिले नाही.. ती आपल्या शब्दाला जागलेली होती.. आपली प्रामाणिक सेवा.. प्रामाणिक कर्म ती करत होती… तीचा अनन्य भाव बघुन स्वत: स्वामीनीच तिला दृष्टांत देवून अक्कलकोट येथे बोलावून घेतले आणि तिच्या संकल्पाची
पूर्तता केली..स्वामी भक्त हो !! आजच्या स्वामी लीलेतून आज आपणास अनेक बोध होत आहेत.. पैकी जेव्हा आपण एखादा संकल्प करतो.. परंतु आपली परिस्थिती नसल्यामुळे आपले मन नकारात्मक बोलत असते.. ते सतत कारण सांगत असते कि “ हे मी केले असते पण आज माझी परिस्थिती अशी आहे.. वगैरे ” आणि ह्या नकारात्मकते मुळे आपण आपल्या धेय्या पासून दूर जात असतो.. आपल्या संकल्पापासून दूर जात असतो.. परंतु आजच्या स्वामी लीलेचा बोध घेता.. आपल्याला त्या ब्राम्हण स्त्री मध्ये असलेली अनन्य भावना धारण करायची आहे.. जे जे आपले संकल्प आहे.. त्याची पूर्तता होणारच हा विश्वास ठेवायचा आहे.. कारण ब्रम्हांडाची सर्वोच्च शक्ती आपल्या पाठीशी आहे..
संकल्पाची पूर्तता स्वतः स्वामीच करत आहे हि समज ठेवायची आहे.. आपली भौतिक परिस्थिती कशीही असु दे.. आपल्या हृदयात अनन्य भाव ठेवून आपले कर्म.. आपले प्रामाणिक मेहनत करत रहायचे आहे.. स्वामी आपले गुरु आहेत आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतात.. योग्य अनुकूल संधी आपल्या जीवनात देतात आणि आपण केलेला संकल्प पूर्ण करवून घेतातच.. जेव्हा संकल्प पुर्ती होते.. तेव्हा हृदयातून स्वामीच आनंदाचा.. तृप्तीचा ढेकर देत असतात.. चला तर मग आज स्वामींना प्रार्थना करू या “ हे गुरुराया !! माझ्या जीवनातील भौतिक परिस्थिती
कशीही असु दे.. तु माझ्या सतत पाठीशी राहतोस.. मला प्रेरणा देतोस.. मला मार्गदर्शन करतोस.. माझ्या कडून संकल्प करवून घेतोस.. त्या संकल्पाला बळ देतोस.. प्रामाणिक कर्म करवुन घेतोस आणि संकल्पाची पूर्तता करवुन घेतोस.. हे स्वामीराया !! तुझे ऋण फेडण्याची माझी पात्रता नाही.. तरीही तुला कोटी कोटी धन्यवाद..!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News