आपले स्वामी बोलतात.. “ काय गं !! आमच्यावर आळ आणतेस ? तुझ्या पायाजवळच घागर आहे.. आणि थोतांड करून लोकांना रडून दाखवतेस काय !! ”

Feb 17, 2021

स्वामी लीला
अक्कलकोट मध्ये सावकार विहिरी समोर एक तलाव आहे.. तेथे एक ब्राम्हण स्त्री कपडे धुत होती.. तिने सोबत एक घागर सुद्धा आणलेली होती.. आणि ती घागर तिने बाजूलाच ठेवलेली होती.. त्याच दरम्यान परब्रम्ह स्वामी महाराजांची स्वारी त्याच रस्त्याने पायी चालली होती.. स्वामींनी तेथून जाता जाता एक लीला केली… स्वामींनी बाजूलाच ठेवलेली घागर हळूच घेतली आणि तिच्या नकळत पाण्यात सोडून दिली.. आणि पुढे जावून बसले.. त्यानंतर ह्या स्त्रीचा कपडे धुण्याचा कार्यक्रम झाल्या नंतर ती घागर शोधु लागली.. तर घागर कोठेच दिसेना म्हणून ती खूपच घाबरली.. घरी गेल्या वर आता आपल्याला मार बसणार म्हणून ती रडायलाच लागली.. तिने एका पोहणाऱ्या व्यक्तीला बोलावले.. आणि त्याला घागर शोधण्यास सांगितले.. त्यानेही सर्व तलाव शोधला पण त्यास काही घागर भेटली नाही.. आता आजूबाजूला गलबला सुरु झाला.. परंतु इकडे स्वामी महाराज ह्या सर्व लीलेचा आनंद घेत मोठ मोठ्याने पोट धरून हसत होते.. थोडावेळ झाल्या नंतर आपले स्वामी हसता हसता बोलू लागले “ काय गं !! आमच्यावर आळ आणतेस ? तुझ्या पायाजवळच घागर आहे.. आणि थोतांड करून लोकांना रडून दाखवतेस काय !! ” स्वामी भक्त हो !! बघतो तर काय..! खरोखर त्या बाईच्या पायाजवळ घागर असते.. हि स्वामींची लीला बघताच सर्व लोक हसू लागतात.. आणि हात जोडून जयजयकार करू लागतात..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! आजचा स्वामी बोध !! आजची स्वामी लीला तर उच्च आध्यात्मिक बोध देणारी आहे.. ह्या ब्रम्हांडात जे जे काही सुरु आहे.. हा मात्र स्वामींचा खेळ आहे.. हि उच्च आधात्मिक समज स्वामी आज आपणास देत आहेत.. आजच्या लीलेत घागर हे सुख-दु:ख असलेल्या घटनाचे प्रतिक आहे.. आणि ती स्त्री आपल्यातील अज्ञानी भोळ्या मनाचे प्रतिक आहे.. जेव्हा आपल्या जीवनात काही दु:ख येते तेव्हा आपले मन रडू लागते.. नको नको ते अज्ञानाच्या भरात बडबड करू लागते..!! अशा वेळेला आपल्याला आपल्या मनाला वरील लीलेची आठवण करवून द्यायची आहे आणि त्याला सांगायचे कि “अरे मना.. रडू नकोस.. हि स्वामीची लीला आहे.. हा स्वामींचा खेळ आहे.. स्वामींनी सुखाची घागर जरा वेळासाठी लपवून ठेवलेली आहे.. जर आश्चर्याने बघ !! थोड्यावेळात स्वामी पुन्हा सुखाची घागर प्रगट करतील !! ” स्वामी भक्त हो !! हि समज जेव्हा आपल्या मनात दृढ होते तेव्हा आपण आपल्या जीवनातील सुख- दु:खा कडे आश्चर्याने जीवनाकडे बघू लागतो.. स्वामी लीलांचा आस्वाद घेवू लागतो.. आता आपले मन तक्रारीच्या नव्हे तर भक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरून जाते.. स्वामी स्तुतीच्या भावनेने भरून जाते..!! स्वामी भक्त हो !! थोडक्यात आज आपणास आजच्या पिढीसाठी ह्या लीलेतून स्वामी आपल्याला हाच बोध कि, ” जीवनात कितीही मोठे संकट वा दु:ख येवू द्या.. हे जाण्यसाठी आलेले आहे.. हा सर्व स्वामींचाच खेळ आहे.. आणि आपल्याला ह्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे.. आणि हा आनंद लुटत लुटत ह्या खेळाचा साक्षी बनायचे आहे.. जेव्हा आपण साक्षी बनतो तेव्हा “ अग.. थोतांड करून लोकांना रडून दाखवतेस काय !! ” ह्या स्वामी वाणीचा अर्थ उलगडतो.. आणि ह्या नंतर मात्र जीवनात येणारे प्रत्येक दु:ख हे दु:ख नाही.. तर हे सुद्धा सुखच आहे हि समज प्राप्त होते.. येणारे संकट हे संकट नसून विकासाची शिडी आहे हि समज दृढ होते.. आणि फक्त आनंद… आनंद… आनंदाचीच अभिव्यक्ती होते..” चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे स्वामी लीलाधरा..!! हे जीवन म्हणजे तुझाच खेळ आहे.. ह्या खेळात तूच सुख दु:खाचे डाव खेळतो आहेस.. हे गुरुराया !! हा तुझा खेळ आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे रे !! म्हणून तर ह्याला आम्ही “लीला” म्हणतो.. आम्हा बालकांवर तुझ्या अनन्य भक्तीची कृपा कर.. आमच्या बुद्धीतील अज्ञान नाहीसे करून आम्हाला विवेकाची दृष्टी दे.. जेणेकरून आम्ही सुद्धा ह्या तुझ्या लीलेचा आनंद घेवू..!! पृथ्वीवर तुझ्या ह्या आनंदी भक्तिमय जीवनाचा उत्सव साजरा करू !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News