झी युवाचा ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ म्हणतोय प्रेम करा पण मराठीत

Jul 4, 2019

‘झी युवा’ या वाहिनीने आजपर्यंत अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांना दिल्या आहेत . या वाहिनीवर दाखवल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या उत्तम कथांनी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे . या दर्जेदार मालिकांमध्ये आणखी एका नवीन आणि फ्रेश कथेची भर पडणार आहे. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ‘ हे या नव्या मालिकेचे नाव असून ही मालिका दिनांक १५ जुलै पासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता झी युवावर पाहायला मिळेल . ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ , महाराष्ट्रातल्या सर्व तरुणतरुणांना एक हटके मेसेज घेऊन येत आहे तो म्हणजे प्रेम करा पण मराठीत !

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही लव्ह स्टोरी आहे देशी पण थोडी मेस्सी … मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि त्यावर वाढता पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रेम करताना, प्रेमालाही भाषा असते आणि ती मराठी असते असा खोडकर मेसेज देणारी एक खुशखुशीत नवी प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही अशी अस्सल मराठमोळी प्रेमकहाणी या मालिकेतील दोन कुटुंबांमध्ये काय आणि कशाप्रकारे घोळ करणार आहे हे पाहताना प्रेक्षकांची हसून हसून पुरती तारांबळ उडणार आहे.

एखादी गोष्ट सुफळ संपूर्ण होणे म्हणजे उत्तम प्रकारे मार्गी लागणे असा अर्थ अगदी पारंपरिक शब्दांमध्ये येतो. पण या मालिकेच्या शीर्षकामध्ये ‘ऑल्मोस्ट’ हा खास युवा पिढीच्या रोजच्या वापरातील शब्द सुद्धा आहे . त्यामुळे आता ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेतील ही (वि)देशी प्रेमकहाणी नक्की काय धुमाकूळ घालणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल हे नक्की !!

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News