नेटफ्लिक्सने लहान मुले व कुटुंबासाठी लाँच केला मायटी लिट्ल भीमचा नवीन सीझन

Sep 26, 2020

नाशिक :  नेटफ्लिक्सने आज आपली लहान मुलांसाठीची लोकप्रिय मालिका मायटी लिट्ल भीमचा नवीन व तिसरा सीझन सुरू केला. मायटी लिट्ल भीमची सर्वांना आवडणारी व विनोदी साहसे लहान मुले व त्यांच्या आई–बाबांच्या परिचयाची झाली आहेत. भारतातील अॅनिमेशन उद्योगाच्या अविश्वसनीय क्षमतेचे दर्शन घडवणारी ही मालिका प्री–स्कूल विभागातील सर्वाधिक बघितली जाणारी मालिका आहे, तर नेटफ्लिक्सवरील जगभरातील दुस-या क्रमांकाची सर्वाधिक बघितली जाणारी लहान मुलांची मालिका आहे. २०१९ मध्ये सुरुवात झाल्यापासून मायटी लिट्ल भीम २.७ कोटींहून अधिक घरांत बघितली जाते. यांमध्ये लॅटिन अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड आदी देशांचा समावेश आहे. या अफलातून मालिकेमध्ये वैश्विक स्तरावर महान समजल्या जाणा-या कथा दाखवल्या जातात. या कथांचे मूळ कुठेही असू शकते आणि त्या कुठल्याही भौगोलिक प्रदेशातील मुलांना आवडतात. या कथांमध्ये संस्कृती, देश व भाषेच्या मर्यादा ओलांडण्याची क्षमता आहे. मायटी लिट्ल भीम ही ख-या अर्थाने अस्सल भारतीय कथा आहे. ती आपल्या संस्कृतीचे, परंपरांचे व उत्सवांचे साजरीकरण करते आणि जगभरातील प्रेक्षकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करते. प्रत्येक कुटुंब वेगळे आहे हे नेटफ्लिक्सला मान्य आहे. म्हणूनच नेटफ्लिक्स जगभरातील लहान मुलांचे व कौटुंबिक चित्रपट आणि टीव्ही मालिका यांमध्ये गुंतवणूक करत आहे. नेटफ्लिक्सच्या भारतातील निर्मिती प्रकल्पांच्या कथांमध्ये उत्तम वैविध्य आहे. तुमची अभिरूची, मूड किंवा भाषा कोणतीही असो, तुम्हाला एकट्याने किंवा कुटुंबासह बघण्यासारखे काहीतरी देण्याचा नेटफ्लिक्सचा प्रयत्न असतो. आवडनिवड हा भाग तर आहेच, त्याशिवाय कुटुंबांना काय बघावे याबाबत माहितीपूर्ण निर्णय करता यावेत यासाठी त्यांच्या हातात नियंत्रणे देण्याची नेटफ्लिक्सची इच्छा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सने सेवांवर सुधारित नियंत्रणे दिली. आईबाबा, घरातील मोठे आणि पालक आता पुढील गोष्टी करू शकतात: 

  • अकाउंट सेटिंग्जमधील “प्रोफाइल अँड पेरेंटल कंट्रोल्स” हब वापरून एकमेकांची प्रोफाइल सेटिंग्ज सहज बघू शकतात;
  • एखादी मालिका किंवा चित्रपट शीर्षक घालून काढून टाकू शकतात. हा फिल्टर वापरला की, ब्लॉक्ड शीर्षक (किंवा शीर्षके) त्या प्रोफाइलमध्ये कोठेही दिसणार नाहीत; 
  • लहान मुलांना प्रोफाइल्स वापरता येऊ नयेत म्हणून पिन संरक्षित इंडिव्हिज्युअल प्रोफाइल्स;
  • मुलांच्या वयोगटासाठी योग्य न वाटणारी शीर्षके फिल्टर करून मुलांच्या नेटफ्लिक्स अनुभवाला आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतात;
  • मुले त्यांच्यासाठी तयार केलेल्या प्रोफाइलमध्ये काय बघत आहेत हे बघू शकतात; आणि
  • किड्स प्रोफाइल्ससाठी भागांच्या ऑटो प्लेचा पर्याय ऑफ करू शकतात.   

लॅपटॉप किंवा मोबाइल ब्राउजरवरील अकाउंट सेटिंग्जमध्ये जाऊन नेटफ्लिक्स प्रोफाइलवर ही नियंत्रणे समाविष्ट केली जाऊ शकतात. 

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News