स्वामी लीला
आपले स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये सगुण रुपात असतांना असंख्य लीला करत.. एखादा हताश झालेला असेल.. तो पूर्णपणे खचलेला असेल त्याला स्वामी महाराज मार्गदर्शन करत.. त्याला प्रेरणा देत.. आणि जीवन जगण्याची एक नवी उमेद देत… असेच एकदा स्वामी महाराजांची स्वारी वडाच्या झाडा खाली बसलेली होती.. मकर संक्रांतीचा दिवस होता.. असंख्य स्वामी भक्त स्वामींना तीळूगुळ अर्पण करण्यासाठी येत होते.. त्याच वेळेला एक महिला तणावात दिसत होती.. ती तिळगुळ घेऊन स्वामींच्या दरबारात येते.. स्वामींना मुजरा करते.. आणि स्वामींना तिळगुळ देत बोलते.. “ स्वामी महाराज.. हा माझ्या हातचा शेवटचा तिळगुळ घेऊन मला अहेवपणी आपल्या चरणांजवळ घ्या..!! ”. त्या महिलेने असे बोलताच स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि बोलले “ अगं.. बोडकी झालीस तर पोळ्या भाजण्यास उपयोगी पडशील..!! ”. स्वामींचे असे बोलणे ऐकताच ती मनातल्या मनात विरघळली आणि पुन्हा आपल्या घरी गेली.. स्वामी भक्त हो..!! आणि काही दिवसांनीच तिच्या नवऱ्याचा मृत्यू होतो..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
आजच्या स्वामी वाणी मध्ये खूप मोठा संदेश दडलेला आहेत.. ज्या वेळेला महिला स्वामींना अशी विनंती करते कि “ मला अहेवपणी आपल्या चरणाजवळ घ्या म्हणजेच नवरा जिवंत असतांना मला मृत्यू द्या..”. ह्या वाक्यावरून ती महिला जीवनाला कंटाळलेली होती असे समजते.. आणि तिच्या मनात सतत आत्महत्या करण्याचे विचार येत होते.. हे सुद्धा स्पष्ट दिसते.. परंतु स्वामी तिला आज्ञा देत नाही.. “ बोडकी झालीस तर पोळ्या भाजण्यास उपयोगी पडशील..!! ” ह्या स्वामी वाणीत खूप खोल मार्गदर्शन केलेले आहे.. जसे “ बोडकी झालीस तर” ह्या स्वामींच्या वाणीतून स्वामींनी तिला स्पष्ट सांगितले कि तुझ्या नवऱ्याचा मृत्यू तुझ्या आगोदर होणार.. म्हणजेच स्वामी हेच सांगण्याचा प्रयत्न केला कि प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास वेगळा आहे.. कोण कधी येणार कधी जाणार हे नियोजित आहे.. परंतु दु:ख वा संकटचे बहाणा सांगून आपल्याला पळवाट नाही शोधायची.. स्वत:च्या शरीराची हत्या नाही करायची.. आत्महत्या नाही करायची… ह्या सह स्वामी पुढे असेही बोलतात कि, “ अगं.. तु काही नाही तर कमीत कमी पोळ्या भाजण्यास उपयोगी पडशील..!! ” ह्यातून स्वामी हेच सांगत आहेत कि , स्वामीनी आपल्याला एका विशिष्ट उद्देशाने मानवाचा जन्म देवून पृथ्वीवर पाठवले.. प्रत्येकाच्या जन्माचा एक विशिष्ट उद्देश आहे.. स्वामींनी सर्व नियोजित केलेले आहे.. स्वामी हुकुम प्रमाणे आपल्याला जीवन जगायचे आहे.. ह्या जन्माचे सार्थक करायचे आहे.. स्वामी भक्त हो !! आज आपल्याला आजच्या पिढीसाठी स्वामी आपणास जीवन जगण्याची प्रेरणा देत आहे.. किंबहुना पुन्हा एकदा आठवण देत आहेत कि, आपण स्वामींचे आध्यात्मिक योद्धा आहोत.. अनन्य भक्तीची शक्तीचे वरदान आपल्याला भेटलेले आहे.. आपला जन्म महान उद्देशासाठी झालेला आहे.. दु:ख वा संकट येत असेल तर मात्र आपल्या ह्या उद्देशाची आठवण करवून देण्यासाठी येत आहेत.. ह्याला वैतागून शरीर हत्या करण्याचा भ्याड विचार नाही करायचा.. चला तर स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! तू मला पृथ्वीवर मानवाचा जन्म दिलास.. तुला कोटी कोटी धन्यवाद.. मला माहित आहे कि विशिष्ट उद्देशाने तु मला हा मानवाचा जन्म दिला आहेस.. आई..!! जीवनातील संकट वा दु:ख बघून माझे मन कधी कधी हतबल होते.. हे समर्था !! त्या वेळेला तु पुन्हा मला प्रेरणा दे.. पुन्हा मला माझ्या पृथ्वीवरील जीवनाच्या उद्देशाची आठवण दे.. आणि तुला अपेक्षित असलेल्या जीवनाची अभिव्यक्ती करवून घे..!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com






