आपले स्वामी बोलतात.. “ राम नामाचे महात्म्य जपून खा बरे !! साखरेत पाणी मिसळू नका बरे !!! ”

Mar 26, 2021

स्वामी लीला
अक्कलकोट नगरीत गुरुतत्व सगुण रुपात अवतरले होते.. अक्कलकोट पवित्र नगरी म्हणजे ह्या परब्रम्हाची पृथ्वीवरील प्रपंचात राहून उच्च आध्यात्मिक जीवन कसे जगावे ह्याची कार्यशाळाच होती.. जो जो स्वामींच्या दरबारात येई.. तो कधीच खाली हात परत गेला नाही.. स्वामींच्या प्रत्येक कृतीत कृपा असत.. येणाऱ्या भक्तासाठी काहीतरी उपदेश.. संदेश दडलेला असत.. अक्कलकोट मध्ये असंख्य भाविक येत.. ते आपआपल्या उपास्य.. आराध्य दैवताची उपासना करत.. समजा कोणी घरात देवाची नवीन प्रतिमा आणली तर स्वामीच्या हाताचा स्पर्श करवून घेत.. वा कोणाला काही अनुष्ठान करायचे असेल तर सर्वप्रथम स्वामींचा आशीर्वाद घेत.. त्याना जर गीता.. सप्तशती वा इतर ग्रंथांचे पारायण करायचे असल्यास.. सर्वप्रथम ते स्वामींच्या हातात देत.. आणि स्वामींकडून प्रसाद म्हणून घेत आणि पारायणास आरंभ करत.. असेच एकदा श्री बाळकृष्ण तळवलकर हे स्वामींच्या दर्शना साठी आले.. हे रामदासी पंथाचे होते.. श्री राम हे त्यांचे दैवत.. जेव्हा ते स्वामीरायाच्या दर्शनासाठी दरबारात आले.. तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले कि “ राम नामाचे महात्म्य जपून खा बरे !! साखरेत पाणी मिसळू नका बरे !!! ”. स्वामी भक्त हो !! नक्कीच स्वामींच्या हा वाणीचा अर्थ बाळकृष्ण बुवांना समजला असेल आणि त्यांनी त्यांच्या जीवनात आचरणात आणला असेल आणि त्यांना उच्चतम विकासाच्या दिशेने घेवून गेला असेल.. स्वामींचे असे असंख्य लीला आहेत.. सर्व लीलांचे संकलन झाले असते तर नक्कीच स्वामींच्या लीलांचा पसारा समुद्रा सारखा पसरला असता ह्यात शंका नाही,..!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

स्वामी बोध
आजच्या लीलेत “ राम नामाचे महात्म्य जपून खा बरे !!” ह्या स्वामी वाणीतून नामचे महत्व आणि त्याची होणारी परम कृपा ह्याबद्दल स्वामी संकेत देत आहेत.. परंतु “ साखरेत पाणी मिसळू नका बरे !!! ” ह्या पुढील स्वामी वाणीतून स्वामींनी स्पष्ट त्यांस संकेत दिले कि, जशी साखर उपजत गोड आहे.. तिच्यात पाणी मिसळण्याची गरज नाही.. अगदी तसेच नाम हे स्वयंपूर्ण आहे.. नामच परब्रम्ह आहे.. ईश्वर आपल्या भक्तांसाठी नामरूप धारण करतो.. नामच अनन्य भक्ती आहे.. त्याला कर्मकांड जोडून.. विधी पूजा अर्चा सोवळे ओवळे आदी प्रकार जोडण्याची गरज नाही.. शुध्द अंत:करणाने नाम घेतल्यास त्याची गोडी चाखता येते.. स्वामी नामाचे महात्म्य खाता येते.. हि उच्चतम समज स्वामी देत आहेत.. स्वामी भक्त हो !! आजच्या स्वामी वाणीतून आज आपणासाठी आजच्या पिढी साठी स्वामी हाच संदेश देत आहेत कि.. शुद्ध अंत:करणाने नाम घेतले असता स्वामी नामाचे महात्म्य अनुभवता येईल.. त्या साठी कोणतेच बंधन नाही.. नाम जपता जपता नाममय होऊन जायचे आहे.. स्वामी नामाशी एकरूप होऊन जायचे आहे.. ब्रम्हांडातील सर्व शक्ती ह्या नामात एकवटलेली आहे हा विश्वास ठेवून नाम स्मरण करायचे आहे.. मग कोणतेही संकट असू दे.. मात्र श्री स्वामी समर्थ म्हणताच त्याचा ते कसे दूर होते हे आपण आश्चर्याने बघू.. स्वामी भक्त हो !! बघा !! मग स्वामींनी सांगितल्या प्रमाणे आपण मुक्त होऊन साखरेत पाणी मिसळण्याची गरज नाही… इतर कोणतेच कर्मकांड करण्याची गरज नाही .. हि समज प्राप्त होईल.. असो. चला तर मग आपण स्वामीना प्रार्थना करू या “ हे गुरुराया.. आज तु आम्हाला डोळ्यांनी जरी दिसत नसलास तरी तुझ्या नामाच्या रुपात आमच्या सतत सोबत असतोस.. जेव्हा तुझे नाम हृदयाच्या दरवाजातून आमच्या मुखात येते.. तेव्हा अनंत कोटी ब्रम्हांडाची शक्ती माझ्या पाठीशी आहे हा विश्वास आमच्यात जागृत होतो.. आणि हा भवसागर पार करणे अतिशय सहज वाटते.. हे श्री स्वामी समर्था !! खरोखर आज आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो कि, तुझे नाम आमच्या मुखात आहे..!! आज तुला हीच विनंती आहे कि तुझ्या नामाची हि परमकृपा आम्हा बाळांवर अशीच बरसत राहो.. अशीच बरसत राहो !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News