स्वामी लीला
शके १७९४ म्हणजे इ.स. १८७२ मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वरी सिहंस्थ कुंभमेळा होता.. ह्या कुंभमेळ्यासाठी श्री वामबुवा बडोदेकर, विद्वान ब्रम्हचारीबुवा आदी सेवेकरी गेले होते.. यात्रा करत असतांना तेथून ते जवळच असलेल्या श्री क्षेत्र वणी येथे सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गेले.. सप्तशृंगी मातेची पूजा अर्चा विधी केल्या नंतर त्यांनी तेथील पुजारी भोपे ह्यांच्याकडे देवीच्या मुखातील तांबुल प्रसाद मागितला.. तेव्हा भोपे पुजारी हे श्री वामन बुवा बडोदेकर ह्यांना अतिशय उपहासात्मक पणे थट्टेने बोलू लागले कि “अक्कलकोटचे स्वामी महाराज परब्रम्ह मूर्ती असतील आणि स्वामींच्या चरणी तुमचे खरे प्रेम असेल.. तुमची खरी भक्ती असेल तर तुम्हास जगदंबा स्वमुखातील तांबुल देईल !! ”. पुजाऱ्याचे असे बोलणे ऐकताच वामन बुवा आणि सोबत असलेले विद्वान ब्रम्हचारी बुवा ह्यांनी देवीची प्रार्थना केली आणि त्याच वेळेला देवीच्या मुखातील तांबुल त्यांच्या अंगावर पडला.. हा स्वामींचा चमत्कार बघून पुजारी भोपे हे सुद्धा विस्मित झाले..त्यानंतर दोघेही सटाणा येथे श्री देवमामलेदार ह्यांच्या दर्शना साठी गेले.. त्यांचे दर्शन झाल्या नंतर ते पुन्हा नाशिक क्षेत्री आले.. येथून घागरीत गंगा गोदावरीचे पवित्र जल घेवून पंढरपुरास आले.. पांडुरंगाला ह्या पवित्र तीर्थाने अभिषेक केला.. अभिषेक करत असतांना तेथे चमत्कार घडला.. पांडुरंगाच्या मूर्तीच्या ठिकाणी त्यांस स्वामींची मूर्ती दिसू लागली.. तेथे असलेले एकनाथपंत बडवे आणि दादाजी मनोहर ह्या दोघांस खूप आश्चर्य वाटले..
त्यानंतर दोघेही पुन्हा अक्कलकोट मध्ये आले.. त्यादिवशी स्वामी महाराजांची स्वारी पेठेतील मोदी ह्यांच्या घरी होती.. श्री वामनबुवा आणि विद्वान ब्रम्हचारी बुवा दोघेही स्वामींच्या दर्शनासाठी येतात.. श्रीफळ वगैरे स्वामींच्या चरणी वाहतात आणि हात जोडून उभे राहतात.. तोच स्वामी त्या दोघांकडे बघतात आणि बोलतात.. “अरे सप्तशृंगी येथे जावून काय शंख केलात..? परंतु विडा आम्हासच द्यावा लागला आणि पंढरीनाथावरची गंगा आम्हासच घ्यावी लागली..!! ”. स्वामींची हि अनुभवसिद्ध वाणी ऐकताच दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.. त्यानंतर स्वामी पुन्हा रागाने बोलले “ मामलेदाराकडे जावून काय मिळवले ? ”. हे ऐकताच दोघांनी स्वामींची क्षमा मागितली..
बोला !! अनंत कोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
आजच्या स्वामी वाणीतून तर स्वामींनी पुन्हा एकदा आपणास त्यांच्या परमसत्याच्या अस्तित्वाचा बोध दिला आहे.. स्वामी हेच एकमेव निर्गुण निराकार परमचैतन्य आहे आणि ह्या निराकारानेच हे सर्व आकार धारण केले आहेत ह्या परमसत्याची आठवण स्वामी पुन्हा आपणास करवून देत आहेत.. मग ते माता सप्तशृंगी असो.. वा कमरेवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग असो.. हे सर्व स्वामींचेच रूप आहेत.. स्वामी भक्त हो !! आजच्या लीलेतून आज आपणासाठी आजच्या पिढीसाठी स्वामीं आपणास खूप छान बोध देत आहेत.. आज पुन्हा स्वामी आपणास अनन्य भक्ती ची प्रेरणा देत आहेत.. स्वामी हेच एकमेव चैतन्य आहे.. हे परमचैतन्य चराचरात आहे आणि जेथे जातो तेथे तू माझा सांगाती !! ह्या वचनाची सतत अनुभूती देत आहे.. हि समज दृढ करायची आहे.. ह्या सह सप्तश्रुंग येथील तांबुल प्रसाद लीलेतून स्वामी आपणास सांगत आहेत कि, स्वामी महाराज हे भक्त वत्सल आहेत.. भक्ताभिमानी आहेत.. त्यांना त्यांच्या भक्तांचा अभिमान आहे.. आणि कोणा एका अहंकारासमोर.. अज्ञाना समोर.. संकटा समोर ते आपल्या भक्ताची मान झुकवू देत नाही.. आजच्या लीलेत पुजारी भोपे हे अहंकाराचे.. अज्ञानाचे प्रतिक आहे.. आणि तांबुल प्रसाद लीला करून स्वामींनी भोपे पुजारी ह्यांच्या उपहासात्मक संभाषनास उत्तर देत… आपल्या भक्ताची मान झुकवू दिली नाही..! म्हणून स्वामी भक्त हो !! आपल्या जीवनात कितीही दु:ख असू द्या… वा संकट असू द्या.. स्वामी महाराज आपल्या सतत सोबत आहेत ह्या सत्याचे सतत स्मरण ठेवा.. मी ह्या परमपित्याचे बाळ आहे आणि तो माझ्या सतत सोबत आहे.. हा दृढ विश्वास मनाच्या कानाकोपऱ्यात भरा… आणि अतिशय आनंदी राहून आपले प्रामाणिक कर्म करा.. बघा किती छान अनुभव येतील.. जीवनात कितीही दु:ख वा संकट येवू द्या.. ह्यातून स्वामी आपणास नक्कीच सावरतात.. त्यांच्या बाळाची मान नेहमी उंचच ठेवतात.. हा परमपिता सतत आपल्या भक्तांच्या सतत पाठीशी आहेत.. सोबत आहेत.. हा विश्वास वाढत जाईल.. ह्या आश्चर्याने आपण स्वामींच्या आपल्या वैयक्तीच जीवनात लीला बघाल… चला आज स्वामींना प्रार्थना करू या “ हे परमपित्या.. !! तु भक्त वेडा आहेस.. आम्हाला जशी तुझी गोडी आहे अगदी तसेच तुला सुद्धा तुझ्या बाळांची गोडी आहे.. म्हणून तर जेव्हा जेव्हा तुझ्या चरणांचा विसर पडतो.. तेव्हा तेव्हा दु:ख वा संकटांच्या बहाण्याने तुझे स्मरण करवून घेतोस.. पण हे समर्था !! हे सर्व करत असतांना तु तुझ्या बाळाची लाज राखतो..!! कितीही संकट असू दे.. वा दु:ख असू दे.. तुझ्या बाळाला ह्या संकटा समोर कधीच झुकवू देत नाही.. तुझ्या बाळाची मान सतत उंच ठेवतोस.. हे स्वामी आई !! ह्या मायेच्या जगात तु मला तळहातावरील फोडा प्रमाणे जपतो आहेस.. तुला कोटी कोटी धन्यवाद !! तुला कोटी कोटी धन्यवाद !!! ”
बोला !! अनंत कोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com






