आपले स्वामी बोलतात.. “ अरे..! दुसऱ्याचे अनिष्ट चिंतन करतोस..? तु आणि तुझा मुलगा मेला तरी दोष काय..? ”

Jan 27, 2021

स्वामी लीला

पंढरपुरात खासगीवाल्यांच्या वाड्यात श्री दत्त महाराजांच्या पादुका आहेत.. एक पंढरीनाथ नावाचा ऋग्वेदी ब्राम्हण त्यांची पूजा अर्चा करत.. त्यांचा दोन मुले ,एक कन्या आणि एक धाकटा भाऊ असा परिवार होता… पुढे काही दिवसांनी तो आणि त्याचा धाकटा भाऊ वेगळे झाले.. दोघांनीही वेगळा संसार थाटला.. परंतु दत्त महाराजांच्या पादुकां बद्दलचा वाद त्यांच्यात चांगलाच पेटला.. तेव्हा धाकट्या भावाने मात्र पादुकांची पूजा स्वत:कडे घेतली.. ह्यामुळे पंढरीनाथाच्या उत्पन्नाचा मार्गच बंद झाला.. त्याला अफू-गांजाचे व्यसन होते.. शेवटी तो गाणगापुरास आला.. येथे भिक्षान्न घेवून त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करू लागला.. त्या नंतर काही दिवसांनी तो अक्कलकोट येथे आला.. तेथे नित्य नेमाने स्वामींची सेवा करू लागला आणि भिक्षान्न खाऊन उपजीविका करू लागला… असे जवळ जवळ 2 ते 3 वर्ष झाले.. असेच एके दिवशी पंढरीनाथ स्वामींच्या दर्शनासाठी गेला.. तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले.. “ अरे.. तुला काय पाहिजे आहे..? ”. तेव्हा तो म्हणाला “ महाराज पंढरपुरच्या दत्त पादुकांची पूजा माझ्याकडे आली तर बरे होईल, पण माझा धाकटा बंधू आणि त्याचा मुलगा मेल्याशिवाय हे कार्य होणार नाही !! ” तेव्हा स्वामी हसायला लागले आणि बोलले “ अरे.. दुसऱ्याचे अनिष्ट चिंतन करतोस..? तु आणि तुझा मुलगा मेला तरी दोष काय..?”. त्यानंतर काही दिवसांनी पंढरीनाथाचा धाकटा बंधू आणि त्याचा मुलगा मरण पावतो.. पंढरीनाथ आनंदाने घरी येवून दत्तपादुकांची पूजा करू लागतो.. परंतु त्याने त्याच्या भावाचे अनिष्ट व्हावे असे चिंतन केल्याने पंढरीनाथ , त्याची पत्नी आणि जेष्ठ मुलगा यांच्यावर काळाने झडप घातली.. तिघेही मरण पावतात.. आता ह्या नंतर पंढरीनाथाचा छोटा मुलगा गोविंद आणि त्याची पत्नी पादुकांची पूजा करू लागतात.. आणि विशेष म्हणजे ह्या दोघांची स्वामींच्या चरणावर खूप निष्ठा होती.. ते नेहमी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येत..!!

बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

 

स्वामी बोध

आजच्या स्वामी लीलेचा बोध अगदी स्पष्ट आहे.. आपण इतरांसाठी जे चिंतन करतो.. तेच आपल्या जीवनात हजारो पटीने वाढवून परत येते.. म्हणून स्वामी सांगतात कि कधीच कोणाचे अनिष्ट चिंतन करू नये.. खरतर हा स्वामींचा अलिखित कायदा आहे.. आपण जसे कर्म करतो त्याचे फळ हजारो पटीने वाढवून पुन्हा आपल्याला भेटते.. पण बहुतेक लोक बाह्य कृतीलाच कर्म समजतात.. परंतु पहिले कर्म हे विचाराद्वारे होते.. आणि त्या विचारामागील आपली भावना आपणास त्या कर्माचे फळ काय येणार हे निश्चित करत असते…. जसे चोर सुद्धा चाकू मारतो आणि डॉक्टर सुद्धा ऑपरेशन करतांना चाकूचा वापर करतो.. एकाची भावना असते हिंसा करणे आणि दुसऱ्याची भावना आहे समोरील व्यक्तीचे आयुष्य वाढावे.. दोघांना ह्याचे फळ वेगळे येते..असो. आजच्या लीलेत पंढरीनाथ ह्याची भावना हि नकारात्मक होती.. आणि त्यांस त्याचे फळ आले सुद्धा.. इतकेच नव्हे तर त्याच्या धाकट्या भावाच्या बाबतीत जे काही घडले.. ह्यावरून तो सुद्धा किती नकारात्मक चिंतन करत होता.. ह्याचा अंदाज येतो.. असो.

थोडक्यात आजच्या लीलेतून स्वामी आज आपणास आजच्या पिढीसाठी हाच संदेश देत आहेत कि “ जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येवू द्या.. संकट येवू द्या.. कधीच खचून जावू नका..कधीच कोणाचे वाईट चिंतन करू नका.. सतत सकारात्मक विचार करा.. सतत सकारात्मक भाव ठेवा.. सर्वांचे कल्याण व्हावे हि प्रार्थना सतत करा.. बघा !! सर्व छान होईल..!! ” चला तर मग स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! हे पृथ्वीवरील जीवन म्हणजे तुझे चित्र आहे.. ह्या जीवनाचा चित्रकार तूच आहेस.. आमच्या शरीराचा कुंचला कर.. आणि त्यात अनन्य भक्तीचा रंग भर आणि हे संपूर्ण जीवन रंगुवून टाक.. ह्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, जे तुझे खरे स्वरूप आहे त्याचे ज्ञान दे.. अनुभव दे.. त्याच्यातील भिती.. अहंकार ह्याचा समूळ नाश कर.. त्याला तुझ्या अनन्य भक्तीचे वेड लाव.. !! ”

बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News