स्वामी लीला
स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत असतांना असंख्य लीला करत.. स्वामींच्या लीलांची ख्याती ऐकून असंख्य दु:खी – पिडीत – आर्त – मुमुक्षु स्वामींच्या दर्शनासाठी येत… स्वामी कृपेचा अनुभव घेत आणि अनन्य भक्तीच्या भावनेची शिदोरी घेऊन घरी जात.. ह्यातच डभोई नावच्या गावात एक पांडुरंग केशव नावाचा महाराजांचा निस्सीम भक्त होता… पांडोबा मुखात स्वामी नाम आणि हाताने आपले प्रामाणिक काम करत अनन्य भक्तीच्या भावनेत सदैव डूबलेला होते.. स्वामीं चरणाची त्यांला आठवण आली कि ते अक्कोलकोट मध्ये स्वामींच्या दर्शनास जात असे… हा क्रम कित्येक दिवस सुरु होता.. असेच एके दिवशी पांडोबा महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे आले.. स्वामी दरबारात त्याने अनन्य भावनेने स्वामींच्या चरणी दंडवत घातला.. आणि हात जोडून उभा राहिला.. तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले, ” अरे.. तुमच्या तोंडात जितके दात आहेत , तितकी वर्षे तुम्ही जिवंत राहाल…!! ” आणि त्यानंतर स्वामींनी पांडुरंग केशवरावस प्रसाद दिला..आणि तो प्रसाद पुन्हा घेतला.. स्वामी भक्त हो !! स्वामी वाणी होती ती.. सत्यच असणार.. त्यानंतर तीन वर्षानी पांडोबांची प्रकृती बिघडली व ते आजारी पडले… आणि आपल्या वयाच्या बत्तीसाव्या वर्षी.. त्यांच्या गावात मरण पावले.. स्वामी भक्त हो !! त्यांच्या मरणाच्या पूर्वी महाराजांनी पांडोबास दोन दिवस प्रत्यक्ष दर्शन दिले होते…
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
आजच्या स्वामी लीलेत पांडोबा हे स्वामीची अनन्य भक्त होते.. आजच्या लीलेत स्वामींनी खूप उच्च समज दिलेली आहे.. स्वामींनी पांडोबास प्रसाद देवून पुन्हा परत घेण्याची कृती केली… ह्या कृती द्वारे.. देवाण घेवाण करणारा मीच आहे.. तुमचे शरीर हे मात्र निमित्त आहे.. आता निरासक्त भावनेने.. कोणताही वेळ वाया न दवडता.. ह्या शरीराला काळ मर्यादा आहे.. हि जाणीव ठेवून.. ह्या मर्यादित वेळेत अनन्य भक्तीची अभिव्यक्ती करायची आहे… हि उच्च आध्यात्मिक अनन्य भक्तीची प्रेरणा स्वामींनी पांडोबास दिली.. म्हणून स्वामी भक्त हो !! आज आपणास आजच्या पिढी साठी आजच्या स्वामी वाणीतून बोध घेता हेच समजावून घ्यायचे आहे कि, आपण पृथ्वीवर पाहुणे आहोत.. ह्या शरीराला वेळ – काळ ह्याच्या मर्यादा आहेत.. हे शरीर रुपी वस्त्र कधीतरी जीर्ण होवुन गळून पडणार आहे.. म्हणून जीवनात वेळ वाया न घालवता.. आपले पृथ्वीवरील पात्र उत्कृष्ट निभावयाचे आहे.. अनन्य भक्ती युक्त कर्म करायचे आहे.. तसेच आपल्या सह सभोवताली असलेले लोक हे सुद्धा पाहुणे आहेत.. कोणा मध्ये अडकायचे नाही.. शरीर निमित्त आहेत.. कर्ते करविते तर स्वामीच आहेत.. ह्याची जाणीव ठेवायची आहे.. स्वामी भक्त हो !! हि वरील समज ठेवून आपण कर्म केले तर आसक्ती तून मुक्त होऊन निरासक्त भावनेने आपण जीवन जगु.. जीवनात भरपूर प्रगती करू.. विकास करू.. पण हे सर्व परिवर्तनीय आहे हि समज मनात स्पष्ट असल्यामुळे आपण कोणत्याच गोष्टीत अडकणार नाही.. सदैव मुक्त राहून कर्म करू.. म्हणून जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत गुंतून जावू.. मन आसक्त होऊन दु:ख निर्माण करेल तेव्हा तेव्हा आपल्याला वरील स्वामी वाणीची आठवण करायची आहे.. हृदयात स्वामी भक्तीचा भाव जागृत करायचा आहे आणि उत्साहाने आपले प्रामाणिक कर्म करत विकास करायचा आहे..!! चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! तु ह्या विश्वाचा स्वामी आहेस.. मालक आहेस.. हे सर्व तुझेच आहे.. तु तर आनंदासाठी ह्याची निर्मिती केलीस.. पण हे आई !! आम्ही इथे पाहुणे आहोत हेच विसरून गेलो.. ह्या मनातील खोट्या अहंकारात.. आसक्ती मध्ये.. आम्ही स्वतःला विसरून गेलो.. हे गुरुराया !! तुला इतकीच प्रार्थना आहे कि, आम्हाला भेटलेले हे शरीर.. हि माणसं.. हि नातीगोती.. हा निसर्ग.. ह्या सर्वा बद्दल आदर मनात नेहमी ठेव.. ह्या सर्वांबद्दलचे शुद्ध नितळ प्रेम जागृत कर.. हे सर्व म्हणजे तुझी अमुल्य भेट आहे.. ह्याची जाणीव आमच्या मनात सतत ठेव..!! स्वामी धन्यवाद.. कोटी कोटी धन्यवाद !!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com






